• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ३११

इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वांतहि कमालीचं आकर्षण आहे. पक्षाच्या नेत्यांबाबात त्यांची भूमिका ही पं. नेहरूंपेक्षा नेहमींच निश्चयात्मक स्वरुपाची राहिली. डॉ. राधाकृष्णन् हे राष्ट्रपति असतांना १९६७ मध्ये त्यांची मुदत वाढवून द्यावी, असा आग्रह कामराज यांनी धरला तेव्हा इंदिराजींनी तें मानलं नाही आणि डॉ. झाकीर हुसेन यांच्याकडे राष्ट्रपतिपद त्यांनी सोपवलं.

परतु बंगलोरमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला याचं कारण सिंडिकेटच्या ताकतीचा त्यांना नीटसा अंदाज करतां आला नाही. आपल्याला अलग पाडण्याइतकं सिंडिकेटन् सामर्थ्य जमा केलं आहे याची त्यांना कल्पना आली नाही. बैठक सुरू होण्याच्या अगोदर कांही तास जरी त्यांनी हालचाल केली असती, तरी तें पुरेसं ठरणार होतं.

रेड्डी यांची उमेदवारी पक्षानं निश्चित केल्यामुळे इंदिराजी मात्र ब-याच अस्वस्थ बनल्या. हा निर्णय करण्यांत पंतप्रधानांची जाणूनबुजून कोंडी करण्याचा आणि देशाच्या पंतप्रधान म्हणून त्यांच्या सर्वश्रेष्ठ अधिकारालाच आव्हान देण्याचा हा एक उद्योग होता. त्यामुळे त्या संतप्त होणं स्वाभाविक होतं.

उमेदवार निश्चित झाल्याचं जाहीर झाल्यानंतर १४ जुलैला पत्रकारांनी या घटनेसंबंधांत इंदिराजींची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न कला. पत्रकार-परिषदेंत यासंबंधी त्यांना कांही प्रश्न विचारण्यांत आले. -

"काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यांपैकी, कोणाच्या विचारांत, ऐनवेळीं बदल घडून येईल असा आपला कसाय होता काय ?" - पत्रकार

"तें मला माहीत नाही. कोणाचा काय विचार आहे हें कोणी मला अगोदर सांगितलं नव्हतं. " - इंदिराजी.

"यशवंतरावांच्या मतदानाबद्दल तुम्हांला काय म्हणाचंय् ?" - पत्रकार

"ते तुम्ही त्यांनाच विचारा." - इंदिराजी.

"पार्लमेंटरी बोर्डातील बहुसंख्य सभासदांचा रेड्डी यांना पाठिंबा आहे याची तुम्हांला दिल्लीहून निघण्यापूर्वी कल्पना नव्हती का?" - पत्रकार.

"माफ करा, लोकांच्या शब्दांवर मी विश्वास ठेवतें. ते मला जेव्हा कांही शब्द देतात, सांगतात तेव्हा त्यांचं तें सांगणं खरं नसतं असा विचार करणं मला जड जातं. " - इंदिराजी.

"कुणाला पाठिंबा द्यायचाय् किंवा कुणाचं नांव तुम्हांला सुचवायचंय्, यासंबंधांत बोर्डाच्या सभासदांना विश्वासांत घेऊन मोकळेपणानं तुम्ही कधी कांही सांगितलं नाही, असं बोर्डांतील सदस्यांचं म्हणणं आहे. तुम्हीच जर त्यांच्यावर विश्वास दाखवून मोकळेपणानं कांही सांगितलं नाही तर त्यांनी काय करावं ? ते आपलं न तुमच्यासाठी कसं मोकळं ठेवणार ?" - पत्रकार

"फार खोलांत जाऊन चर्चा करण्यांत कांही अर्थ नाही असं मल वाटतं. प्रसंगा-प्रसंगानं, बोर्डांतील सदस्यांचं मत समजावून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि सल्लामसलतहि केली. परंतु कोणाच्या इच्छेविरुद्ध या ठिकाणीं विशिष्ट उमेदवाराचीच निवड केली जाईल असं मला वाटलं नव्हतं. " - इंदिराजी.