• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य ४७

इंग्लंड आणि अमेरिका या दोन देशांच्या भेटींमध्ये लंडन इथे, इंग्रजांनी जतन केलेले जुन्या इतिहासांचे दालन पाहताना या कर्तृत्ववान देशाच्या चारशे-पाचशे वर्षांच्या क्रियाशीलतेचे दर्शन घडून गेले. भारत हा जसा प्राचीन इतिहासाने भरलेला देश आहे, आणि इथे जुनी ऐतिहासिक कागदपत्रे पाहावयास मिळतात, त्याचप्रमाणे लंडनमधील हे इतिहासाचे दालन युरोपातील इतिहासाने भरलेले आहे. प्रयत्‍नांतून, क्रियाशीलतेतून निघालेला हा इतिहास आहे. या लोकांनी समुद्र व्यापले, साम्राज्ये निर्माण केली. युरोपचे जीवन घडविले. ते सर्व इथे पाहता येते. लंडनमधील जुने राजवाडे, वस्तुसंग्रहालये यांचे एक वेगळे आकर्षण आहे. लंडनमध्ये मी काही नाटके पाहिली. सुंदर नाटके पाहण्याचे लंडन हे उत्तम ठिकाण आहे. तेथील नाट्यजीवन मला प्रसन्न वाटते.

अमेरिकेच्या इतिहासाला तशी प्राचीनता नाही. अलीकडील तीनशे-चारशे वर्षांचा या राष्ट्राचा इतिहास आहे. परंतु आधुनिक जीवनातील विज्ञानाचा स्पर्श झालेल्या किंवा विज्ञानमय बनलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या पाहताना मनुष्य थक्क होतो. प्रामुख्याने मी तिथल्या शिक्षणसंस्था पाहिल्या, हॉर्वर्डसारखी विद्यापीठे पाहिली. डिफेन्स विभागातील एअर-फोर्स व नेव्हल अकादमी पाहिल्या. परंतु या सर्वांमध्ये जॉर्ज वॉशिंग्टनच्या निवासस्थानाने माझे मन आकर्षून घेतलं. जॉर्ज वॉशिंग्टन तेव्हा जसा राहत होता, त्या वेळचे ते रूप जसेच्या तसे जतन करून ठेवले आहे. तो कसा राहत होता, कोठे झोपत होता, त्याचे ग्रंथालय, स्वयंपाकघर, तो बसत असे, ती बग्गी हे सर्व पाहण्यासारखे आहे. त्याचा तिथे बंगला आहे आणि सभोवती शेकडो एकर जमीन आहे. त्या बंगल्यात प्रवेश केला की, जॉर्ज वॉशिंग्टनच्या जीवनाचे संपूर्ण चित्र समोर उभे राहते. मला हे ठिकाण फार आवडले.

न्यूयॉर्क आणि लंडन येथील नाट्यमंदिरे आणि तिथे सुरू असलेली काही नाटके ही पाहिली. या दोन्ही शहरांतील नाट्य-कला-क्षेत्र मोठे भव्य आहे. मन प्रसन्न होते.

फ्रान्समधील पॅरिस हे युरोपच्या संस्कृतीचे केंद्र वाटले. एका अर्थाने मला हे शहर युरोपच्या संस्कृतीचे, केंद्रच होते. व्हर्सेलिसच्या पॅलेसमध्ये नेपोलियनच्या कर्तृत्वाचे दर्शन आजही घडते. नेपोलियनच्या वेळच्या परिस्थितीचे चित्र या ठिकाणी सजीवतेने उभे करण्यात आले आहे. या शहरातील ऐतिहासिक इमारत, उत्तुंग शिल्पकला, भव्य इमारती, वस्तुसंग्रहालये हे सर्व व्यवस्थित आणि नीट-नेटक्या अवस्थेत असलेले दिसून आले. फ्रान्सच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्रिपद जेव्हा आँद्रे मॉर्ला यांच्याकडे सोपविण्यात आले, त्या वेळी या मंत्र्याने या सर्व शिल्पकलावास्तूंची मलिनता, जुनेपणा झटकून टाकून, त्या सर्व ताज्या टवटवीत बनविल्या. शहर मोठे सुंदर आहे. वस्तुसंग्रहालयांतील जुनी चित्रकला पाहताना मन मोहून जाते. शहराच्या मध्यभागी असलेल्या एका सुंदर चर्चसमोरील सुमारे अर्धा एकर जागेतील कलाकारांचा बाजार पाहताना पाय तिथेच अडखळतात. या पटांगणात कलाकार मंडळी लहान-लहान तंबू उभारून, त्या ठिकाणी चित्रे रेखाटीत असतात. हे एका मोठे अजब ठिकाण आहे. चित्रे रेखाटणार्‍या या कलाकारांचे हात मोठ्या कुशलपणाने फिरत असतात. पाहणारेही अवतीभोवती भटकत असतात. मला हा मेळावा पार लक्षवेधी वाटला. माझी ही आवड ध्यानात ठेवून, त्या मेळाव्याचे तेथील चित्रकाराने काढलेली एक चित्र माझ्या एका तरुण मित्राने नंतर मला भेट म्हणून दिले. मी मोठ्या चवीने माझ्या बैठकीच्या दालनात ते लावून टाकले आहे.

जगातल्या या मोठ्या शहरांतून फिरताना माझ्या असे लक्षात आले की, या महत्त्वाच्या शहरांना नदीकाठ आहे. सागराचा प्रचंड जलाशय पाहून मन प्रसन्न होते, हे तर खरेच; पण नद्यांचे काठ मला त्यापेक्षाही सुंदर दिसतात. नदीची मला फार भूरळ पडते. मी नदीकाठचा आहे, त्याचा हा परिणाम असेल कदाचित; पण नदीचे, जलाशयाने भरलेले पात्र आणि तीरावरील हिरवीगार वृक्षराजी, पिकाने भरलेली शेती पाहून माझ्या मनाला नदीकाठाचीच भुरळ अधिक पडते. मोठमोठ्या नद्यांचे किनारे व्यवस्थित राहतील, याकडे परदेशांतील मंडळींनी जे खास लक्ष दिलेले दिसते, ते लक्षात येते. नद्यांचा उपयोग प्रामुख्याने शेती, वीज आणि जलवाहतूक यांसाठीच केला जातो. नदीच्या पाण्याबद्दल या लोकांना जबरदस्त प्रेम आहे.