इकडच्या विश्वातील देशांत शेजार धर्म पाळला जातो. प्रत्येक राष्ट्र आपल्या निश्चीत ठरलेल्या सिमारेषेतील क्षेत्रातच आपले राष्ट्रीय कार्यकर्तव्य पार पाडत असतो. दरवर्षारंभी अनेक राष्ट्राकडून एकमेकांना मदत हवी असल्यांस कळवण्याची विनंती करणारी पत्रे, सक्तीने एकमेकांना पाठवली जातात व आपसातील सौदार्थ्याचे सातत्या राखले जाते.
येथील संशोधन प्रक्रिया इतकी प्रगत झालेली आहे कि येथील विश्वाहून वेगळे विश्व असल्याची प्रचिती घेवून अनेक समाजाभिमुख शोध प्राप्त केले आहेत. याचबरोबर समाजाकरिता त्याज्य बाबींचा नायनाट करण्याचा शोधही लावल्याने सामाजीक संतुलन राखण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. सध्या येथील संशोधन प्रक्रियेत या विश्वाहून वेगळ्या कल्पना अवकाश विश्वांत सुखाचे पर्वत व प्रगतीचा सागर असल्याच्या संभावनेचा आधार घेवून यांत शोध मोहीम यशस्वी करून नवा विक्रम करण्याची तयारी सुरु आहे.
वास्तविक तुझ्या पत्राला उत्तर लिहिण्यास सुरवांत करून चेतनविश्वाच्या निर्मीतीपासून प्राचिन व अलीकडील काळाच्या इतिहासातील परिवर्तनासह तुमच्या वास्तव्यांत असता मी अनुभवलेल्या बाबी सांगतानाच तुझ्या पीढीच्या सहवासातील उत्साही व प्रेरणादायी काळाच्या आठवणीही सांगितल्या. इकडे लिहीण्याची, वाचनाची संधी दुर्मीळतेन मिळते कारण इकडील सर्वांनीच इथल्यापुर्वीचे माहित करून घेतलेले असते. मी मात्र आज मनसोक्त मनमोकळे करताना ब-याच बाबी तुला कळवत आहे. या सर्व विवेचावरून तू या घडीला काहीसा नाराज असशील कारण तुझ्या पत्राचा मुख्य हेतू या पत्राद्वारे दृष्टीक्षेपात आलेला नसेल. निराश होवू नको. तुला हवे असलेले मार्गदर्शन सुचनाद्वारे करणारच आहे. तथापी येथील समाजव्यवस्थेचा वास्तव तपशील वाचून तुलाही अशाच समाजव्यवस्थेची अपेक्षा वाढली असणार.
तुझ्या पत्रांत आपल्या राज्यातील, देशातील आजच्या समाजजिवनाचा तपशील व त्यामुळे असहाय्यता वाढल्याची खंत व्यक्त झाल्याने आपल्या अनुयायी आश्रमाच्या माध्यमातून दिलेल्या अध्ययनाशी ते विसंगत असल्याचेच जाणवत असेल.
एकूणच येथील समाजव्यवस्थेची रचना तुझ्या माहीतीकरिता सांगून झाल्याने आपण मुख्य मुद्याकडे वळूं.
चि. बाळ, प्राप्तपरिस्थीतीत तुझ्या चेतन विश्वातील समाजव्यवस्थेत स्वार्थ, भ्रष्टाचार, द्वेष भावना, धर्मा – धर्मातील वैर, अनावश्यक श्रद्धेमुळे जोपासलेला जातीवाद यामुळे येथील समजाव्यवस्थेशी विसंगत असल्याचे स्पष्ट होते. वास्तविक आमच्या पूर्वजानी अनेक माध्यमातून दिलेल्या संस्कारातून व प्रबोधनातून सर्वगुणसंपन्न नागरिक बनण्याकरिता नव्या पीढीला सतत सातत्य राखून प्रयत्न केल्याचा आपला इतिहास आहे. हीच परंपरा पुढे सुरू ठेवल्याने आम्ही ब-याच प्रमाणांत यशस्वीसुद्धा झालो. म्हणूनच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर समाजाला पुर्वीच्या असुविधा नाहीशा करून नवनिर्माणाला गती देवू शकलो होतो. तथापी क्षणीक मोहाचा प्रभाव वाढून व संस्कार आणि प्रबोधनाची प्रथा खंडीत होवून त्या जागी करमणुकीच्या नांवाने अप्रीय व अनावश्यक परिवर्तन झाल्याने समाज अनेक व्याधींनी त्रस्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आपल्या अनुयायी आश्रमांतील अध्ययनांत सुसंस्कृत नागरिक बनण्यास उपयुक्त अध्ययनातच प्राधान्य राखण्याचा माझा आग्रह त्याचसाठी होता.
याकरिता आजही आपल्या अनुयायी आश्रमांतील अध्ययनाचा दर्जा टिकवणे व त्याचे सातत्य राखणे हे प्रत्येक अनुयायाचे पवित्र कर्तव्य असेल.