• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ३१

द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री

प्रारंभी यशवंतराव द्वैभाषिक राज्याच्या पर्यायास प्रतिकूल होते.  कोणालाही विश्वासात न घेता पक्षश्रेष्ठींनी दिलेला हा निर्णय आत्मघातक आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.  गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीने मुंबई राज्याची महाराष्ट्र, गुजरात व मुंबई अशी तीन स्वतंत्र राज्ये करावीत, असा ठराव केला होता.  काँग्रेस कार्यकारिणीने द्वैभाषिकाचा निर्णय घेतल्यानंतर ३० ऑगस्ट, १९५६ रोजी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.  हिरे यांनी तसा ठराव मांडून चव्हाणांनी त्यास पाठिंबा दिला.  चव्हाणांनी आपल्या भाषणात विरोधीपक्षीय संयुक्त महाराष्ट्र समितीच्या उपराष्ट्रवादावर आणि गुजरात प्रदेश काँग्रेसच्या ठरावामागील देशी वसाहतवादावर टीकास्त्र सोडले.  त्या त्यांच्या भाषणातून प्रथमच त्यांनी गुजराती भांडवलदारांविरुद्ध आवाज उठवला होता.  पण तरीही मोरारजींची इतराजी ओढवू नये, अशा हेतूने काही दिवसांनी त्यांनी मोरारजींना पत्र पाठवून दिलगिरीही व्यक्त केली होती.  त्या पत्रात ते लिहितात :

'.... गेल्या काही वर्षांत मी माझे सार्वजनिक जीवन तुम्हांला आदर्श मानून घडवलेले आहे.  हे काम सोपे नाही.  पण मी प्रामाणिकपणे आस्थापूर्वक प्रयत्न केला आहे.  मला नेहमीच यश आले नसेल, तर ते केवळ मी तुमच्याइतकी परिपक्वतेची पातळी गाठू शकलो नाही, यामुळेच. ... मी केले, ते बरोबर नव्हते, असेच तुमचे मत असेल, तर आजवर जे कमावले आहे, त्याचा त्याग करून सार्वजनिक मंचावरून अदृश्य होण्याचा मी निर्धार व्यक्त करतो... या अंधरात पित्याने मुलाला दाखवावा, तसा प्रकाश तुम्ही मला दाखवा, अशी प्रार्थना करतो.''  म्हणजे मी इतक्या वर्षांच्या आपल्या विश्वासास पात्र ठरण्याचा प्रयत्न करीन (उद्धृत, नरेश कवडी : 'मोरारजी देसाई चरित्र व कार्य', ९१).

द्वैभाषिकाचा पर्याय

द्वैभाषिकाचा पर्याय गुजरातच्या गळी आपण उतरवू शकणार नाही, अशी खात्री असल्यामुळे प्रथम मोरारजी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारू इच्छितच नव्हते.  संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा मुकाबला अत्यंत चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे मोरारजींपासून महाराष्ट्र दुरावलाच होता.  पण पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून मोरारजी राजी झाले, तरी अविरोध निवड होणार असेल, तरच आपण मुख्यमंत्री होऊ, अशी भूमिका मोरारजींनी घेतली.  त्यांची ती मागणी पूर्ण होऊ न देण्यास हिरे कटिबद्ध झाले होते.  देव-गाडगीळांचा त्यांना पाठिंबा होता.  संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा दिल्यामुळे त्यांची लोकप्रियताही खूप वाढलेली होती.  विरोध होताच मोरारजी माघार घेणार आणि हिरे मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट होते.  यशवंतरावांनी परिस्थितीचा अंदाज घेतला.