प्रबंधाचा अभ्यास ज्या मित्रांच्या व संस्थेच्या साक्षीने झाला त्यामध्ये विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथील ग्रंथपाल संभाजी मोरे, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्रीयुत नेताजी पाटील, सहग्रंथपाल सी. ए. कवडे, हिराचंद नेमचंद वाचनालय सोलापूर, वेणुताई चव्हाण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कराड, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र कराड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील ग्रंथालय यांनी योग्य ते ग्रंथ उपलब्ध करून दिले. त्यांचेही मी मनःपूर्वक आभार मानतो.
माझी पत्नी प्रा. सौ. कौसल्या देशमुख हिने माझ्या कामात मोलाची मदत केली. मूळ हस्तलिखित प्रत मुद्रणासाठी तयार करणे, संदर्भ सूची तयार करणे इ. कामात मला तिची मदत झाली. शिवाय उत्कट प्रेरणा देऊन ग्रंथ कार्यसिद्धीस नेण्यासाठी प्रोत्साहन दिले. माझ्या दोन कन्या कु. शिवानी व कु. शर्वरी यांचाही पुस्तकनिर्मितीत खारीचा वाटा उचलला, त्यांचे आभार कसे मानू ?
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री मा. आर. आर. पाटील (आबा) माझ्या पुस्तकास शुभेच्छा देऊन माझे मनोबल वाढविले त्याबद्दल त्यांचा मी अतिशय आभारी आहे.
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेडचे माजी कुलगुरू मा. खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांना आम्ही फोनवर संपर्क साधून, तसेच समक्ष भेटून प्रस्तावना लिहिण्याच्या केलेल्या विनंतीला प्रतिसाद देऊन अतिशय कार्यमग्न असतानाही या ग्रंथाला विस्तृत प्रस्तावना लिहिली. त्याबद्दल त्यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.
कौसल्या पब्लिकेशनच्या प्रकाशिका यांनी माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या प्रेरणेचे फळ आहे.
जंगम ऑफसेटचे मालक सदाशिव जंगम, त्यांचे चिरंजीव महेश जंगम, योगेश जंगम यांनी कमी वेळातच सुबक व आकर्षक स्वरूपात पुस्तकाची छपाई केली. सुप्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांनी अल्पावधीत या ग्रंथाचे कलापूण्र मुखपृष्ठ तयार करून दिले. त्यांचे मनःपूर्वक आभार.
यशवंतराव चव्हाणांचे अभ्यासक, वाचक हा ग्रंथ त्यातील उणिवांकडे दुर्लक्ष करून स्वीकारतील, या माझ्या पहिल्या वहिल्या ग्रंथाचे वाचक, रसिक स्वागत करतील अशी आशा बाळगतो.
प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख
४१८, विद्यानगर हाऊसिंग सोसायटी,
सिव्हिल हॉस्पिटलजवळ, सोलापूर
दि. १२ मार्च २००९