• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १९-८९२०१२

पत्र  -१९
दिनांक ०८-०९-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

१९८० च्या लोकसभा निवडणुका लागल्या.  देशात मोठी विचित्र परिस्थिती होती.  ७८ साली सत्तेत आलेला जनता पक्ष म्हणजे आम्हा सर्वांच्या प्रेमाचा विषय होता.  खूप अपेक्षा होत्या.  लोकशाही समाजवादाची वाटचाल वेगाने होईल अशी अपेक्षा होती.  पण आवळ्या-भोपळ्यांची मोट बांधलेली.  त्या सगळ्यांत केवळ काँग्रेसविरोध एवढाच समान धागा होता.  चौघांची तोंडे चार बाजूला.  आर.एस.एस. सारखी प्रतिगामी संघटना- तिच्यात वाढलेले वाजपेयी आणि अडवाणी, समाजवादाचे कट्टर समर्थक जॉर्ज फर्नांडिस, मधु लिमये, संघटना काँग्रेसचे मोरारजी देसाई.  चरणसिंग, राजनारायण यांची टीम.  त्यांचे सूप अवघ्या दोन वर्षात वाजले.  १९७७ साली काँग्रेसचे पानिपत झाले.  यशवंतराव विरोधी पक्ष नेता झाले.  मुख्य म्हणजे, इंदिरा गांधींचा पराभव झाला.  काँग्रेसच्या हातात दिल्लीचे सरकार राहिले नाही.  स्वातंत्र्यानंतर असे पहिल्यांदाच घडले होते.  अल्पमतातील काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष झाला आणि साहजिकच यशवंतराव विरोधी पक्ष नेते झाले.  जनता सरकार आणि इंदिरा गांधी यांच्यातले बखेडे रोज नवे नवे विषय घेऊन उभे राहत होते.  जनता सरकारने इंदिरा गांधींवर अनेक खटले दाखले केले होते.  इंदिराजींनी संसदेबाहेर तीव्र संघर्ष सुरू केला.  यशवंतराव प्रगल्भ नेत्यासारखे विरोधी पक्ष नेता म्हणून काम करीत होते.  त्यांची भाषणे गाजत होती.  मिस्कील चिमटे काढीत ते सत्ताधार्‍यांना खडे बोल सुनावत होते.  त्यांनी जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी असे तीन प्रधानमंत्री पाहिले होते.  तिघांबरोबर काम केले होते.  त्यांना कामाचा दीर्घ अनुभव होता.

याउलट जनता पक्षातले पुढारी आयुष्यभर पराभूत मानसिकतेत वाढले होते.  त्यांची सगळी कारकीर्द विरोधी पक्षातली, चळवळींची.  बिनधास्त भाषणे, बेजबाबदार, बेदरकार बोलणारे सगळे.  वावदूकपणा हा अनेकांचा स्थायिभाव होता.  आणीबाणीच्या काळात आणखी एक मोठी घटना महाराष्ट्रात घडली.  मुख्यमंत्रीपदावर दीर्घकाळ राहिलेले मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला.  त्यांच्या जागी शंकरराव आले.  'एक कडक हेडमास्तर' असेच त्यांचे चित्र.  आणीबाणीनंतर इंदिरा गांधींबरोबर राहिलेल्या यशवंतराव, ब्रह्मानंद रेड्डी, स्वर्णसिंग यापैकी कोणावरच इंदिराजींचा विश्वास राहिला नव्हता.  हे थकलेले नेते आता जनता सरकारबरोबर लढू शकतील, असे त्यांना वाटेना.  ज्याप्रकारे त्या लढू मागत होत्या, तसली लढाई हे नेते करू शकत नव्हते.  जनता सरकारने इंदिराजींवर खटला भरला होता.  त्यांना अटक केली होती.  त्यात सरकारची मोठी फजिती झाली.  त्यातच आणखी एक गोष्ट घडली.  बेलची या बिहारमधील खेडेगावात दलितांवर झालेल्या अत्याचारावेळी गृहमंत्री चरणसिंग यांनी नव्हे; तर इंदिराजींनी पाण्यातून हत्तीवरून जाऊन भेट दिली.  इंदिराजींनी त्या वातावरणात कर्नाटकातील चिकमंगळूर या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली.  त्यात त्या विजयी झाल्या.  देशातले लोकमत पुन्हा एकदा इंदिराजींकडे वळू लागले.  देशभर त्यांच्या प्रचंड मोठ्या सभा होऊ लागल्या.  वातावरण वेगाने बदलू लागले.  जनता पक्षाच्या कारभाराची त्यांनीच आपापसात भांडून पार वाट लावून टाकली.

याच दरम्यान इंदिराजींनी काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सभासदत्व सोडले.

१ जानेवारी १९७८ रोजी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय परिषद घेतली.  देशापुढील आव्हानांना सामोरे जाऊन परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी या परिषदेने त्यांनाच अध्यक्ष निवडले.  त्यामुळे काँग्रेसमध्ये आणखी एक फूट पडली.  संजीव रेड्डी अध्यक्ष असलेली एक काँग्रेस आणि इंदिराजी अध्यक्ष असलेली एक काँग्रेस.  इकडे जनता पक्षात मधु लिमये, जॉर्ज फर्नांडिस यांनी दुहेरी निष्ठेचा प्रश्न लावून धरला.  जनसंघाचे मंत्री आर.एस.एस.ची निष्ठा ठेवणार की जनता पक्षाशी असे मोठे वादळ सुरू झाले.  अखेर जॉर्जनी राजीनामा दिला.  पाठोपाठ राजनारायण, चरणसिंग यांनी बंड केले.  त्याला संजीव गंधी यांनी हवा दिली.  जनता सरकार अल्पमतात आल्यास काँग्रेसच्या पाठिंब्यावर तुम्ही मंत्रिमंडळ बनवा, असा सल्ला दिला.  तो चरणसिंग, राजनारायण यांनी ऐकला आणि जनता पक्षाचे सरकार पडले.  चरणसिंग यांनी विरोधी पक्षाचे नेते म्हणून यशवंतरावांना उपपंतप्रधान पद घेण्याची विनंती केली.  ती त्यांनी मान्य केली.  पण आयत्या वेळी इंदिरा काँग्रेसने पाठिंबा देण्याचे नाकारल्याने हे मंत्रिमंडळच अस्तित्वात आले नाही.  त्या अवस्थेत लोकसभा बरखास्त करून निवडणूक घेणे क्रमप्राप्‍त झाले होते.  निवडणुका होऊन इंदिरा गांधी व त्यांचा पक्ष निर्विवाद बहुमत मिळवून अधिकारावर आला.  महाराष्ट्रातून यशवंतराव हे रेड्डी काँग्रेसचे एकमेव उमेदवार निवडून आले.