• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २७

२७. यशवंतरावांचे ग्रंथप्रेम (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी)

राजकारणाच्या व्यापात ते वाचन कधी करीत ?

वाचनाची गोडी मुळातच होती.  त्यामुळे ते रात्री कामकाजाच्या फाइली संपल्यावर नियमितपणे किमान रात्री दोन वाजेपर्यंत वाचनात रमून जात.  आमच्या वाईच्या विश्वकोश कार्यालयातील संदर्भग्रंथसंग्रह पाहण्यात रमत.  त्यांनी एकदा संग्रहाला भेट दिली, आणि मी त्यांना ''वर्ल्ड आर्ट इन् सायक्लोपीडिया'' दाखवला, त्यांचे अनेक व्हॉल्युम्स दाखवले.  त्यांना तो इतका आवडला की लगेच त्यांनी स्टँड बुक स्टॉलच्या शानभाग यांच्याकडे मागणी नोंदवली.  केव्हाही माझ्याकडे आले की नवीन ग्रंथ काय वाचला, हे ते विचारणारच हे गृहीत धरून मी ते आले की त्यांच्यासमोर नवा वाचलेला ग्रंथ ठेवत असे.  विज्ञानाचे ग्रंथही ते आवडीने वाचत.

त्यांना सर्वाधिक आवड कुठल्या साहित्यप्रकारात होती ?
यशवंतरावांना सायन्स फिक्शन अतिशय आवडत असत.

प्रत्यक्ष सत्ता हाती आल्यावर, त्यांच्या साहित्यप्रेमाला कोणती निश्चित दिशा मिळाली ?

साठ साली ते मुख्यमंत्री झाल्यानंतर साहित्य संस्कृती मंडळाची त्यांनी केलेली स्थापना हे त्यांच्या साहित्यप्रेमाचेच फलित म्हणता येईल.  चांगल्या लेखकांना प्रकाशक न मिळण्याची अडचण दूर व्हावी.  वैचारिक लेखन वाढावं, हा त्यामागे हेतू होता.  विश्वकोश कार्यालय हेही त्यांच्या सल्ल्यानेच स्थापन केलेले आहेत.