• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ६२

६२. चार क्षणचित्रे – आशा मुंडले

-१-


मी प्रथम त्यांना पाहिले तेव्हा हेच ते यशवंतराव चव्हाण हे मला माहीत नव्हते. ४२ च्या चळवळीत गाजलेला, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी लोकांची नाराजी सोसणारा आणि मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा कायाकल्प करणारा हा माणूस मी प्रत्यक्ष कधीच पाहिला नव्हता.

त्यामुळे भलतीच गंमत झाली. पण त्यातून मनावर ठसलेले ते त्यांचे सौजन्य. माझा प्रियकर बाळ मुंडले लग्नाआधी मला पुण्याला भेटायला यायचा. आमच्या घरीच उतरायचा. मग पुणे-बंगलोर रेल्वेने परत जायचा. त्याला निरोप द्यायला मी नेहमीप्रमाणे स्टेशनवर गेले. डब्याच्या दारात तो उभा राहिला आणि मी प्लॅटफॉर्मवरून बोलत राहिले. मी कधी डब्यात चढत नसे. गाडी सुटली तर मला उडी मारता येणार नाही म्हणून. आम्ही एकमेकात असे गर्क झालेले त्या वेळी की अवतीभोवतीचं भानच नाही. परंतु अचानकच जाणवले की, एक सुरक्षा अधिकारी माझे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतोय. मी ‘‘काय बुवा कटकट ’’ अशा चेह-याने तिकडे पाहिले तर काय ? माझ्या आजूबाजूचा प्लॅटफॉर्म पूर्ण रिकामा. शेजारी फस्टक्लासच्या डब्यातल्या कूपेकडे पांढराशुभ्र पोषाख केलेले महोदय संथ पावले टाकत जाताहेत. आजूबाजूला सुरक्षा अधिकारी आणि त्यातला एक प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एकुलत्या एक मला दूर व्हायला सांगतोय. बाळ म्हणाला, त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये, ‘‘कोणी व्हीआयपी दिसतोय’’ आणि डोळ्यानेच निरोप घेऊन माझा हात पटकन सोडून दिला त्याने. मला व्यत्यय आल्यासारखे वाटले पण मी ‘सॉरी’ असे पुटपुटत तिथून दूर होणार होते. इतक्यात ‘साहेब’ शेजारच्या  डब्यात चढून दारातच उभे राहिले आणि हसून माझ्याकडे आणि त्या अधिका-याकडे पाहात म्हणाले, ‘‘नेव्हर मार्इंड. थांबा तुम्ही इथेच.’’ दोन तरुण माणसांना आपलीसुद्धा आठवण नव्हती याची खुषी होती त्यांच्या चेह-यावर. बाळने परत माझा हात पकडला. यथावकाश गाडी हलली. तेव्हा मी यशवंतरावांना हसून नमस्कार केला. आणि तोपर्यंत लक्षात आलं की हे कोण असावेत ते. पुढे जेव्हा भेटलो तेव्हा ह्या आठवणीने हसलो होतो मनापासून.

-२-

 ‘किती दिवस तुमची गाठ घ्यायला धडपडतोय, पत्ता कुठेय तुमचा ? ऑफिसातही नव्हतात. त्रासिक चेह-याने पणं टिपिकल सरकारी हस-या आवाजात प्रभाकरपंत नातू विचारीत होते. ‘मुलगा आजारी होता. मी रजेवर होते.’ मी म्हणाले.

‘‘बरं, आता ताबडतोब चला. साहेबांचं काम आहे तुमच्याकडे. डोंगरे आणि मी तुम्हाला ऑफिसात कळवणार होतो. पण तुम्ही घरी.’’ घरही धड कुणाला माहीत नाही. ‘काय काम आहे?’ ‘सांगतो गाडीत’. या वेळी यशवंतराव अर्थमंत्री होते. आम्ही नवी दिल्लीत त्यांच्या घरी गेलो. प्रथमदर्शनीच एक तलवार. ही प्रत्यक्ष शिवाजी महाराजांची आहे असे एकाने सांगितले. पण मला ते खरे वाटले नाही. टेलिप्रिंटर धडधडत होता. व्हरांड्यातच अवघडून बसलो. मग नातू निघून गेले. काही वेळाने साहेब आले. सौम्य व्यक्तिमत्त्वाचे, अजिबात आक्रमक न वाटणारे, आर्जवी आवाजाचे. दिल्लीतल्या एकूण ‘‘नबाबी’’ शी विसंगत असे.

‘वेणूतार्इंना इंग्रजी शिकवायला हवं. संभाषणापुरतं. त्यांचं नडतं. माझ्याबरोबर कुठं आल्या की.’

मानधन देऊ असे आधीच डोंग-यांनी नातूंना सांगितले होते. मी निमसरकारी नोकरीत. तेव्हा माझा होकार गृहीतच धरला गेला होता.

पण मी स्वभावाप्रमाणे स्पष्ट सांगितले की, ‘‘बार्इंना भेटून नंतर कळवते. साहेब गेले. मग आतल्या दालनात वेणूतार्इंची गाठ झाली. चहा आला. आम्ही दोघीच होतो. त्या मला अतिशयच शालीन, घरंदाज वाटल्या. आम्ही मोकळेपणे बोललो. माझ्या लक्षात आले की, या वयात ‘ग,म,भ,न’ ह्या बार्इंना नको आहे. आणि मोटिव्हेशनशिवाय प्रौढ माणूस नवी भाषा बोलायला शिकणार म्हणजे मारून मुटकून वैद्यबुवा ! माझ्या कौशल्याचे पाणी पालथ्या घड्यावर घालायला मन घेईना.