• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ३४

अखेरीस बेचाळीसचे आंदोलन संपले. देशातल्याच सर्व कार्यकर्त्यापैकी ज्यांनी शस्त्रास्त्रे बाळगली होती, त्यांनी ती सरकारला परत करावी असे काँग्रेसने आवाहन केले. यामुळे खळबळ माजली. पण गांधीजी व जवाहरलाल नेहरू यांची वृती व काही गांधीवाद्यांची वृत्ती वेगळी होती. लढ्याच्या अखेरच्या दिवसांतच आचार्य वि. प्र. लिमये, प्रेमा कंटक इत्यादी गांधीवादी सातारा जिल्ह्यात आले होते. त्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब केल्याबद्दल टीका केली. तेव्हा त्यांना वस्तुस्थिती काय होती याची कल्पना कशी दिली, हे कासेगावकर-वैद्य यांनी त्यांच्या आठवणीच्या पुस्तकात स्पष्ट केले आहे. शंकरराव देवांनी तर सातारच्या प्रतिसरकारचे काम करण्या-या कार्यकर्त्याना बराच दोष दिला. तुम्ही काँग्रेसच्या अहिंसक धोरणाशी प्रतारणा केली, तुम्ही खरे काँग्रेसजन नाहीत इत्यादी भाषा त्यांनी वापरली. याचा राग येऊन एक जण म्हणाला, ‘आम्ही काँग्रेसजन नाही तर तुम्ही आलात कशाला ? तुम्हांला आम्ही बोलावले नव्हते.’ हा प्रसंग डॉ. उत्तमराव पाटील यांनी क्रांतिपर्व या त्यांच्या पुस्तकात नमूद केला आहे. नंतर मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर उत्तमराव मोरारजीभाईना भेटले तेव्हा काँग्रेस कार्यकर्ता म्हणून न बोलता, मोरारजीभाई गृहमंत्र्याच्या भूमिकेतू कसे बोलले, हेही उत्तमरावांनी नमूद केले आहे.

वास्तविक गांधींनीच काँग्रेस कार्यकर्त्यांना, ते स्वतंत्र असून आपापल्या बुध्दीप्रमाणे स्वातंत्र्यासाठी करण्यास सांगितले होते. देशांतील हिंसक कृत्यांची जाबाबदारी सरकारने काँग्रेसवर टाकली तेव्हा सरकारच्या हिंसक वर्तणुकीचा हा परिणाम असल्याचे प्रत्युत्तर गांधीजीनी दिले होते. सुटका झाल्यावर गांधींनी नाना पाटील यांना धाडलेल्या उत्तरात तु्म्ही जो मार्ग अवलंबिलात तो आपल्या मार्गाशी जुळणारा नव्हता, पण तुम्ही तुमच्या सदसव्दिवेकबुध्दीप्रमाणे वागलात असे म्हटले होते. नेहरू सुटून आले तेव्हा अप्पासाहेब पंत यांच्याबरोबर त्यांनी उत्तमराव पाटील यांनी सांगितलेला वृत्तान्त ऐकून घेतला. पाच लाख रूपये सरकारी तिजोरीतून कसे लुटले आणि त्याचा विनियोग कसा केला, हे सर्व नेहरूंना सांगण्यात आले व अप्पासाहेबांनी त्यास दुजोरा दिला. तेव्हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले हे वेगळेच पान आहे, असा व अप्पासाहेबांनी त्यास दुजोरा दिला. तेव्हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले हे वेगळेच पान आहे, असा अभिप्राय देऊन नेहरूंनी संतोष व्यक्त केला. यावरून गांधीवादी यांच्यातील तफावत फक्त दिसून आली.

बेचाळीसच्या आंदोलनास आरंभ होण्यापूर्वी महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यांच्यापासून अनेक काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये व लिखाण घेतल्यास, प्रत्यक्ष आंदोलनात हिंसाचाराचा अवलंब होणे क्रमप्राप्त होते आणि तसा तो होणार याची पूर्ण कल्पना या नेत्यांना होती, हे स्पष्ट होते. इतकेच नव्हे, तर यापूर्वीच्या आंदोलनाप्रमाणे बेचाळीसमधील आंदोलनास अहिंसात्मक स्वरूप राहिले नाही तरी ते मागे घेतले जाणार नाही, असे वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले होते. या नेत्यांत शंकरराव देवही होते.

देव यांनी २५ जुलै १९४२ रोजी मुंबईत केलेले भाषण या संदर्भात लक्षात घेण्यासारखे आहे. ब्रिटिश सरकारने बेचाळीसच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी कोणाची, याची चौकशी करून निर्णय देण्यासाठी तेव्हाच्या मध्यप्रांतातील न्यायमूर्ती विकेन्डन यांची नेमणूक केली होती. त्यांच्या अहवालात शंकरराव देव यांच्या या भाषणाचा उतारा मिळू शकतो. शंकरराव म्हणाले, ‘या वेळी १९४० सालच्या (वैयक्तिक सत्याग्रहाप्रमाणे) नैतिक बळाचा वापर करण्याचा प्रश्न नाही, तर हे बंड होणार आहे. याच्या अखेरीस महात्मा गांधी बागी (बंडखोर) म्हणून ओळखले जातील. इतकेच नव्हे, तर या वेळी महात्मा गांधी आपले अहिंसेचे तत्त्वही दूर ठेवतील. कारण देश स्वतंत्र नसताना अहिंसेचा प्रसार करणे शक्य नाही, हे महात्मा गांधीनी जाणले आहे.’

गांधीजींनी जे बेचाळीसच्या आंदोलनाच्या आधी जाणले त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात तसेच देशाच्या अनेक भागांत आंदोलक वागले. असे असता शंकरराव देव वा वि. प्र. लिमये यांच्यासारखे गांधीवादी, साता-यातील आंदोलकांची निर्भर्त्सना कशी काय करत होते, असा प्रश्न निर्माण होणे अनिवार्य होते. गांधीपेक्षा गांधी होण्यातला हा प्रकार झाला.