• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ६६

द्वैभाषिक राज्य स्थापन झाल्यानंतर प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण, पंचप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यातचे ठरले. वास्तविक निवडणुकीच्या आधी हा समारंभ होणार होता, मालोजीराव नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वीच एक पुतळासमिती स्थापन झालेली होती आणि तिने वर्षापूर्वी नेहरूंना आमंत्रण दिले होते. पण नेहरूंच्या इतर कार्यक्रमामुळे त्यांनी नंतर येण्याचे आश्वासन दिले. तेवढ्यात निवडणूक आली. मग निवडणुकीसाठी शिवाजी महाराजांचा उपयोग केला अशी टीका होऊ नये म्हणून समारंभ पुढे ढकलला होता. मुळात तेव्हाचे राज्यपाल महताब प्रतापगडावर गेले असता, शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे हवा अशी कल्पना त्यांना सुचली होती. ती त्यांनी यशवंतराव व हिरे यांना सांगितल्यावर सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन होऊन महाराजांचा पुतळा तयार करण्याची योजना मार्गी लागली.

हे सर्व लक्षात न घेता, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांनी द्वैभाषिक दृढ करण्यासाठी हा खटाटोप असल्याची समजूत करून घेऊन, समारंभाच्या वेळी निदर्शने करण्याचे ठरवले. एस. एम. जोशी यांनी पुण्यातल्या भाषणात नेहरूंनी अनावरण करण्यास विरोध केला. ते म्हणाले की, शिवाजीमहाराजांनी येथे स्वराज्य स्थापन केले. त्या स्वराज्यस्थापकांचा तो पुतळा. पं. नेहरूंनी तर महाराष्ट्राची घटक राज्याची मागणीच नामंजूर केली आहे, त्यांना पुतळ्याचे अनावरण करण्याचा मुळीच अधिकार नाही. मग नेहरूंनी पूर्वी अफझल खानाच्या वधाबाबत शिवाजी राजांवर टीका केली होती याचा काहींनी दाखला दिला. पण नेहरूंनी नंतर लगेचच आपली चूक कबूल केली होती. असा विरोध होऊ लागल्यावर जुन्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादालाही उजाळा मिळाला.

या अनावरण समारंभास नेहरूंना बोलावल्यावरून समिती विरूध्द काँग्रेस वाद सुरू झाला असे नव्हे, तर समितीतच दोन मते असल्याचे दिसून आले. शिवाजीमहाराजांचा पुतळा व त्याचे अनावरण मेहरंच्या हस्ते करायचे असे ठरले तेव्हा द्वैभाषिक बळकट करण्याचा विचार येण्याचे कारण नव्हते, कारण तेव्हा द्वैभाषिक बळकट करण्याचा विचार येण्याचे कारण नव्हते, कारण तेव्हा द्वैभाषिक येणार याची कल्पनाही नव्हती. यामुळे समितीत फूट पाडण्याचा यशवंतरावांचा हा डाव होता ही टीकाही निरर्थक ठरते. समितीत या बाबतीत मतभिन्नता असल्याचे दिसलेच; पण राजकारण नसलेल्या अनेकांनी समितीचा आग्रह चुकीचा ठरवला. पुण्यातल्या रँगग्लर परांजपे, विठ्ठलराव घाटे इत्यादींनी असा विरोध न करण्याचे आवाहन केले. य. दि. फडके यांनी त्यांच्या विसाव्या शतकातील महाराष्ट्र या ग्रंथाच्या आठव्या खंडात या विविध भूमिका दिलेल्या आहेत. भाई डांगे यांनी एक प्रत्रक प्रसिध्द करून म्हटले की, मोरारजभाईनी शिवाजीमहारांवर टीका केली होती, म्हणून नेहरूंना विरोध करण्याची आवश्यकता नाही आणि नेहरूंनी पूर्वीच आपली टीका दुरूस्त केल्यामुळे तो वाद उकरून काढणेही योग्य नाही. भारतास स्वातंत्र्य मिळवण्यात नेहरूंनी पुढकार घेतला होता व तो घेऊन त्यांनी महाराष्ट्रही स्वतंत्र केला. तेव्हा त्यांनी शिवस्मारकाचे अनावरण करण्यात चूक नाही. पण नेहरूंनी महाराष्ट्राचे राज्य मारले म्हणून आपला विरोध आहे. जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी यांनी महाराष्ट्र होऊ दिले नाही, म्हणून विरोध करावा, पण नेहरू पुण्यास विमानतळावर येतील तिथे निदर्शन व्हावे, समारंभाच्या ठिकाणी नको, असे जाहीरपणे सुचवले. रियासतकार सरदेसाई यांनी आजच्या राजकारणाचा संपर्क शिवाजी महाराजांना होऊ नये अशी इच्छा प्रदर्शित केली. तर शिवस्मारक समितीचे सदस्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी, मोरारजीवर राग काढण्यासाठी पंडित नेहरूंना काळी निशाणे दाखवणे ही शुध्द फसवेगिरी आहे, असे म्हटले. रावसाहेब पटवर्धन यांचा द्वैभाषिकास विरोध नव्हता. त्यांना ही निदर्शने अमान्य होती. त्यांनी लिहिले, “संयुक्त महाराष्ट्रवाल्यांनाच छत्रपतींचा कैवार आहे, असे म्हणायचे काय? द्वैभाषिक मानणारे अनेक नागरिक कोणत्याही संयुक्त महाराष्ट्रवाद्याइतकेच छत्रपतींचे चाहते व भक्त आहेत. युध्दाच्या प्रचारासाठी इंग्रजांनी छत्रपतींच्या नावाचा उपयोग केला तेव्हा त्याविरूध्द कोणी काही मोहीम केली नाही अन् नेहरूंसारखा थोर नेता छत्रपतींच्या पुतळा अनावरण करण्यास आला तर आम्हांला अपमान वाटतो.”

या स्थितीत प्रतापगडावर ३० नोव्हेंबर १९५७ रोजी होणा-या समारंभाच्या वेळी वातावरण अतिशय तंग झाले. पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे, की निदर्शने करणारांचे नेतृत्व एस. एम. यांच्यासारख्यांकडे होते. त्यांच्या व त्यांच्या सहकारी नेत्यांच्यामुळे निदर्शनास अनिष्ट वळण लागले नाही. सरकारनेही निदर्शकांना चिथावणी दिली नाही. पोलिसांचा बंदोबस्त अर्थातच जोरदार होता. समारंभाच्या मार्गावर अनेक ठिकाणी स्वागताच्या कमानी होत्या व समारंभ थाटात पार पडला. मात्र वाईपासून प्रतापगडापर्यंत संयुक्त महाराष्ट्र समितीचे निदर्शक घोषणा देऊन रांगेने उभे होते. नेहरूंना जातानायेताना हे दृश्य दिसले. त्यांनी यशवंतरावांना विचारले, की हे लोक काय घोषणा देत आहेत? यशवंतरावांनी सांगितले, की तुम्हांला शुभेच्छा देत आहेत, पण मुंबई आपल्यापासून हिरावून घेऊ नका, असे म्हणत आहेत. नेहरूंनी विचारले, त्यांच्यापासून मुंबई कोण हिरावून घेत आहे? यानंतर नेहरू असेही म्हणाले की, पंजाबी लोक रागावतात, पण लवकर संपतो, तुम्हा महाराष्ट्रीयांचं तसं होत नाही.