• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण २३

२३. जिव्हाळ्याचे साहेब – शांताराम गरगटे

माझ्या संगीत शिक्षकांचा मुलगा सिव्हिल इंजिनियरिंग खात्यात दुय्यम स्थानी होता. त्याच्या हातून चुकून अपयश आल्याने तो अत्यंत हवालदील झाला होता. तो याबाबत स्वत: कुणासही काही बोलला नाही. शक्य ते त्याने प्रयत्न केले. नंतर त्याचे वडील मला याबाबत बोलले. मी माझ्या जिव्हाळ्याच्या थोर व्यक्तिंना भेटलो. त्यांनी सुचवल्याने त्या वेळचे मुख्यमंत्री ना. यशवंतराव चव्हाण यांना भेटलो. सह्याद्री बंगल्यात गेलो. मला साहेबांनी ‘‘आधी जेवण करा नंतर बोलू’’ म्हणताना त्या दिवशी सोमवारचा उपवास असल्याने मी त्यादिवशी गहू तांदूळ हे धान्य सोडल्याने व आज जोंधळाही चालत नसल्याची माझी कुचंबणा मी बोललो. साहेब हसले, ‘‘माझ्या बाजरीच्या भाकरीत एक अतिथी खास मिळाल्याचा ’’ त्यांनी आनंद व्यक्त केला.

जेवणानंतर ते शिवाजी गणेशन यांचे नाटकास जाणार होते. ते मला चलण्याबाबत बोलले. माझा नकार दिसताच ते म्हणाले,‘‘एका नटवर्याने असे म्हणू नये!’’ मला गावच्या क्लबच्या नाटकाची आठवण आली! त्या आधी २५ वर्षांपूर्वीच्या नाटकातील कामाची त्यांची आठवण त्यांनी सौ. वेणूतार्इंना सांगितली. इतकी आठवणशीलता पाहून धन्यता वाटली. रात्री झोपलो. नाटकाहून परतल्यावर मी उघडाच पाहून पांघरूण घालून गेल्याचे दिसले. फार मला ते लागून राहिले! तरी साहेबांची ही आत्मीयता मनास काही प्रेरणाच देत होती.

सकाळी उठल्यावर माझी स्नानादी व देवपूजा आदी नित्याची कामे झाली. मी कामाबाबत विचारणा करण्याआधीच मला निरोप मिळाला, ‘‘थांबा, पुन्हा पाहू.’’ दुपारी जेवण झाले. रात्री भेटलो. ते म्हणाले, ‘‘तुमची पूजा आर्चा व आरतीची घंटा सह्याद्रीवर होणेसाठी निदान चार दिवस थांबावे लागेल.’’

इतका जिव्हाळा पाहून मी गप्प झालो. कामाची बाब पुन्हा बोललो. त्या कामाच्या व्यक्तीस मी पुन्हा येण्यास बोललो पण ते सोईचे नसल्याने आम्ही थांबलो. कामाची माहिती घेऊन ते म्हणाले, ‘‘बापू, फार वेळ झाला आहे.’’ मी सुन्न झालो. तो फारच दु:खी पाहून म्हणाले, ‘‘आत चला.’’ आम्ही आत गेलो. त्यांनी कॉटवर झोपलेल्या व्यक्तीचा निर्देश करून म्हणाले, ‘‘त्यांना स्मरून मी सांगत आहे. याबद्दल माझ्या अवस्थेची तुम्ही दखल घ्या!’’ कॉटवर त्यांच्या मातुश्री होत्या! माझे डोळे झरू लागले! बाहेर आलो. ते म्हणाले, ‘‘जिद्दीने लढा द्या. नंतर मला भेटल्याविना राहू नका.’’ सर्व व्हायचे ते झाले. पुढे भेटलो, त्यांनी माझ्या मित्रास इंग्लंडला जाणेची तयारी ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्व व्यवस्था साहेबांनी करून त्यास इंग्लंडमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळवून दिली. ती त्याने वैशिष्ट्यतेने व उच्च श्रेणीने केली.

