ग्रामीण भागाच्या विकासासाठी, कृषी औद्योगिक समाजरचना करण्यासाठी खंबीरपणे आणि द्रष्टेपणाने पहिले पाउफ्ल टाकणारे यशवंतराव एकमेव राजकीय नेते होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली आणि त्या दृष्टीने जिद्दीने कार्य करण्यास त्यांनी चालना दिली. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला सकीय सहाय्य केले. या चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. सहकारातून समाजवाद निर्माण होईल अशी त्यांची धारणा होती. आज महाराष्ट्राप्रमाणेच देशभर सहकारी चळवळ फोफावली आहे, याचे द्रष्टेपण यशवंतरावांनाच द्यावे लागेल.
सहकारी क्षेत्र विस्तृत करण्यासाठी आणि त्याचा ग्रामीण जीवनाच्या आर्थिक परिस्थितीवर अनुकूल परिणाम घडून यावा या हेतूने यशवंतरावांनी सहकारी चळवळीला चालना दिली. शेतीसाठी कर्ज पुरवठा करणे, उत्पादित शेत मालाची विकी करणे, शेती विकास, शेत मालावर प्रकिया, घरबांधणी, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन इ. सहकारी संस्थांना चालना मिळाली. या सहकारी संस्थांना कर्ज पुरवठ्याची सोय, सहकारी बँका, भूविकास बँका यांच्या मार्फत करण्यात येऊ लागली.
त्यांच्या सरकारनेच महाराष्ट्रात १८ सहकारी साखर कारखान्यांची प्रथम नोंद करुन सहकारात नवा विकम केला. आज महाराष्ट्रात सहकारी क्षेत्रात १३५ हून अधिक साखर कारखाने उभे आहेत. हे यशवंतरावांच्याच द्रष्टेपणाचे द्योतक आहे. महाराष्ट्रात कृषी औद्योगिक, समाजरचनेच्या दृष्टीने त्यांनी टाकलेले हे भक्कम पाउफ्ल होते. गेल्या ३०-३५ वर्षात या राज्याने केलेली आर्थिक-सामाजिक, कृषी-औद्योगिक प्रगती हे त्यांनी उराशी बाळगलेले एक स्वप्नच होते. गरीब, कष्टकरी, अशिक्षित मराठी माणूस महाराष्ट्रात ताठपणाने-ताठमानाने, समर्थपणे उभा राहून कृषी औद्योगिक-शिक्षण आदि क्षेत्रात चमकावा या हेतूने, त्यांनी केलेले समर्थ मार्गदर्शन आज ग्रामीण मराठी मनाचा-महाराष्ट्राचा स्थायीभाव झाला आहे.