• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १५-२५८२०१२-२

सुप्रिया, यशवंतरावांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना ते मला कसे दिसले, ते कसे हसले यापेक्षा कोणत्या स्थितीत त्यांनी कोणत्या भूमिका घेतल्या हे पाहणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते.  माझ्या लहानपणी मी या स्थितीतले काही पाहू शकलो.  तुझ्या बाबांचा काळ आणखी अगोदरचा आहे.  ती.  बाईंचा काळ तर त्या अगोदरचा.  शेतीची म्हणजे 'काळी'ची स्थिती आपण पाहिली.  यशवंतरावांना मोठी जमीन नव्हती.  कायम दुष्काळी भागातला त्यांचा जन्म.  अल्पभूधारक वडील.  तेही सरकारी नोकरीला.  अल्पभूधारक शेतकरी म्हणजे शेतमजूरच.  शेतमजुरांच्या पोराच्या हातात कारभार आला.  तो बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या महान संविधानाने.  सत्तेचा वापर गोरगरीब रयतेसाठी करावा; सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे, सत्ता पाझरत सामान्यातल्या सामान्य माणसांपर्यंत जावी, सामान्य माणूस लोकशाहीत राजा व्हावा, तो राणीच्या पोटी नव्हे; तर मतपेटीतून जन्माला यावा ही त्यांच्या घटनेने दिलेली धारणा आहे.  प्रत्यक्ष स्थिती मात्र विपरीत होती.  आता त्या स्थितीबद्दल थोडे सांगतो.  गावगाडाकार त्र्यं. ना. अत्रे यांनी त्यांच्या 'गावगाडा' या ग्रंथात फार छान मांडणी केली आहे.  भाषा थोडी जुनी आहे.  तुला समजायला थोडी अवघड आहे, पण ती समजून घेतली पाहिजे.  गावगाडा आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील सत्ता काय होती, जिच्याविरुद्ध यशवंतरावांना संघर्ष करावा लागला ?  त्यांनी तो मुख्यमंत्रीपद कसाला लावून केला ?  काय बदलले त्यांनी ?  ग्रँट डफ हे इतिहासकार म्हणून माहीत आहेत.  ते आपल्या सातार्‍यात कलेक्टर होते.  ते काय म्हणतात बघ, मोठे सरकार, त्यामध्ये परगणा, त्याचे आंत कर्यात तिच्यापोटी समंत, तिचेमध्ये महाल, त्याचे आत तालुका, मराठाशाहीत सुमारे साठपर्यंत गावे मिळून महाल किंवा परगणा व काही परगणा मिळून सुभा, ह्याप्रमाणे राज्याचे विभाग केले होते.  डोंगराच्या किंवा जंगलाचा भाग अमुक एका गावाच्या हद्दीत सामील केला नसल्यास त्याला तरफ घालत.  साधारणतः महालाचे क्षेत्र परगण्यापेक्षा लहान असे.  सुभ्याला सरकार प्रांत किंवा देश म्हणत.  प्रांतावर सुभेदाराचा अंमल होता.  सुभ्यावर कुलअखत्यार सुभेदाराचा असे व आतल्या महाल परगण्यावर हवालदार, कमाविसदार, मामलेदार, वगैरे अधिकार्‍यांच्या नेमणुका तो करी.  पुढे पुढे हवालदारी वंशपरंपरेने चालू लागली आणि हवालदार वतनदार बनले.  मामलकीत एक ते तीन परगणे येत.  सरपाटील, सरदेशमुख, सरदेशपांडे, सरदेसाई, व सरनाडगौडा हे सर्वांत वरिष्ठ दर्जाचे वतनदार अधिकारी होत.  दर प्रांताला दिवाण, फडणवीस, पोतनीस, मुजुमदार हे वतनदार सुभेदार असत.  त्यांना दरकदार म्हणत.  पोतनीसाकडे प्रांताचे नगदीचे हिशेब व फडणवीसाकडे संबंध दप्‍तर होते.  परगणे पाटील, देसक, देशमुख, देशपांडे, देश कुलकर्णी, देश चौगुला, परगणे-नाईक, महाल-नाईक, हे मुख्य वतनदार परगणे अंमलदार होते.  त्यांना जमेदार, महाल जमेदार, जमीनदार अथवा हक्कदार म्हणत.  गावाला जसे पाटील, कुलकर्णी, जागल्या; तसे परगण्याला देशमुखय, देसकुलकर्णी, देशपांडे, देस चौगुला, परगणेनाईक हे होते.  देशमुख, देश चौगुला हे मराठे, देशपांडे ब्राह्मण व महाल नाईक भिल्ल, रामोशी किंवा कोळी असत.  वतनाप्रीत्यर्थ मुसलमान झालेले देशमुख, देशपांडे, परगणेनाईक कुठे कुठे होते.  सर्व ग्राम अधिकारी वंशपरंपरेने हुद्देदार होते.  या वतनदारांच्या अधिकारात केवळ महसुली अंमलच नव्हता, तर गावच्या नित्यनैमित्तिक गावकी व घरकी व्यवहाराला उपयोग असे कारू-नारू, उदाशी, तमासगीर भिक्षुक वगैरे सर्वजण येत.

दर गावाला पाटील असतो.  पाटील हा कोणी राजाने दिलेला हुद्दा नसावा.  जातपाटलाच्या नमुनयावर सर्वश्रेष्ठ गावमुकादमाचे पाटील हे नाव ठेवले असावे.  जातपाटलांचे वर्णन दिले आहे त्यावरून गाव पाटलाच्या दर्जाची व अधिकारी मर्यादेची अटकळ बांधता येईल.  जातपाटलाचे सर्व अधिकारी गावपाटलाला असून खेरीज तो गावातला राजाचा प्रतिनिधी होता व आहे.  पाटलाला गावचा प्रभू म्हटले तरी चालेल.  बहुतेक गावामध्ये सुरक्षिततेसाठी इतर वस्ती मध्य भागात व पाटीलगळ गावकुसाजवळ मार्‍याच्या ठिकाणी घडलेली दिसते.  गाव वसविणारा पुढारी बहुधा गाव पाटील झाला.  ज्यांनी गाव वसविला त्या मिरासदारांपैकी पाटलांचे घराणे प्रमुख व म्हणून गावात मानाने सर्वांत वडील असायचे.  जो गावाची बाजू सावरून व उचलून धरणारा आणि गावाला घेऊन चालणारा म्हणून रयतेला पटला आणि सरकारी काम, वसूल वासलात बंदोबस्त बिबोभाट करणारा म्हणून सरकारला पटला, तो गावाला पटला, तो गावचा पाटील झाला.  पाटलांना गावापुरते मुलकी, दिवाणी, फौजदारी, कुळाधिकार असत.  सर्व पाटील घरंदाज व त्यातले बहुतेक सरदार असल्यामुळे त्यांना राजाचे बहुतेक अधिकार मिळाले व ते त्यांनी नेकीने गाजवले.  भोसले, दाभाडे, पवार, गायकवाड, शिंदे, होळकर, ह्यांनी राज्ये कमावली तरी ते पाटीलकीला कवटाळून राहिले आणि त्यांनी नवीन पाटील वतने संपादन केली.  महाप्रभावशाली महादजी शिंद्यांना पाटील म्हणवून घेण्यात भूषण वाटे, हे इतिहासप्रसिद्ध आहे.  'उतरंडीला नसेना दाणा, पण दादला असावा पाटीलराणा' किंवा 'दोन हाणा, पण पाटील म्हणा' या म्हणी पाटलाचा मानमरातब व्यक्त करतात.