• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २२-१६०९२०१२-२

पक्षी धरतो, त्यावर पोट भरत नाही.  दुसरे काही येत नाही.  त्यात आमचे नाव कानफाट्या पडल्याने कोणीसुद्धा जवळ घेत नाही.  मग नोकरी कोण देणार ?  फासे लावण्यापलिकडे आम्हाला येतेच काय ?
म्हणून काय लोकांची घरे फोडायची ? जगण्यासाठी दुसरे काय करायचे ?  पोटापुरते जगायला काय बाय मिळाले तर चोरीमारी कशाला कोण करील ?  चोरीचे काम वंगाळ आसतया ही समाजतयाकी आमस्नी.  पर पोटात भूकंचा जाळ निघाला की काय सुचत नाय.  डोस्कं फिरतया.  आन मंग आसली चोरीमारी करतोय.

महाराजांना प्रश्नाचे मूळ सापडले.  त्यांनी पारध्यांना बायापोरांनिशी सोनतळीला हलवले.  त्यांना घरी शिधा देण्याची व्यवस्था केली.  अनेक दिवस विचार केला.  अनेक प्रकाराने त्यांच्या इमानदारीची परीक्षा केली आणि सारा कॅम्प त्यांच्या ताब्यात दिला.  तिन्ही गेटवर ते वॉचमन होते.  पुढे खाजगीतली राखणही या पारध्यांना दिली.  त्यातल्या प्रत्येकाला काम मिळावे म्हणून बांधा-पाडा योजना सुरू केली.

मी हे सांगत होतो तोवर गाडी कावळानाक्याला पोहचली.  गाडीने वळण घेतले आणि रसिकभाई शहा यांच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये थांबली.  आमचे बोलणे तेथेच थांबले.  रसिकभाईंनी साहेबांचे हसतहसत स्वागत केले.  मी गर्दीत बदकून मागे होतो.  साहेबांनी हाक मारली.

लक्ष्मण, चला.  रसिकभाई, हे लक्ष्मण माने.  माझे तरुण मित्र.  मराठीतले मोठे लेखक आहेत.  लक्ष्मण हे रसिकभाई, माझे खूप वर्षांपासूनचे मित्र आहेत.  बाकी जे काही आहेत ते त्यांच्या कर्तबगारीने आहेत.  या आत या.

आम्ही सारे दिवाणखान्यात बसलो होतो.  साहेब फ्रेश व्हायला आत गेले.  श्रीपतराव बोंद्रे यांनी दोन कार्यक्रम ठेवले होते.  दिवसभराचे कार्यक्रम संपले.  नि पुन्हा आम्ही कराडला यायला निघालो.  आता पुन्हा आमचे बोलणे सुरू झाले.  हा लक्ष्मण, सांगा तुमची बांधा-पाडा योजना.

