* भूमिपुत्र (श्री. विठ्ठलराव विखे पाटील यांचे चरित्र) लेखक - राजा मंगळवेढेकर. प्रका. १९७७
कर्जबाजारीपणा व त्यातून निर्माण होणारी दैन्य-दुर्दशा व नोकरशाही यांच्या कचाट्यात महाराष्ट्राचा शेतकरी सापडला असताना अशा परिस्थितीत सामाजिक, आर्थिक व राजकीय पाठबळ नसताना आपल्या शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन , त्यांच्या मनाची व निर्धारी स्वभावाची तयारी करुन त्यांच्यामध्ये नवचैतन्य घडवून आणतो. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रात उभा करणारा एक अशिक्षित शेतकरी तरुण मुलगा म्हणजे विठ्ठलराव विखे पाटील. छोटा खातेदार शेतकरी भागीदार असताना हा विचार आग्रहपूर्वक मांडून त्यांनी आपली दूरदृष्टी सिद्ध केली आहे.
* श्री जगजीवनराम : व्यक्ती आणि विचार, लेखक डॉ. प्रभाकर माचवे. प्रका. १९७७.
अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यासाठी महाराष्ट्रात म. फुले, कर्मवीर शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षि शाहू यांनी जे कार्य केले आहे, किंवा त्या सामाजिक विचारवंतांनी या प्रश्नविषयी सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात या प्रश्नाविषयी जिव्हाळा आहे. हाच प्रश्न भारतीय स्वरुपाचा असल्यामुळे भारतातील अन्य प्रांतात या प्रश्नांसंबंधी कोणते कार्य झाले आहे, याची ओळख मराठी भाषिकांना करुन देणे आवश्यक होते. या दोन्ही दृष्टीने व दुसर्या एका दृष्टीने, बाबू जगजीवनराम हे राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात सामील झाले. आणि देशाच्या मुक्तीतच दलितांची मुक्ती आहे या भावनेने त्यांनी कार्य केले. या दोन्हीही दृष्टीने त्यांच्या चरित्र ग्रंथास महत्व आहे. त्यांच्या या कार्याची ओळख भावी पिढीला करुन देणे अगत्याचे आहे.
* लता (गौरवग्रंथ) संपादिका सरोजिनी वैद्य, शांता शेळके. प्रका. १९६७. लता मंगेशकर हे अद्भुताचा स्पर्श झालेले भारतीय संगीतसृष्टीचे लेणे आहे. शब्द आणि भावना यांना जोडणार्या त्यांच्या मधुर स्वरांतून संगीताची नवी सृष्टी उभी राहते व त्या स्वरांनी रसिकांची हृदये हेलावतात. गीतातील भावनांचा उत्कट अनुभव येतो.
'ये मेरे वतन के लोगो' हे प्रसिद्ध गीत त्यांनी गायिले तेवहा स्व. कांडित नेहरुंचे डोळे पाणावले होते. ते अश्रू लताबाईच्या ओल्या स्वरातील भावनांचे शिंपण होते.
* विधानसभा : परिचय व कामकाज, लेखक के टी. गिरमे, प्रका. १९६६.
जनजीवनात आढळणार्या भावना, आकांक्षा, राग, लोभ यांचे प्रतिबिंब विधिमंडळात उठत असते आणि हे सर्व संसदीय कामकाजाच्या नियमाच्या चौकटीत बसवून या कामकाजाचे स्वरुप व दैनंदिन कार्याच्या प्रकिया यांचे दर्शन घडविले आहे. मराठीतील राज्यशास्त्रविषयक वाङ्मयात या पुस्तकाने मोलाची भर पडेलच, पण लोकशाहीत अवश्य असलेल्या जनतेच्या राजकीय शिक्षणासाठीही या पुस्तकाच्या उपयोग होईल. हे या प्रस्तावनेत यशवंतराव सांगतात.
* डॉ. भाऊ दाजी: व्यक्ती, काल व कर्तृत्व लेखक अ. का. प्रियोळकर, प्रका. १९७१.
भाऊ दाजी लाडांच्या जीवनात इतकी विविधता होती, की निष्णात डॉक्टर, समाजचिंतक, गरिबासाठी जिद्दीने लढणारे व करुणेने सेवातत्पर राहणारे समाजसेवक, व्यासंगी, प्राच्यविद्या पंडित व संशोधक अशा अनेक भूमिकांतून महाराष्ट्राची व भारताची त्यांनी सेवा केली आहे. ती नवीन पिढीला समजली पाहिजे. प्रत्येक पिढीला ती सांगितली गेली पाहिजे. या दृष्टीने या चरित्राचा उपयोग होईल.
* मुलाखतीच्या मैदानातून, लेखक : धों. म. मोहिते. प्रका. १९६९
या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याचे एक महत्वाचे कारण धों.म. मोहिते यांनी आपल्या
लेखात रेखाटलेला परिसर व रंगविलेली प्रातिनिधिक व्यक्तिचित्रे यांच्याविषयी त्यांच्या
ग्रामीण पार्श्वभूमीविषयक असणारी आस्था हे सांगताना या जिव्हाळ्यामुळे आपण तटस्थ
वृत्तीतून प्रस्तावना लिहू शकणार नाही. हे स्पष्टपणे कबूल करण्याचे धाडस यशवंतरावांनी
येथे दाखविलेले दिसते.