• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

अभिनंदन ग्रंथ - महाराष्ट्रांतील बुद्धिवाद

महाराष्ट्रांतील बुद्धिवाद

श्री. ह.रा. महाजनी, संपादक, लोकसत्ता, मुंबई

असहकारितेच्या चळवळींत मी होतों, तेव्हापासून महाराष्ट्र बुद्धिवादी असल्याचा दावा मी ऐकत आलों आहे. १९२७ च्या सुमारास महाराष्ट्रामध्ये फेर आणि नाफेर पक्षाची लढत ऐन रंगांत आली होती. त्यावेळी महाराष्ट्रांत टिळकपंथीय फेरवादी पक्षाचा जोर होता. नाफेरवादी म्हणजेच कट्टर गांधीवादी त्या मानाने मागे पडले होते. पुणेकर विद्वानांच्या उपहासाचा विषयहि झाले होते. वादामध्ये दोघेहि इतर प्रांतांपेक्षा महाराष्ट्र बुद्धिवादी आहे असें सांगत असत. मात्र नाफेरवाद्यांच्या मताने महाराष्ट्रांचा बुद्धिवादच महाराष्ट्र मागे पडण्यास कारणीभूत झालेला होता, तर फेरवाद्यांना महाराष्ट्र बुद्धिवादी असल्याबद्दल अभिमान वाटत होता. नाफेरवादी महात्माजींचे पुढील उद्धार सद्धदित अंत:करणाने सांगत असत की, "महाराष्ट्र म्हणजे विधायक कार्यकर्त्यांचें मोहोळ आहे; पण महाराष्ट्रांत श्रद्धा नाही." उलटपक्षीं त्यावेळेचे टिळकपंथीय फेरवादी अभिमानाने महाराष्ट्र बुद्धिवादी असल्याचा उल्लेख करीत. महाराष्ट्र बुद्धिवादी असल्यानेच महाराष्ट्रांत गांधीवादाची जम बसणार नाही, असा त्या अमिमानामागचा भावार्थ. बुद्धिवादापासून असे दोन टोकाचे दोन निष्कर्ष निघालेले पाहून विचारी मनाला क्षणभर गम्मत वाटल्यावाचून राहणार नही. बुद्धिवाद इतका लवचिक कसा असा संदेहहि मनांत निर्माण होईल. परंतु अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत असल्या तरी महाराष्ट्र बुद्धिवादी आहे यावरची आपली श्रद्धा कायम आहे. त्या श्रद्धेची थोडी तपासणी झाली पाहिजे.