त्याचा एक मुलगा इंग्लंडमध्ये इंजिनियर आहे व दुसरा भारतात एम.डी. होऊन डॉक्टर आहे. साहेबांचे जवळ जातीयवाद नव्हता. गुणांची पारख फार मोठी होती. तो माझा मित्र इंग्लंडला असताना यशवंतराव सेंट्रल शासनातील मंत्री असताना लंडनला गेले, त्या वेळी हे माझे मित्र जोशी यांनी सर्व महाराष्ट्रीय मंडळींच्यातर्फे मोठा सत्कार केला. मराठी भाषा किती श्रेष्ठतेने बोलली जाते, याचा आदर्श सर्वांना वाटला. आता साहेबांचे आधी श्री. जोशी स्वर्गवासी झाल्याने ते साहेबांचे स्वागत करून निरंतरची जवळीक करीत असतील अशी माझी श्रद्धा आहे !

माझ्या जवळच्या संबंधातील एका व्यक्तीने शून्यातून परिश्रमपूर्वक संपत्ती मिळवली होती. अनेकविध भिन्नतेमुळे व सिनेक्षेत्र विशेष वाटल्याने त्याने त्या क्षेत्रातील मित्रांच्या ओढीमुळे सिनेनिर्माता होणेचे धाडस केले. प्रथमच्या बोलपटांत थोडेफार पैसे मिळाल्याने पुढे वाटचाल केली. कुटुंब नियोजन विषय घेऊन बोलपट काढला. ते सर्वजण दिग्दर्शक श्रेष्ठ नटीला घेऊन माझे घरी आले. त्यांच्या आग्रहामुळे माझा उपयोग यामध्ये होईल या भावनेने मला त्यांनी मा.ना.यशवंतराव यांना भेटून त्यांना दिल्लीत हा बोलपट दाखवावा व त्यांचे आशीर्वाद सरकारी अनुदानातून मिळवावेत यासाठी त्यांनी योजना मांडली. क-हाडला साहेब येणार असल्याचे ते बोलले. मी त्याप्रमाणे क-हाडला माझे संबंधितांसमवेत भेटलो त्या वेळी साहेबांनी क-हाडातही पाहता येईल असे सांगितले, पण या सिनेमा श्रेष्ठींनी दिल्लीचा आग्रह केल्याने दिल्लीची योजना झाली. साहेबांनी उपस्थितीस जरूर त्या लोकांची नावे सुचवून मोलाची मदत केली. या वेळी डॉ. सरोजिनी बाबर यांनीही मोठे सहकार्य केले. या बोलपटास साहेबांचेमुळे फायदा झाला. पुढे माझी भेट झाले वेळी साहेबांनी याबाबत विचारले, ‘‘बापू, तुमची आठवण त्यांना फार झाली असेल.’’ मी म्हणालो, ‘‘माझ्या आठवणीचे काय महत्त्व? सिनेक्षेत्र कसे असते हे माझ्या माणसाने  अनुभवले आहे. मित्रांचा मोठेपणाही पाहिला आहे. आता तो निर्माता एका दुकानात नोकरी करत आहे.’’ हे ऐकून साहेब अवाक् झाले व म्हणाले, ‘‘बापू, महाराष्ट्रातील काहीजणांच्या स्वभावाबाबत मला रागापेक्षा वेदनाच अधिक होतात. आम्ही स्वभावाने श्रेष्ठत्वासाठी काही विचार करणार का? की असेच एकमेकांस संकटाचा अनुभव देणार?’’ आणखीही काही बोलले, पण माझे डोळे ओघळू लागल्याने या आठवणी शब्दांकित होणेस लेखणीच थांबते!

थोरपणाच्या शिखरावर असतानाही त्यांची विस्तृत दृष्टी गरुडाची झेप घेणारी होती याचे प्रत्यंतर अनेक आठवणींनी भरून आहे !