दरम्यान या विश्वातील प्रवेशाची वेळ जवळ येत होती व धर्म पत्नीने निरोप घेवून येथील आमच्या निवासाची, आश्रम परिसराची आवरा-आवर करण्याकरिता स्थलांतर केले. माझ्या स्थलांतरापुर्वी भोवतालच्या सर्व अनुयायांना मूळ मठाच्या अनुयायांत सामील होण्याच्या आदेश देवून त्यांच्या स्वकर्तृत्वाचा मार्ग मोकळा केला. तथापी काही होतकरू व आत्मविश्वास कर्त्यांनी आपला मठ स्वतंत्रपणे कार्यरत ठेवून त्याला कर्तृत्वाची साथ देत स्वतंत्र बाणा राखला. या तरुण अनुयायांचे नेतृत्व करणारेच आज तुमच्या मठाचे कारभारी आहेत. स्थलांतरापूर्वी त्यांना मी तसे आदेशच दिले होते कि, कोणत्याही ठिकाणाहून या आपल्या अनुयायी आश्रमाचे कारभारीपण आजवरच्या वाटचालीप्रमाणेच सातत्य राखून चालू ठेवावे. आणि ते सर्व मी अपेक्षील्या प्रमाणे सुरु आहे हे तुझ्या पत्राने अधोरेखीत झाले आहे. आजपावोतो आपल्या अनुयायी आश्रमाच्या कार्यकक्षा व समाजाभिमुख कार्यपद्धती आधुनिकतेच्या परिवर्तनानुसार परिवर्तीत होत गेली असणार यावर माझा विश्वास आहे. या विवेचनांत वापरलेला “मठ” हा शब्द राजकिय पक्षांकरिता वापरला आहे हे आतापर्यंत तुझ्या लक्षांत आलेच असेल.
या प्रस्तावनेतून आज तुझ्या करिता लिहित असलेल्या पत्राला “नमनाला घडाभर तेल” या विधानाची सलगी वाटेल. तथापी तुझ्या सर्व पत्रात “त्या” काळातील परिस्थीची ठेवण असल्याने त्या सर्व बाबींची पाश्वभूमी स्पष्ट करणे गरजेचे वाटले.
तुझे पहिले पत्र वाचून आनंद व संपर्क समाधान वाटले. आताचे पत्र वाचून आश्चर्या बरोबरच वाईट वाटले. मी स्वतः तुमच्यांत वास्तव्यात असे पर्यंत तू दिलेल्या तपशीलातील परिस्थीती काहिशी तशीच होती हे मान्य करताना माझ्या राज्यातले, माझ्या देशातले राज्यकर्ते हे सुसंस्कारित असल्याने तात्पुरत्या हेव्या-दाव्यातून बाहेर पडून पुन्हा नव्या जोमाने भावी पीढीला आवश्यक व प्रेरणादायी असणा-या २१ व्या शतकांतील परिवर्तन हे सर्वस्वी समाजाभिमुख असेल अशा वाटचालीला स्विकारतील असा विश्वास होता. माझ्या स्थलांतरा नंतर केवळ १५ वर्षाच्या काळांतील तुझ्या पत्रातील परिस्थीती मला ज्ञात होण्याकरिता पुढील दहा वर्षाचा काळ लागला यावरुन आपण सर्वच जण खचून न जाता भविष्याबद्दल आशावादी राहिलात हे भारती संस्कृतीला सुसंगतच आहे.
आपला देश पारतंत्र्यात असताना आमच्या पूर्वजांना आपण भोगत असलेले शासन हे आमचे नसून परदेशी इशा-यावर त्यांच्या स्वार्थासाठी चालले आहे हे समजण्यांस अनेक वर्षे गेली होती. माझा देश व माझी भूमी आणि येथे उत्पन्न होणारे सर्व माझ्याकरिता व माझे आहे. म्हणून याचा मालक मीच आहे. मी दुस-याचे निर्णयाने चालणार नाही असा निश्चय व त्याकरिताची पस्थापिताकडे मागणी करत हक्क सांगून स्वातंत्र्याची मागणी दशकाहून दशक वाढत गेली. ही मागणी स्वातंत्र्य मिळेपर्यंत सातत्याने तीव्र होत गेली व शेवटी १९४७ मधे आपण स्वतंत्र झालो.
तुझ्या पत्रांत तूं संबोधलेला सुवर्णकाळांतील सर्वांचाच उत्साह वाखण्यासारखा होता. तू दिलेल्या १५ वर्षांतील तपशीलाशी तुलनात्मंक दृष्ट्या सुवर्णकाळानंतर १५ वर्षे राजकीय क्षितीजावर आपआपल्या महत्वकांक्षेपोटी राजकीय पुढा-यांच्या कार्यक्षमतेचा शक्तीपात होत राहिला.
हे पाहत असता मी सुद्धा व्यथीत होतो. परिणामी विकासात्मक कामाकडे सर्वांचेचे दुर्लक्ष होत राहिले. दरम्यान शर्यंत जिंकायचा निश्चय करणारा स्पर्धक स्वतःची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतो. सक्षम बनण्याची क्षमता नसल्याची खात्री असलेला स्पर्धक प्रतिस्पर्ध्याची प्राप्त क्षमता कमकुवत करण्याचा प्रयत्नांत स्पर्धे करिताच्या तयारीच्या आपल्या वेळेचा शक्तीपात करतो. आपण मानलेल्या सुवर्ण काळानंतर आपल्या अनेक स्पर्धकांनी दुसरा पर्याय स्विकारून आपली व प्रतिस्पर्ध्याची सुसंस्कृत कार्यपद्धती, विचार, विनय व संयम यांना तीलांजली दिल्याचा प्रत्यय यायला लागला होता. कोणीही ऐकण्याच्या पलीकडे जाण्याने आम्ही काही मंडळींनी परिस्थिबाबत प्रतिक्रिया देण्यापासून मौन बाळगणेच पसंत केले होते. यावरुन तू आजच्या सामाजीक परिस्थीतीचे केलेले वर्णन प्रथमावस्थेत असतानाच माझे स्थलांतर झाले. तथापी स्थलांतरापर्यंत मी परिस्थीती सुवर्णकाळांच्या पूर्वपदावर येईल याबद्दल आशावादी होतो.