इंग्रजींत ज्याला 'रॅशनॅलिझम्' असें म्हणतात, त्याचा 'बुद्धिवाद' हा मराठी तर्जुमा होय. पण मी बुद्धिवाद हा शब्द या अर्थाने वापरीत नाही. म्हणून बुद्धिवादाविषयी थोडा अधिक खुलासा करतों. प्रथमच हें सांगितलें पाहिजे की, बुद्धिवादी आणि बुद्धिजीवि यांत फरक आहे. बुद्धिजीवि म्हणजे बुद्धीवर जगणारा. यामध्ये मानवी बुद्धीच ब-यावाइटाचा अथवा कार्याकार्याचा अंतिम निर्णय घेणारें साधन आहे या तत्त्वाचा संबंध येत नाही. श्रमजीवि जसे श्रम विकतो तसा बुद्धिजीवि बुद्धि विकतो. बुद्धि त्याच्या चरितार्थाचें एक साधन असते. बुद्धिजीवि लोकांना अनेक बुद्धिमान अशूं शकतील; नव्हे आहेतहि. परंतु त्या बुद्धीचा उपयोग कशासाठी करावयाचा हें त्यांच्या स्वाधीन नसतें. "मी तो हमाल भारवाही' ही त्यांच्या बुद्धीची स्थिती. बुद्धिवादाचें याच्या उलट आहे. जीवनाचें एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून बुद्धिवादांत बुद्धीला स्थान आहे. जीवनांतील महत्त्वाच्या समस्या सोडविण्याच्या कामांत बुद्धि हेंच सर्वश्रेष्ठ प्रमाण होय ही श्रद्धा या बुद्धिवादांत गृहीत धरलेली आहे. "बुद्धीवर श्रद्धा' हा कित्येकांस वदतो व्याघात वाटण्याचा संभव आहे. पण तसें नाही. कारण बुद्धिवाद म्हणजे केवळ तार्किकता अथवा तर्ककर्कशता नाही. या सृष्टींतील यच्चयावत् रहस्ये अथवा जीवनांतील सर्व समस्या बुद्धीच्या साहायाने सुटतील असा बुद्धिवादाचा दावा नाही. श्रेष्ठ लोकांनी तत्त्वज्ञान, नीति, विज्ञानें, निर्माण केलीं अथवा त्यांत भर घातली त्यांच्यावि,यी बुद्धिवादाला अनादत वाटत नाही. बुद्धीची अपूर्णता आणि पूर्वाचार्यांचें मोठेपण मान्य करुनहि जीवनांत असे कांही प्रसंग येतात कीं, त्यावेळी मोठ्या व्यक्तींनी सांगितलेले तत्त्व आपल्या बुद्धीला किंवा विचाराला पटत नाही. अशा प्रसंगी व्यक्ति मोठी आहे म्हणून तिनें सांगितलेलं तत्त्व, सत्य अथवा ज्ञान आपल्या बुद्धीला पटत नसलें तरी आपण मान्य केलें पाहिजे ही सक्ति बुद्धिवाद मान्य करूं शकत नाही. अंतत: माणसाच स्वत:च्या बुद्धीवर म्हणजे स्वत:चा स्वत:वर विश्वास असला पाहिजे.

विचारशक्तीला आवाहन हें नैतिक मूल्य आहे.

रॅशनॅलिझम आणि बुद्धिवाद यांत फरक असा की, रॅशनॅलिझम संपूर्ण तर्कवादी आणि सर्वांचा अधिक्षेप करणारा वाद आहे. बुद्धिवाद साक्षेपी आहे. माणसाच्या विचारशक्तीला आवाहन करणें हें एक नैतिक मूल्य आहे ही बुद्धिवादाची धारणा आहे. भावनेला आवाहन करणें यांत धोका आहे. मग तें आवाहन प्रेम भावनेला केलेलें असो अथवा अन्य कोणत्याहि भावनेला केलेले असो. कारण जो आत्यंतिक प्रेम करू शकतो तोच आत्यंतिक द्वेषहि करू शकतो. भावनेच्या भूमिकेवरून निर्माण होणारा आपपरभाव मित्र आणि शत्रु, राजे आणि दास, जित आणि जेते अशीं द्वंद्वें निर्माण करतो. उलट विचारशक्तीच्या भूमिकेवरून आपपरभाव शेजारधर्माला जन्म देतो. तेव्हा बुद्धिवाद ही एक तार्किक कसरत नसून एक नैतिक मूल्य आहे असें आपण मानलें की जीवनाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टींत आमूलाग्र बद्ल होणें स्वाभाविक ठरतें. या साक्षेपी बुद्धिवादानेच मानवी ज्ञानाची कक्षा वाढविली आणि अनियंत्रित राजेशाहीकडून लोकशाहीकडे मानव समाजास नेलें अशी साक्ष इतिहास देईल. बुद्धीवरील श्रद्धेनेच गॅलिलिओने बायबलविरुद्ध बंड उभारलें आणि या श्रद्धेनेच ब्रूनोला जिवंत मरण पत्करण्याचें धैर्य आलें. प्राचीन शास्त्रांची, स्वीकृत मूल्यांची आणि परंपरांची फेरतपासणी करून त्यांतील ग्राह्याग्राह्याचा निर्णय करण्याचें महान कार्य बुद्धिवादाच्या साहाय्यावाचून कधीच झालें नसतें. आणि हें कार्य झालें नसतें तर मानवसमाजाची प्रगतीहि झाली नसती.