• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - २६

काँग्रेस समाजवादी पक्षाचा जन्म कारागृहात झाला असे मानले जाते. कारण निरनिराळ्या कारागृहांत ३० व ३२ साली बंदिवान झालेल्या अनेक तरूणांवर, समाजवादी विचारांचा प्रभाव पडला होता आणि त्यांनी या संबंधात बरेच ग्रंथवाचन केले होते. देशभर ही लाट पसरत होती; याचे निदर्शक म्हणजे बिहारमध्ये ३१ सालीच काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन करण्याचे प्रयत्न झाले असले तरी असहकार आंदोलनामुळे ते तहकूब झाले. उत्तरप्रदेशमध्येही या प्रकारच्या हालचाली होऊ लागल्या होत्या. मग ३२ सालचा सत्याग्रह थांबला आणि काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्याच्या हालचालींना बळकटी आली. मुंबईत ३३ साली व त्या आधी पुण्यात काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन करण्यासाठी परिषदा झाल्या होत्या. १९३४ सालच्या मेमध्ये पाटणा इथे पहिले अधिवेशन भरून, आचार्य नरेन्द्र देव यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. आचार्य नरेन्द्र देव यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. आचार्य नरेन्द्र देव वृत्तीने संयत व निष्ठावान गृहस्थ होते. ते एम. ए. झाले होते आणि वडिलार्जित श्रीमंतीकडे पाठ फिरवून राजकीय कार्यात सहभागी होण्याचे त्यांनी ठरवले. असहकार आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि मग काशी विद्यापीठ, या राषट्रीय शिक्षण देणा-या विद्यापीठात ते शिकवू लागले. इंग्रजीबरोबर फ्रेंच, जर्मन या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.तसेच ते संस्कृततज्ज्ञ होते आणि विद्यापीठात संस्कृतप्रमाणे पाली व प्राकृत भाषा ते शिकवत.

पाटणा इथल्या काँग्रेस समाजवादी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात आचार्य नरेन्द्र देव यांनी, मार्क्सवादाच्या अभ्यासाचे महत्त्व मान्य केले आणि काँग्रेस संघटनेने आर्थिक समस्यांवर भर देण्याची गरज प्रतिपादन केली. पण ते म्हणाले, “ काँग्रेसचे नेतृत्व काही वेळा पुरोगामी कार्यक्रम स्वीकारण्यास तयार नसल्याचे दिसत असले तरी काँग्रेस संघटनेत क्रांतिकारक बीज आहेत याचा विसर पडता कामा नये. म्हणून समाजवादी विचारांच्या लोकांनी काँग्रेसमध्ये राहून तिला क्रांतिप्रवण केली पाहिजे. या बाबतीत आपले व मानवेन्द्रनाथ रॉय यांचे मत सारखे आहे.” रॉय यांनी त्या वेळी ही मते प्रगट केली होती. या उलट सुभाषचंन्द्र बोस यांच्या भूमिकेवर व वक्तव्यांवर आचार्य नरेन्द्र देव हे पहिल्या अध्यक्षीय भाषणात आक्षेप घेताना दिसतात. ते म्हणतात की, सुभाषबाबू काँग्रेस बदलू पाहत असले, तरी ते जी मते मांडत आहेत ती काँग्रेस नष्ट करणारी ठरतील. आपला मुख्य प्रश्न राष्ट्रीय स्वातंत्र्याचा असून त्यासाठी देशव्यापी लढा देण्याचे सामर्थ्य़ काँग्रेसमध्ये आहे, याचे भान ठेवले पाहिजे. यशवंतराव कारागृहात असताना काँग्रेस समाजवादी व रॉयवादी यांची मते ऐकून घेत होते तेव्हा दोघांतला हा समान दुवा त्यांच्या लक्षात आला आणि नंतरच्या काळात त्यांना काँग्रेस नेत्यांच्या काही कार्यक्रमाबद्दल व धोरणांबद्दल शंका आल्या, तरी काँग्रेसचा त्याग करण्याची त्यांची तयारी नव्हती. या बाबतीत अपवाद करण्याची वेळ नंतर आली होती. त्याची व यशवंतरावांनी अखेर घेतलेले निर्णय यांची दखल पुढे घ्यायची आहे.

यशवंतरावांनी ३४ साली कोल्हापूरमध्ये राजाराम महाविद्यालयात नाव दाखल केले. कारण कोल्हापुरात शाहू महाराजांमुळे कमी खर्चात चांगल्यापैकी शिक्षण मिळण्याची व्यवस्था होती आणि कोल्हापूर हे अधिक परिचयाचेही होते. शाहू महाराजांनी केवळ शिक्षणाची सोय केली नाही तर विद्यार्थ्य़ांच्या वसतिगृहांचीही केली. यासंबंधात पांडुरंग चिमणाजी पाटील यांची आठवण नमूद करण्यासारखी आहे. ते पी. सी. पाटील या नावाने अधिक ओळखले जात असत. ते पुण्यातील शेतीमहाविद्यालयात शिकले, पदवीधर झाले आणि शेती खात्यात संचालकपदापर्यत चढले. लेफ्टनंट जनरल थोरात हे त्यांचे चिरंजीव, पी. सी. पाटील यांनी आत्मचरीत्रात शाहू महाराजांच्या आठवणी दिल्या आहेत.

ते सांगतात की, महाराज बुकटे या गृहस्थाकडून रोजची वृत्तपत्रे वाचून घेत. १८९९ च्या शेवटी पी. सी. पाटील हे मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले व त्यांचे नाव वर्तमानपत्रात आले. तेव्हा बुकटे यांनी महाराजांना सांगितले, की आपल्या वडगावच्या पाटलांचा मुलगा मॅट्रीक झाला. शाहू महाराजांनी लगेच एक स्वार पाठवून, या मुलास बोलावून घ्या म्हणून सांगितले.