• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - १००

साहित्याला समाजजीवनात एक निश्चित प्रयोजन असते.  समाजाच्या रचनापर्वात नव्या विचारांची, ज्ञानाची व मूल्यांची भर टाकत राहणे हे साहित्यिकाचे महत्त्वाचे कार्य असते.  कारण त्या विचारांनी भारलेले कार्यकर्तेच समाजाला पुढे नेत असतात.  कलाबाह्य निकष लावून हेतुवादी साहित्य ते श्रेष्ठ ठरवीत नसले, तरीही 'समाजाच्या प्रबोधनासाठी, त्याचा भावपिंड घडवण्यासाठी ललित साहित्याचा निश्चित उपयोग होतो.' ('ॠणानुबंध' २०७) अशी त्यांची खात्री होती.  त्यांच्या मते समाजक्रांतीविषयी अनुकूल मनोभूमी तयार करावयाची असेल, तर प्रस्थापित समाजातील विसंगती, अंतर्विरोध आणि त्यामुळे निर्माण होणारी कोंडी यांचा कलात्मक आविष्कार साहित्यिकांनी करायलाच पाहिजे.  साहित्यातील सामाजिकता व सामाजिक जाणीव ही सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देत असते.  सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांचा व वैशिष्टयांचा सूक्ष्म विचार करणे, विज्ञानयुगाने व नवजीवनाने निर्माण केलेल्या नवजाणिवांचा स्वीकार-प्रसार करणे आणि समाजाचे प्रबोधन करणे ही साहित्याची प्रयोजने असल्याचे यशवंतरावांनी सांगितले आहे.  

'जैसे थे'वादी परिस्थितीचे शाब्दिक फुलो-याचे वर्णन करीत राहणे हे त्यांच्या दृष्टीने काही चांगले साहित्यसर्जन नव्हे.  विचार बदलतात, स्थिती बदलते, जी वाहते, तिलाच नदी; तसेच नित्य बदलत जातो, त्यालाच ते विचार मानतात.  त्यामुळे बदलत्या समाजस्थितीचा, बदलत्या समाज वास्तवाचा वेध त्यांच्या मते लेखकाने घ्यायलाच हवा.  साहित्याचे तेच खरे प्रयोजन असते.  लेखकाने संपाला पाठिंबा द्यावा, की विरोध करावा, हा त्याचा प्रश्न आहे; पण संपामुळे कामगारांची जी परवड होते, त्यांच्या कुटुंबियांचे जे हात होतात, त्या वाताहतीचे चित्र जो लेखक रेखाटील, तोच जगण्याच्या शाश्वत प्रेरणेशी इमान राखू शकेल, असे यशवंतरावांना वाटते.  ज्या साहित्यातून अमंगलाचा नाश आणि मंगलाची स्थापना होते, तेच साहित्य उदात्त गुणांची प्रेरणा देऊन समाजाला प्रगतीच्या दिशेने गतिमान करू शकते.