• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशोदर्शन-१

निवेदन....

शालेय वर्षात प्रसिध्द होणारी हस्तलिखिते, समयकालिके व विशेषांक हे आमच्या विद्यार्थी वाङमय मंडळाचे एक वैशिष्ठ्य आहे. केवळ एखादे उदिष्ट ठरवून त्यानुसारच आजपर्यंत प्रकाशित केलेल्या हस्तलिखितांत स्वत:चे असे एक आदर्शत्व विद्यार्थ्यानी प्रस्थापित केले आहे!

श्री. नामदार यशवंतरावजींच्या वाढदिवासानिमित्त असेच एखादे समयकालिक प्रसिध्द करावे या हेतूने आम्ही प्रयत्न सुरू केले व रविवारी ८-३-५९ रात्री एकंदर हाताशी असलेले साहित्य पाहूनन ते मुद्रित स्वरूपात प्रकाशित झाल्यास फारच चांगले होईल अशी कल्पना सुचली, नि लागलीच मुख्याध्यापकांनी या योजनेला मोठया हौसेने आजचे हे स्वरूप आणून दिले!

श्री. यशवंतरावजींच्या आठवणी मुलांनी जमा करूनच लिहिल्या आहेत. छापून प्रसिध्द करण्याची कल्पना सुचल्यानंतर अत्यंत अल्पावधीत काम पूर्ण करण्याकरिता ‘दत्त प्रिंटिंग प्रेस’ चे चालक श्री. नावडीकर बंधू यांनी अतिशय परिश्रम घेतले म्हणून या सुंदर नि सुबक स्वरूपात हे यशोदर्शन वाचकाना देता आले याबद्दल आम्ही त्यांचे मन:पूर्वक आभारी आहोत!

श्री. यशवंतरावजी चव्हाण यांना समृध्द नि संपन्न दीर्घायुष्य सतत लाभो व त्यांचे हातून भारतभूची अखंड सेवा घडो अशी ईश्वराजवळ प्रार्थना करून हे निवेदन संपवितो!

विद्यार्थी वाङमय मंडळ
१०-३-५९
श्री शिवाजी विद्यालय कराड.