साहेब, हा कॅम्प मोठा विलक्षण होता.  पारधी, डोंबारी, माकडवाले या कॅम्पवर सहकुटुंब महाराजांनी वसतीला ठेवले होते.  त्यांना शिधासामुग्री संस्थानच्या खजिन्यातून मिळत होती.  कुणी भीक मागायची नाही.  चोर्‍या करायच्या नाहीत.  डोंबार्‍याचे ही तसेच होते.  काही केल्या एका घरचे खाऊन पोटच भरायचे नाही.  गाव मागून खाल्ल्याशिवाय बरेच वाटायचे नाही.  शिधा दिला तरी तो शिधा बाजूला ठेवून चोरून पळून जात आणि भिक मागून आणीत आणि जेवण करीत.  महाराजांनी उठावे, यांना माणसाळवण्यासाठी प्रयत्‍न करावा.  बरे, हे सारे बिनकष्टाचे मिळतेय.  यांना कामाची सवय लागावी म्हणून महाराजांनी एक योजना आखली.  सोनतळी कॅम्पवर छोट्या छोट्या पण साध्या इमारतींची बांधकाम काढली.  तीही कच्च्या विटांच्या वापराने.  आपण त्याला भेंडे म्हणतो ना तसे.  आधी भेंडे पाडायचे, वाळवायचे आणि मग वापरायचे.  पारध्यांना, डोंबार्‍यांना, माकडवाल्यांना कामे देण्यासाठी ही कच्च्या बांधकामाची युक्ती महाराजांनी काढली होती.  खाणही सुरू केली.  खाणीतला दगड काढायचा, मातीच्या विटा करायच्या.  या विटातली घरे पावसाळा आला की राहायला वापरायची.  पावसाळा संपला की पाडायची.  पुन्हा बांधकाम सुरू करायचे.  रोजगार मिळाला पाहिजे.  यांना कष्टाची सवय झाली पाहिजे.  राजकारभारातले लोक फार नाराज असायचे.  महाराज हा पैसा वाया घालवीत आहेत.  तिजोरीतला पैसा नाहक खर्च होतो आहे.  अशी टीका व्हायची.  महाराजांनी असल्या टिकेला कधी भिक घातली नाही.  फासेपारध्यांना जर माणसांत आणायचे असेल तर त्यांना जवळ घेतले पाहिजे. दूर लोटून उपयोग होणार नाही.  महाराजांनी त्यांना आपल्या जवळ घेतले.  आईसारखी त्यांच्यावर माया केली.  बांधकामावर स्त्रीपुरुषांना काम दिले.  पारध्यांवर त्यांचा फार विश्वास होता.  ते इमानदारीने राखण करतात की नाही हे तपासून ते पाहत.  

एकदा रात्री दोन-अडीच वाजता उठले ते पहारा देतात ते जागे आहेत की नाही हे पाहण्यासाठी.  त्यांनी पाठीवरून एक-दोन डबे घेऊन जाताना जसा आवाज होईल तसा आवाज त्यांच्या पहार्‍याच्या ठिकाणापासून चारपाचशे फुटांवर महाराजांनी करविला.  एका क्षणात जेथून आवाज आला होता अगदी त्या जागेवर लागलीच गोफणीने दोन धोंडे आले.  बरे तर बरे की ज्यांनी तो आवाज केला होता ते दोघे जवळ असलेल्या एका खोपटाच्या आडोशाला पोहोचले होते.  पारधी कसोटीला उतरले होते.  

महाराज एकदा तोफखान्यांना म्हणाले, हे बगा तोफखाने, तुमचे हे अधिकारी.  मला या असल्या नाकउडव्या अधिकार्‍यांचा अत्यंत तिटकारा आलेला आहे.  ते नाक फुगवून, गंभीर चेहरा करून असे काही माझ्यापुढे उभे राहतात की जणू काही त्यांचे घर कुणीतरी फोडले आहे.  आणि त्याची सारी जबाबदारी माझ्यावर आहे.  या अधिकार्‍यांची तोंडे पाहणे नको असे अलिकडे मला वाटू लागले आहे.  एकीकडे हे असले अधिकारी नि दुसरीकडे केवळ खुशमस्करे निर्लज्ज लोक पाहून मन विटून गेले आहे.  तोफखाने अहो, मला जनावरांच्या तांड्यात बसून राहणे बरे वाटते.  तेथे नाकउडवेपणा नाही, लबाडी नाही.  चहाडी, चुगली नाही.  विश्वासघातासारखे प्रकार नाहीत.  तुमच्या या शहाण्या माणसांपेक्षा मला हे फासेपारधी बरे वाटतात.  फसवेगिरी नाही, दिवसभर त्यांच्यासोबत बसलो तरी कंटाळा येत नाही.  भूक लागलेली देखील समजत नाही.  बोलण्यात ती अडाणी वाटतात, पण प्रामाणिकपणा हा त्यांचा मोठा गुण आहे.