• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २९

२९. ग्रंथप्रेमी साहेब (सरोजिनी बाबर) 

आम्ही त्यांना 'साहेब' म्हणायचो.  साहेबांचे पुस्तकांवर मनापासून प्रेम होते.  त्यांचे स्वतःचे असे समृद्ध ग्रंथालय होते.  साहेबांना भेट म्हणून अनेक पुस्तके मिळत.  पण हे ग्रंथालय केवळ या 'भेटीं'चे नव्हते तर साहेबांनी स्वतः आपल्या आवडीनुसार खरेदिलेल्या असंख्य पुस्तकांचा त्यात समावेश होता.  एखाद्या पुस्तकाबाबत त्यांच्या वाचनात किंवा ऐकण्यात आले की लगेच ते, ते पुस्तक मागवून घेत.  भेटीदाखल आलेली पुस्तकेही परस्पर कपाटात जात नसत तर ती वाचली जात, त्यावर अभिप्राय कळविला जाई.  एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला साहेबांना जायचे असेल तर ते पुस्तक वाचल्याशिवाय, निदान डोळ्यांखालून घातल्याशिवाय साहेब कधीच जात नसत.  एखाद्या आवडलेल्या पुस्तकाला उत्स्फूर्तपणे दाद द्यावयाची त्यांना सवय होती.  एकदा असा सांगावा घेऊन खास सांडणीस्वार आमच्याकडे आल्यचे मला चांगले आठवत आहे.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार अशांसारख्या पंडितांशी त्यांच्या चर्चा होत त्या अभ्यासाची बैठक असल्याशिवाय का ?  हा अभ्यास पुस्तकांशिवाय कसा होणार ?  साहेबांचे हे ग्रंथप्रेम त्यांच्या आईला आणि बायकोला चांगले माहीत होते.  त्या दोघींनाही साहित्याची आवड होती.  त्यांनी वाचावीत अशी पुस्तके साहेब त्यांना कधी कधी वाचूनही दाखवीत.  त्यावर गप्पाही होत.  वेणूताईही साहेबांच्या पुस्तकांची जिवापाड काळजी घेत, ती खराब होऊ देत नसत.

साहित्याप्रमाणेच गाणे, तमाशा, दशावतार याही गोष्टीत त्यांना रस होता.  राजकारणात असले तरी या अल्प गोष्टींकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे.  आपल्यात अपुरेपणा राहू नये म्हणून ते कमालीचे दक्ष असायचे.  काही वेगळेपण आढळले की लगेच ते टिपण्याकडे त्यांचा कल होता.  अशा केवळ राजकारणापलीकडील माणसांचा त्यांचा शोध सतत चाललेला होता.