• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १२३

१२३. गप्पा राहूनच गेल्या – वरुणराज भिडे

काँग्रेस (अर्स) सोडून साहेबांनी स्वगृही जाण्यासाठी प्रस्थान ठेवले त्याच्या आदल्या दिवशीची गोष्ट. साहेब त्या दिवशी पुण्यातच होते. मी सकाळीच फोन केला. त्यांचे पुतणे दादासाहेब फोनवर होते. ते म्हणाले, ‘‘लगेच ये, एकटेच आहेत. ते बोलतील.’’ मी लगेच गेलो. साहेब दिवाणखान्यातच होते. नमस्कार चमत्कार झाल्यावर ते म्हणाले, ‘‘काय राज्याची परिस्थिती कशी काय आहे? ‘‘मला आश्चर्याचा धक्का बसला. ज्या राज्याच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता, ज्या राज्याच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांचा ठसा होता, त्याच राज्याची परिस्थिती ते विचारीत होते. मुख्य प्रवाहापासून तुटल्यासारखे त्यांना वाटत होते की काय जाणे ! त्यावेळी अंतुलेंची धुमधडाका राजवट चालू होती. अंतुलेंचा कारभार, जनता दरबार, रायगड, भवानी तलवार वगैरे अनेक विषयांवरची माझी मते मी सांगत होतो. ते मधूनमधून एखादा प्रश्न विचारीत होते.

गावांची नावे बदलण्याचा प्रकार इतिहासशास्त्राच्या दृष्टीने बरोबर नाही, असे म्हटल्यावर ते म्हणाले, ‘‘नावे मीही बदलली. चांद्याचे चंद्रपूर आणि मोमिनाबादचे अंबेजोगाई केले, पण मला तसा नाद नव्हता.’’

साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे सांभाळले. पण त्यांच्या काळात घेतल्या गेलेल्या निर्णयांचा परिणाम दीर्घकाळ टिकला होता. त्यासंबंधी मी अनेक शंका विचारल्या, प्रश्न विचारले. माझ्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले, ‘‘त्या वेळी घेतलेले निर्णय काही योगायोगाने घेतलेले नव्हते. त्यामागे ब-याच वर्षांपासूनचा विचार होता. हेतू होते. तुम्हाला वाटते त्या वेळी आम्ही बाराशे रूपयांच्या शैक्षणिक सवलतींचा विचार केला नाही. खूप आधी केला होता, पण मुंबई राज्यावर गुजरातमधील मंर्त्याची पकड होती. खर्चाच्या योजनांना जीवराज मेहतांचा सक्त विरोध असायचा. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर आम्ही सगळी स्वप्ने पुरी करू लागलो.

प्रवरेचा कारखाना झाला त्या वेळी विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळांना फार आटापिटा करावा लागला होता. नंतरच्या लोकांना त्या मानाने फार कमी त्रास झाला. महाराष्ट्रात साखर कारखान्यांचे पीक उगाच आलेले नाही. त्यासाठी माणसांच्या मनाची आणि मुंबई, दिल्लीतील राजकारणाची आम्ही मशागत केली होती. त्या खटपटीमुळे तर भराभर कारखाने वाढत गेले. ’’

साहित्य, संस्कृती मंडळाची प्रकाशने, विश्वकोश याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘त्या वेळी अनेक लोक कुणाकुणाला घेऊन येत. यांना लिहायचे आहे, संशोधन करायचे आहे, मुख्यमंत्री निधीतून मदत द्या. मी मदत द्यायचो. ती माणसे गुणी होती. पण मला सारखे वाटायचे की गुणी माणूस झाला तरी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचू शकतो त्यालाच मदत मिळते. पोचत नाही त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मी तर्कतीर्थांपाशी मंडळाची कल्पना बोललो. ते म्हणाले, ‘‘माझ्याही मनात हाच विचार होता.’’ कुठलीही कल्पना सांगितली तरी ती आपल्याला आधीच सुचली होती असे तर्कतीर्थ सांगतात. पण ज्या प्रकारे ते बोलले त्यावरून त्यांच्या मनात हा विचार बराच खोल गेला असणार. मी योजना करण्यास सांगितल्यावर ते ‘‘दोन दिवसांत देतो’’ म्हणाले, पण नेहमीप्रमाणेच दोन दिवसांत काहीच केले नाही, उलट वाईला निघून गेले. मी आठवण केल्यावर त्यांनी आठ दिवसांचा वायदा केला. असे तीन वेळा आठ दिवस गेल्यावर माणूस पाठवून त्यांना मुंबईत आणले आणि अक्षरश: खोलीत कोंडून योजना तयार करायला सांगितले.

तर्कतीर्थ कामाला सुरूवात करीत नाहीत हीच अडचण असते. कामाला लागल्यावर त्यांचा झपाटा विलक्षण असतो. त्यांनी योजना आखली, मंडळाची स्थापना झाली, काम सुरू झाले. आज जे वैभव दिसते त्याची सुरूवात अशी होती. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री थोडी वर्षे होतो. पण माणसे हेरून, उभी करून वेगवेगळ्या क्षेत्रात जी घडी घालून दिली त्यामुळे तुम्हाला तो प्रभाव जाणवतो. आणखीही वीस-पंचवीस वर्षे मी घातलेल्या घडीचा परिणाम जाणवत राहील.’’

पुणे शहर हा माझ्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय. त्याबद्दल त्यांनी अनेक प्रश्न विचारले. एका प्रश्नावर मी म्हणालो, ‘‘मुंबईची वाढ होणे अशक्य झाल्यावर पुण्याचे उद्योगीकरण झाले असे लोक म्हणतात. मग पुणेच का वाढले? मुंबईनंतर नगर, नाशिक, औरंगाबाद का वाढले नाही? पुण्याचे लोक १०० वर्षे उद्योगीकरण व्हावे यासाठी ओरडत होते, म्हणूनच मुंबईनंतर पुणे वाढले.’’