• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण १२-१

थोड्याच दिवसांत आमचा मित्र पार्लमेंटरी सेक्रेटरी झाला व तेथून त्यांच्या संसदीय कारकीर्दीची सुरुवात झाली. प्रथम मंत्री, नंतर मुंबई राज्याचा मुख्यमंत्री अशा झेपी घेत घेत एक दिवस पंडितजींच्या निवडीने भारताचा संरक्षणमंत्री व काही दिवसांनी इतर खात्यांचा मंत्री झाला.

साहित्य, कला व इतर सामाजिक क्षेत्रांत या मित्राने महाराष्ट्रातील विचारवंतांच्या मनावर आपली छाप टाकली.

एक महत्त्वाचे राष्ट्रकार्य या दृष्टीने त्याची योग्यता दिसून आली ती त्याने केलेली महाराष्ट्रातील उद्योगीकरण व अर्थकारण ही होय. स्वराज्य मिळाल्यावर पंडित नेहरूंनी भारताला Mixed Eco-omy म्हणजे संमिश्र अर्थव्यवस्था हा मंत्र दिला. त्यामुळे राष्ट्रातील प्रत्येक घटकास आपल्या परीने राष्ट्रोन्नतीचे काम करण्याची संधी मिळाली.

महाराष्ट्रापुरते हे कार्य आमच्या मित्राने फारच कौशल्याने केले. त्याने फार विचार केला व मनाची निश्चित बैठक बसवली की, ग्रामीण भागात सुबत्ता आणल्याशिवाय या मोठ्या समाजाची उन्नती होणार नाही. म्हणून खेड्यापाड्यातील मंडळींना हे पटवून दिले की, त्यांनी जर कष्ट केले व योग्य रितीने आपला वाटा उचलला तर स्वराज्याचे सुराज्य होईल. हे काम सहकारी क्षेत्रातूनच होणे शक्य आहे, म्हणून ग्रामीण भागात सहकार चळवळीचे लोण पसरविले. उसाची लागवड करून साखर कारखाने स्थापले व त्यायोगे ग्रामीण भागात सुबत्ता आणली. हा दृष्टिकोण महाराष्ट्रानेच प्रथम अंगीकारला व भारतात प्रथम श्रेणीचे सहकार क्षेत्रातील स्थान संपादन केले. या आमच्या मित्राने हा नवीन दृष्टीकोण दिला. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदांची स्थापना करून ग्रामीण नेतृत्वाला राष्ट्रीय कार्यात वाव दिला. त्यामुळे आज जे चित्र दिसते त्यात सिंहाचा वाटा आमच्या मित्राचा आहे.

मुंबईत डॉ. बावडेकरांच्या हॉस्पिटलमध्ये मी स्लीप डिस्कच्या वेदनांनी व्याकूळ होतो. हा माझा मित्र परदेशाच्या दौ-यावरून दिल्लीस उतरल्यावर माझ्या आजारपणाचे वृत्त त्याने सकाळच्या वर्तमानपत्रात वाचले व लगेच मुंबईत हॉस्पिटलमध्ये येऊन मला भेटला. त्या मित्रप्रेमाची महती काय सांगावी.

प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मी व सौ. उषा आमच्या मित्राला सातारला भेटण्यासाठी जात असू. जाताना सोबत पूजेचा प्रसाद म्हणून शिरा व वाटली डाळ नेत असू व भेटल्यानंतर सारेजण ती आनंदाने खात असू. तेव्हा माझा मित्र म्हणायचा, ‘‘मधू, तू व उषा माझ्यासाठी हा परमेश्वराचा प्रसादच आणता.’’ दिल्लीत त्या दिवशी त्याच्या बंगल्यातून हस्तांदोलन करून मी निघताना आठवण होऊन तो म्हणाला, ‘‘पुढील आठवड्यात सातारला ‘शुभप्रसाद’ तुम्ही दोघांनी घेऊन यायचं आहे.’’ पण ते होणेच नव्हते.