समग्र साहित्य सूची १४३

१९४४  - राजकीय क्रांती या विषयावर कविता ( तुरुंगवास).

१९४५ -  तुरुंगातून सुटका.

१९४६  - मुंबई इलाखा कायदे मंडळाच्या निवडणुकीत द. सातारा मतदारसंघातून निवड.

१९४६  - एप्रिल १४, गृहखात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून निवड.

१९४७  - डिसेंबर १५, मध्ये बंधू गणपतराव यांचे निधन.

१९४८  - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस.

१९५१  - मधले बंधू गणपतराव यांच्या पत्‍नीचे निधन.

१९५२  - कर्‍हाड मतदारसंघातून विधानसभेवर निवड व नागरी पुरवठा मंत्री म्हणून नियुक्ती.

१९५३ -  सप्टेंबर २८, श्री. भाऊसाहेब हिरे व श्री. नानासाहेब कुंटे यांच्या समवेत नागपूर करारावर पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने स्वाक्षरी.

१९५४  -  मुंबई राज्य पंचायत संघाची स्थापना.

१९५५  - ऑक्टोबर १०, राज्य पुनर्रचना समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला. विदर्भाचे वेगळे राज्य व उर्वरित मराठी प्रदेश व गुजराथी प्रदेश यांचे संयुक्त राज्य सुचविणारी शिफारस.

१९५५ -  डिसेंबर१, फलटण येथे ( सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या) सभेत ''उपोषण, संप, राजीनामे हे संयुक्त महाराष्ट्र मिळविण्याचे मार्ग नव्हेत'' असे ठासून प्रतिपादन करणारा ठराव मंजूर, महाराष्ट्रपेक्षा नेहरु श्रेष्ठ, आणि ''मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविण्याच्या प्रयत्‍नांत यापुढे श्री. शंकरराव देव यांचे नेतृत्व स्वीकारावयास मी तयार नाही'' अशी श्री. चव्हाण यांची घोषणा.

१९५६  - ऑक्टोबर, लोकसभे विदर्भासह विशाल द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्याच्या बाजूने आपला कौल दिला.

१९५६ -  नोव्हेंबर १, विशाल द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना व द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड ( वय ४३).

१९५७  -  एप्रिल, मुंबई विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्‍हाड येथे अटीतटीचा सामना होऊन विजय आणि पुनश्च मुख्यमंत्रीपद ( वय ४४)

१९५७  - नोव्हेंबर ३०, प्रतापगडावर शिवस्मारकाचे पं. जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उद्‍घाटन, द्विभाषिक विरोधी मोर्चा व समारंभ शांततेने पार पडले.

१९५८  - सप्टेंबर, (अखिल भारतीय काँग्रेसच्या ) वर्किंग कमिटीवर निवड.

१९५८ - फेब्रुवारी, विसाव्या ( विदर्भ साहित्य ) संमेलनाचे उद्‍घाटन.

१९५८  - नोव्हेंबर, बेळगाव -  कारवार सीमा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करुन घेण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने चळवळ सुरु.