याकरिता प्रथम देशातला नागरिक हा आदर्श ठरावा, प्रशंसनीय, व उत्तम मनुष्य ठरावा व असे ठरण्यांत असणारे सामूहिक सुख, समाधान, भविष्याची पुर्तता, सुसह्य जिवन हा परिणाम असल्याचे स्पष्ट व्हावे व यातूनच सुसंस्कृत समाजाची पुन्हा निर्मीती होवून. देशप्रेमी, आदर्श नागरिक, सुसंस्कृत समाज निर्माण होवून देशाचा सामूहिक विकास व्हावा. असा आदर्श व सुसंस्कृत समाज पुन्हा नव्याने कार्यरत करताना मनुष्य स्वभावांत सुसंस्कृत नागरिक, देशप्रेमी नागरिक, मानवता, समता, परोपकारी, परस्पर सहकार करणारा संस्कृतीचा, वडीलधा-यांचा, परंपरेचा, धर्म कर्तव्याचा आदर करणारे परिवर्तन प्राधान्याने अपेक्षीत आहे.
अन्यथा प्रचलीत कार्यपद्धती व समाज जिवन असेच पुढे चालू राहिले तर आपल्या जिवनमुल्यांची अवनती होवून आज असलेल्या अपप्रवृत्तीत वाढच होत राहून स्वतंत्र भारताच्या सार्वभौमत्वाला अपाय होईल.
चि. बाळ, तु तुझ्या पत्रातून व्यक्त केलेली समाजीक परिस्थीती मी या विश्वात अनुभवत असलेल्या परिस्थीशी विसंगत आहे हे आपण मान्य करु. तथापी मी येथे अनुभवत असलेल्या येथील समाजीक परिस्थीतीची निर्मीती व त्याचे सातत्य राखणारी आपली समाज व्यवस्था अनुभवण्याकरिता काही कठोर निर्णय व त्यांची अंमलबजावणी आवश्यक आहे. यांत आदर्श व परिपक्व नागरिक बनवण्याकरिता उगवत्या पीढीतील नवतरुणांना सुसंस्कारीत करणारी आपल्या संस्कृतीतील परंपरा कुटूंब व्यवस्थेपासून सामाजीक सहभागापर्यंतच्या व्यवस्थापनांत प्रबोधनाद्वारे होवू सकतो. याचा अनुभव आपल्या पुर्वपीढीपासूनच्या इतिहासात आहे. म्हणून सुसंस्कार व त्याकरिताचे प्रबोधन याचे सातत्य हाच यशस्वीतेकडे जाण्याचा प्रथम कार्यक्रम असावा.
याच बरोबर नागरिकाच्या प्रगतीत नवनिर्मीतीच्या कार्यपद्धतीत निसर्गाचे संतूलन जपण्याकरिता पर्यावरणाचे नियमन, निसर्गातून उपलब्ध साधनाचा काटेकोरपणे वापर, उपलब्ध नैसर्गिक संपत्तीची नासाडी काटाक्षाने टाळणे, भविष्याच्या गरजा ओळखून दूरगामी नियोजनाचा कटाक्ष पाळणे, देशातील उपलब्ध जलसंपत्तीचे गरजेच्या ठिकाणापर्यंतची उपलब्धता अवलंबणे, याबाबत कै. के. एल. राव, यांनी प्रस्तूत केलेल्या नद्याजोडणी प्रकल्पाचा प्रस्ताव अजामावणे उपयुक्त ठरु शकेल. याच बरोबर समाजव्यवस्थेच्या परिवर्ताना नुसार, गरजेनुसार बदल करण्याची मानसिकता निर्माण करणे यांत प्रचलित न्याय व्यवस्थेचा अग्रकमाने विचार करणे हा कार्यक्रम आवश्यक राहील.
वर सुचवलेल्या आदर्श व परिपक्व नागरिकाच्या निर्मीतीकरिताचा प्रबोधन कार्यक्रम हा आपल्या अनुयायी आश्रमातील प्रत्येक प्रशिक्षीत अनुयायाने अवलंबवणे कर्म कर्तव्य रहावे. नागरिक व समाजव्यवस्था आदर्श सुसह्य जीवनाकरिता उपयुक्त ठरावी याकरिताचे प्रबोधनांती कार्यक्रम राबवणारी मानसिकता कार्यरत करावी. यातूनच पुन्हा आपण राज्याच्या देशाच्या सुवर्णकाळाच अनुभव घेत सातत्य राखण्याचे महत्व जाणू शकाल.
चि. बाळ, वरिल सुचना-अपेक्षा तू, तुझे सर्वसहकारी अनुयायी आपल्या अनुयायी आश्रमातील सर्व प्रशिक्षणार्थी यांनी अमंलबजावणीच्या माध्यमातून राज्यातील देशातील समाजव्यवस्थेला दिशा यावी ही माझी अपेक्षा.
ही अपेक्षा सर्वश्रुत होईल याची पुर्तता करण्याचे भान, जाण, सामर्थ तुम्हा सर्वांना लाभावे या अमृत शुभेच्छा.
आपण हा कार्यक्रम आजच प्रारंभ करुन यशस्वीतेकडे जाण्याची गती सातत्याने वाढवत जाल व परिणामी राज्यांत देशांत सुसह्या समाज जिवनाचा अनुभव मिळेल याची खात्री वाटते.
इकडच्या विश्वात संशोधन क्षेत्रांत सुरु असलेल्या सुखाचे पर्वत आणि प्रगतीचा सागर या शोधमोहिमेतील परिसंवाद व संशोधन सहाय्य करण्याकरिता निवडलेल्या प्रतिनिधी मंडळात माझा समावेश असल्याने आजच मला नव्या जिवनाची सुखांत करण्यांचा नवा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या शोध मोहिमेच्या यशस्वीतेचा परिणाम कालांतराने तुला कळविनच. आपण सर्वजण आजपासून हाती घेतलेल्या कार्यक्रमाची प्रगती कळवण्याची घाई करु नका. कारण मी नव्या कामगीरीवर निघण्याची आजच तयारी करत असून परतण्याचा काल अमर्याद असल्याने त्वरीत संपर्क अशक्य वाटतो. तथापी आपण सर्वांनी आपले काम सातत्याने सुरु ठेवावे व माझ्या उपलब्धतेनुसार मला तुझ्या पत्रा द्वारे चांगल्या परिणामाची माहीती मिळेल या अपेक्षेत.
तुम्हा सर्वांचा
यशवंतराव चव्हाण.