• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३९-०५११२०१२-१

आम्ही शक्यतो ताई हा विषय निघणार नाही असे बोलत असू.  पण तो विषय काही त्यांच्या मनातून जात नसे.  परवा एकदा असे झाले.  लक्ष्मण, ४० वर्षात मी मंडईतच गेलो नव्हतो.  त्याअगोदरही क्वचितच गेलो असेन.  पण भाजीवालीशी भाजीसाठी कधी बोलल्याचे आठवत नाही की किराण्यावाल्याशी कधी हुज्जत घातल्याचे स्मरत नाही.  मला घरातल्या लोकांनी एवढे लाडावून ठेवले होते, की रूमालापासून पायातील पादत्राणांपर्यंत मी कधी काही घेतले नाही स्वतःसाठी.  सारे वेणूबाई पाहत.  नातेवाईक असोत की पैपावणे असोत.  जाणारे-येणारे असोत.  काय करायचे हा प्रश्न मला कधीच पडला नाही.  घरातल्या काम करणार्‍या माणसांचे सुद्धा सारे दुखलेखुपले त्याच पाहत.  त्या गेल्याने घर उघडे पडले.  परवा घरातल्या माणसाने तांदळासाठी पैसे मागितले.  वीस वर्षांत त्याला पैसे मी कधी दिले नव्हते.  मी घरातून २० रुपयांची नोट आणून दिली.  त्याने मान खाली घालून घेतली.  बाहेर गेला, रडत उभा राहिला.  बराच वेळ गेला.  दुसरा आला.  म्हणाला, सर्व्हर रडतो आहे.  मी त्याला आत बोलावले.  तो म्हणाला, साहेब, कसं सांगू ?  एवढ्या पैशात १ किलो तांदूळ मिळेल.  मी खजिल झालो.  घरात जाऊन २००० रुपये आणून दिले.  काय आहे लक्ष्मण, अशा गोष्टींसाठी मला कधी लक्षच घालावे लागले नाही.  सोन्याचे मंगळसूत्र केवढ्याला मिळते असे मी त्यांना विचारीत नसे.  बॅग भरणे, कपडे शिवून आणणे, मी कधी केले नाही.  मधूनमधून डोळे पुसण्याचा कार्यक्रम सुरू होता.

डॉ. मोहिते त्यांचे एक मित्र.  साहेबांची परवानगी घेऊन गेले.  अप्पासाहेबही काही कामासाठी विचारून गेले.  आम्ही दोघेच बोलत बसलो.  कुणाचीतरी ते वाट पाहत होते.  संस्था कशी चालवावी लागेल, ती भटक्याविमुक्तांसाठी आहे हे लक्षात घ्या, कामाची माणसे जवळ ठेवा.  नुसत्या चर्चा नकोत.  सारे एकहाती आहे.  सारा कारभार तुम्हाला करायचा आहे.  आम्ही सच्चे मित्र आहोत.  संशोधनासाठी फार काम आहे.  मी डी.डी.नरूला नावाचे आय.सी.एस.एस.आर. या दिल्लीतल्या संस्थेचे प्रमुख आहेत त्यांना पत्र लिहितो.  नरसिंहराव मानव संशोधन खात्याचे मंत्री होते, त्यांना लिहितो.  संशोधन प्रकल्प तयार करा.  तो कसा करायचा ते सांगतो.  बसा असे, खुर्ची इकडे घ्या.  मी जरा पडतो.  मला थिसीस ऍंटी थिसीस सारे सांगितले.  प्रश्नावल्या करणे, भरून आणणे हे सारे सांगू लागले.  संशोधन पद्धतीबद्दल मी पहिल्यांदाच ऐकत होतो.  भटक्याविमुक्तांचे संशोधन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  आदिवासींच्या अनेक जमातींचा अभ्यास झालाय, मात्र या जमातींचा राहून गेलाय.  तो झाल्याशिवाय राज्यकर्त्यांना, अभिजनवर्गाला ते समजणार कसे ?  साहेब मला तळमळीने समजावीत होते.  मी भारावून गेलो होतो.  या जबाबदार्‍या साहेब माझ्यावर टाकत होते.  माझ्या बापजन्मात संशोधन हा शब्दसुद्धा कुणी ऐकला नव्हता.  मला ते करायचे होते.  पण साहेब होते ना बरोबर, त्याने धीर येत होता.  बघता बघता साहेबांचा डोळा लागला मी तसाच बसून राहिलो.  थोड्या वेळाने प्रतापराव भाऊ कुणाला तरी घेऊन आले.  आवाज आल्याबरोबर साहेब पटकन उठून बसले.  लक्ष्मण, डोळा लागला वाटते.  दारावरची बेल वाजली.  मी दार उघडले.  भाऊ आत आले.  साहेब उठले.  तुम्ही आहात होय, मग काय साहेबांना छान कंपनी मिळाली.  मी उभा होतो.  भाऊ म्हणाले, बसा, बसा.  साहेब आतून आले ते तयार होऊन.  चला प्रतापराव, लक्ष्मण, कागदं वाचून घ्या.  पुढच्या आठवड्यात पुण्यात भेटू.  मी निरोप देतो तुम्हाला, म्हणाले नि विषय न वाढवता बाहेर पडले.  मी कागदांची पिशवी घेतली.  मीही बाहेर पडलो.

त्यानंतर दोन-तीन वेळा आमच्या बैठका झाल्या.  संस्थेची घटना तयार झाली.  २ ऑक्टोबर १९८३ रोजी संस्था रीतसर धर्मादाय आयुक्तांकडे नोंदली गेली.  भारतीय भटकेविमुक्त विकास व संशोधन संस्था, सातारा ही संस्था भटक्याविमुक्तांसाठी काम करणारी शिक्षण संस्था स्थापन झाली.  आपल्या विद्यापीठाच्या अनेक उणिवा साहेब मला सांगत होते.  संशोधन पद्धतीतील करायची कामे, संशोधन पद्धती ते कितीतरी वेळा मला सांगत होते.  त्यावेळी काय शिक्षणाचे करायचे पण आश्रमशाळा हा विषयही कधी निघाल्याचे आठवत नाही.  संशोधन संस्था असेच स्वरूप त्यांना अपेक्षित होते.  संस्थेची ध्येयउद्दिष्टे मी लिहिली.  किशोर बेडकिहाळ व मी सुरुवातीला हे काम करीत होतो.  डॉ. दाभोळकरांना पहिले अध्यक्ष म्हणून निवडले.  संस्था रजिस्टर झाल्यावर साहेबांचे संमतीपत्र आले आणि संस्थेचे अध्यक्ष यशवंतरावजी चव्हाण झाले.  परंतु काही वैचारिक मतभेदांमुळे डॉ. दाभोळकर, किशोर बेडकिहाळ संस्था सोडून गेले.  मी आणि माझे सहकारी काम करीत राहिलो.  जातवार कार्यकर्ते प्रशिक्षण शिबिरे सुरू केली.  संशोधन प्रकल्प तयार झाला.  आता त्याला आर्थिक साहाय्य हवे होते.  'बंद दरवाजा' पुस्तकरूपाने आणायचे होते.  'ग्रंथाली'ने प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.  मी सारी जुळवाजुळव सुरू केली.