• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १०-१५०७२०१२-१

दुसर्‍या दिवशी जत्रंला जाऊन यावं तसं गुलालानं सारी कापडं लालभडक झालेले लोक तीर मारून आल्यासारखे गावात मिरवीत व्हते.  ज्यो त्यो त्यांना मान देत होता.  इठलाला जाऊन आल्यावर वारकर्‍याला जसं गावात मान मिळतुया तसा ह्या लोकान्ला मान मिळत व्हता.  प्रत्येकजण इचारीत होता, कसं दिसलं रं यशवंतराव ?  आन् नेहरूस्नी बगीतलसं का रं ?  कसं बोलत्यात ?  मराठीतनं बोलले का विंग्रजीतनं रं ?  मग मोठा आव आणीत तो सांगायचा, 'लय मैंदाळी गर्दी झालीती.  आमी लांब एका टेकडीवर उभे व्हतो. जवळनं बगायला न्हाय घावलं.  यशवंतराव तेवढं बोललं मराठीतनं.  नेहरू हिंदीतलनं बोलले.  काय समाजलं न्हाय.  लांब झग्याचा नेहरू शर्ट, गांधी टोपी, जाकीट, धोतर, आन् बाकीचे बी तसेच.  'धरण धरण' बोलत व्हते.  पर पोलिस काय जावू देत नव्हते कुणाला.  तोबा तोबा गर्दी, माणसचं माणसं.'

'पर धराण म्हंजी काय आसतंया गां भानुदास ?'  बा इचारत व्हता.  मला बी कुतूहाल व्हतंच. मी पुढे सरकून ऐकू लागलो.  'मला तरी काय समाजतंया ?  पार ऐकल्यालं सांगतू झालं.'

'हां, सांगा' बानं हातातलं टोपलं तसंच बाजूला सारलं.  तंबाकू काढली. भानुदासाला दिली.  तंबाकूचा चुना लावीत त्यो सर्गात जाऊन आल्यावाणी सांगायला लागला.  'बापू नदी कवा बगीतलीयास का ?'

'व्हय.  बगीतलीया की.  कोकणात पोटं भरायला जाईन आसतूना तवा.'
'मंग किसना बगीतलीयास ?'
'न्हाई बा.'
'मंग कोयना बगीतलीयास ?'
'न्हाईबा.'
'मंग आस हाय बग.  किसना, कोयना, येण्णा, गायत्री, सावित्री ह्या पाच भनी, शंकराच्या लेकी.  महाबळीसरात शंकराच्या जठतनं निघत्यात केसावाणी, मंग धार होतीया करंगळीवाणी, ती येतीया एका कुंडात, कुंडातनं पाचजणी पायवाटंनं निघत्यात.  तिघी मावळतीला आन् दोगी उगवतीला.  थोरली किसनाबाय, ती वाईला येतीया.  दुसरी येणामाय.  ती महाबळीसरातल्या कड्याकपारीनं, किरणं मारीत येतीया मावळतीला.  किसनाबायला मिळतीया.  तिघीतली एक मावळतीला बरीच म्होरं जाती आन् एका डोंगरवड्याला येढा मारीत पुन्हा डावीकडं वळती आन् दोन पहाडाच्या मधनं वाट काडीत काडीत एकटीच सुसाट किरणं टाकीत झेपा टाकीत निगालीती कोयनामाय.  आन् ततनं सागराला मिळत्यात.  त्या धाकल्या दोगी गायत्री आन् सावित्री.  कोयनामाय तेवढं लांबच्या लांब ढेंगा टाकीत महाबळीसराच्या डोंगररांगा मागं सारीत कराडाला किसनामायला मिळती.  पाऊस काळात कोयनामाय म्हंजी राक्षीसासारखं अक्राळविक्राळ रूप धारण करतीया.  समदं कराड पाण्याखाली जातंया.  यशवंतरावांचा जीव ह्या संगमावर जडल्याला.  लहानाचं मोठं झालं त्ये ह्या संगमावर.  किसनामाई, कोयनामाई म्हंजी यशवंतरावाला जीव का प्राण.  किसनाकाळ म्हंजी दह्या-दुधाची धार.  तुपाची, लोण्याची रेलचेल.  तासन् तास नदीतल्या डोहात यशवंतराव पोहलेले.  दोन्ही नद्यांचे महापूर आणि उडालेला हाहाकार, पुरातलं बेफाट पाणी-सारंच यशवंतरावांना घडवणारं जीवन.  ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि कोयनामाईच्या या पुत्रानं तिलाच आडवण्याचा घाट घातला.  देशाला उजेडाचं स्वप्न पडलेलं.  यशवंतरावांनी उजेडाचं स्वप्न खरं करण्याचं ठरवलं.  तज्ज्ञ माणसं जोडली, कामाला लावली.  सारं कसब पणाला लागलं.  आख्खी कोयनामाय आडवायची.

'म्हंजी ?'  बा म्हणला.

'म्हंजी का हातानं आडवायची व्हय येड्या ?  समंदी इंजिनेर, हाजारो माणसं, धूड यंत्र कामाला लागली.  दोन डोंगराच्या भक्कम टेकड्या निवाडल्या.  दोन टेकड्यास्नी जोडायचं.  पायाला शिसं वतलं म्हणत्यात.  मंग दगडांची भली दांडगी भिंत बांधली.  पाणी सोडायला दारं केली.  लय पाणी झालं तर सोडायला डोंगरायेवढाले दरवाजे केले.  चारपाच वर्षे काम चाललं. आन् काल नेहरूंनी त्याचं उद्‍घाटन केलं.  यशवंतरावांनी लय काळजात ठिवाव तसं भाषाण केलं.  कोयनामाईची खणानारळानं वटी भरली.  शेतकर्‍यांच्या लेकरानं केलेले हे अचाट काम बघून सारा शेतकरीवर्ग गहिवरून आलाता.  यशवंतरावांची कीर्ती दाही दिशाला पसरू लागली.  आता मोठमोठं पूर येणार नाहीत.  कराड, सांगली पुरात जाणार नाहीत.  शेकडो मैलांचा डोंगरकड्याकपारीचा शिवसागर तयार झाला.  महाबळीसरापास्नं ते पाटणपर्यंत कोयनानगर वसवून सार्‍या राज्याला दिपवून टाकील आसं धरण यशवंतरावांनी बांधलं.  आता सारी लाईट राज्याला मिळंल. यशवंतराव म्हणाले.  आता कुणाच्याच लेकराच्या नाकाला काजळी साठायची न्हाय. परत्येकाच्या गावात-घरात उजेड येईल.  सारं उजाडेल, समृद्धीचं पीक गावागावांत फोफावेल.'

जणू गरिबाघरी ग्यान आलं की व्हते अशी क्रांती.  घराघरात मायमावल्या जात्यावर दळताना-

'बंधुराया माझा यशवंता, बांधी कोयनामाईला धरणं.
इकासाचं ग धोरण, त्यानं बांधीयलं तोरण'

म्हण गाणी गायला लागल्या.  यशवंत गुणवंत झाला, सातार्‍याचा अभिमान झाला.

सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका