यशवंतराव चव्हाण
‘विरंगुळा’, इंद्रप्रस्थनगर,
कराड आळी, कृष्णाकाठ शेजारी,
जि. ध्रुवतारा, तारांगण महाराष्ट्र,
नभांगण भारत,
पिनः ०१९८५०२५०११०.
दिनांकः ०५-०३-२०११.
प्रति,
चि. धाकटा बाळ
अनुयायी आश्रम, विरंगुळा परिसर,
कृष्णा काठ, कराड, जि. सातारा,
महाराष्ट्र, भारत. पि.- ०२५०११०१९८५०.
अनेक आशीर्वाद,
तुझे दनांक १ जानेवारी २०११ चे पत्र मिळाले. तथापी तीन आठवड्याचे कालावधीनंतर कालच मी विश्वशांती व चैतन्य परिवाराच्या स्वास्थाकरिता “शोध सुसह्य उद्याचा” या परिषदेतील अखंड सहभागातून परतलो. या परिषदेला इकडच्या विश्वातील विद्वान, तज्ञांच्या सहभागामुळे अनेक नवीन-नवीन संकेताचे संभाव्य उगम सामान्यापासून असमामान्यापर्यंत पोहचण्यास या परिसंवादाचा निश्चीत उपयोग होईल असा मला विश्वास वाटतो.
तुझ्या पत्रातील तपशीलामुळे मला तुमच्या सान्निध्यातील वास्तव्याचा भूतकाळ नजरेसमोर आला. पारतंत्र्यातून स्वातंत्र्यांत आलेल्या माझ्या पीढीला समाजविकासाचा ध्यास लागेल असेच संस्कार लाभल्यामुळे समाजविकास व त्याची निश्चीत दिशा ठरवून एकमताने आपसांतील सहकाराची शक्ती वाढवत कामाला सुरवात केली. वास्तविक स्वातंत्र मिळवण्याकरिता एकजुटीने, एकनिर्णयाने व ध्येयसाध्यतेसाठी सामूहिक कृती करण्याची सवय बाणल्यामुळे सर्वच सहकारी नव्या दमाने व नव्या उत्साहाने कामाला लागले होते.
समाजविकास व परिसर विकास याबाबत निश्चीत परिणामाची शाश्वती न वाटणारे निवडक सहकारी कृती आराखड्याबाबत आपली नाराजी व्यक्त करत असत. तथापी अंमलबजावणीत सर्वांबरोबर असायचे. कालांतराने राज्य व देश विकासाच्या कल्पना भिन्न होत गेल्याने आम्हा सहका-यांतही स्वतंत्र विचाराने विकासाच्या कल्पना राबवण्याचा आग्रह धरण्याचा परिणाम म्हणून राजकीय वाटचालीत छोटे-मोठे घटक एकत्र येवून देशाने स्विकारलेल्या प्रजासत्ताक राज्यपद्धतीच्या माध्यमातून लोकशाही यंत्रणेद्वारे बहूमताने निवडून येणारे उमेदवार प्रतिनिधीत्व करु लागले. स्वातंत्र संग्रामात निस्सीमकर्म केलेल्या आमच्या वडीलधा-यांनी आम्हांवर केलेल्या संस्कारामुळे आमच्यातले बहुसंख्य सहकारी मुख्य राजकीय प्रवाहांत कार्यरत राहून विकासाच्या कल्पना राबवू लागलो. कायदेमंडळातील तरतूदीनुसार बहुमताने होणारे विकास कामाचे निर्णय घेण्याची आम्हाला संधी मिळाली म्हणूनच आम्ही कायदेमंडळांत सत्ताधारी पक्ष व विकास कामाबाबत आमच्या धोरणाशी विसंगत धोरण असलेल्या प्रतिनिधींचा विरोधी पक्ष म्हणून संबोधले जावू लागले.