• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ४७

हरिजन चळवळीच्या गांधी काळात यशवंतरावांचे लक्ष हरिजनोद्धाराकडे लागले. “शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात श्री. विठ्ठल रामजी शिंदे हे त्यावेळी अग्रेसर होते.” (पृ. १४३) शक्यतो चव्हाणांच्या शब्दात त्यांच्या आत्मचरित्राद्वारे चव्हाणांचे समाजकारण आपण येथे लक्षात घेत आहोत. चव्हाण दररोज हरिजन वस्तीत शाळा चालविण्यास शिक्षक म्हणून जात असत. यशवंतरावांनी स्वत: पुण्यास विठ्ठल रामजी यांच्याकडे जाऊन त्यांना क-हाडला येण्याचे आमंत्रण दिले. त्यांचे हस्ते नाईट स्कूलचे उद्घाटन झाले. व्याख्यानही झाले. चव्हाणांना यावेळी काही सामाजिक अनुभव आले. ते आजही महत्त्वाचे आहेत. चिंत्य आहेत. यशवंतराव चव्हाण स्पष्ट लिहितात-

“क-हाडात मोठे कुतूहल होते. पण उत्साह नव्हता. राजकीय चळवळीमध्ये मुले, वडीलधारी माणसे येत-जात असत. तसा उत्साह मला (यशवंतरावांना) दिसत नव्हत.” “हे चित्र सबंध देशातच होते.” “त्यांच्या (शिंद्यांच्या) संगतीतला एक दिवस सार्वजनिक जीवनातील शिक्षणाचा एक महत्त्वाचा धडा होता.” (पृ. १४४) यशवंतरावांना पुण्यास जे प्रश्न विठ्ठल रामजींनी विचारले, त्यावरून शिंदे किती चिकित्सक होते, हे निदर्शनास येते. प्रत्यक्ष शिंद्यांचा मला जो सहवास प्राप्त झाला. त्या प्रस्तुत लेखकाला म्हणावयाचे आहे की, शिंदे याहीपेक्षा प्रत्येक लहान-मोठ्या बाबतीत घरीदारी सूक्ष्म चिकित्सक होते, सखोल होते. कडक शिस्तीचे भोक्ते होते.

चव्हाणांनी चालू केलेली हरिजनांसाठीची प्रौढ शिक्षण प्रसाराची शाळा पुढे अयशस्वी झाली. चव्हाणांनी शिक्षकाचे काम केले हे खरे. हजारो वर्षांच्या विषमतेमुळे हरिजन व हरिजनेतर समाजात नाकर्तेपा आला होता. देशाच्या अवनतीचे कारण विषमता (सामाजिक) हे आहे असाच चव्हाणांना अनुभव आला. शिंदे व फुले ज्यावेळी वरील कार्य करू लागले, त्यावेळी त्यांना किती अडचणी आल्या असतील; याची कल्पना चव्हाणांनी क-हाडला केलेल्या हरिजनोद्धाराच्या लहानग्या प्रयोगावरून त्यांना आली. खुद्द हरिजनांचा विश्वास वरच्या थरातील अस्पृश्योद्धारक कार्यकर्त्यांवरून उडाला होता. याला म. गांधीचा देखील अपवाद नव्हता. डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हरिजन समाज गेला होता. ज्यांच्यावर फार पूर्वीपासून अन्याय होत आला आहे, त्यांचा ‘राग’ चव्हाणांना समजू शकला. चव्हाणांच्या मातोश्री विठाबाई यांनी त्यांना हरिजनोद्धार कार्यात जे सहकार्य दिले ते जास्तीत जास्त महत्त्वाचे होते. पुढे याच काळात जिल्ह्यातील वाई क्षेत्रात १९३३ ते १९३९ पर्यंत महर्षी शिंदे यांनी अस्पृश्योद्धाराचे कार्य केले व त्यात त्यांना पुष्कळ यशही आले. तर्कतीर्थ जोशी यांच्यापासून इतर अनेकांनी कर्मवीर शिंद्यांना महत्त्वाचे साह्य केले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सर्व जाती-जमातींच्या शाहू बोर्डिंगचा व त्यांच्या अस्पृश्योद्धारक कार्याचा कृष्णाकाठात उल्लेख नाही. कर्मवीर शिंदे यांना भाऊरावांनी सहकार्य केले. ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रातील सूचीमध्ये तरी भाऊराव पाटील यांचा नामनिर्देश नाही. हा भाग राहून गेलेला दिसतो. भाऊरावांची रयत शिक्षण संस्था सत्यशोधक चळवळीतूनच उगम पावली व यशवंतराव या संस्थेचे आमरण अध्यक्ष होते. यशवंतरावांचे मार्गदर्शन व अध्यक्षत्व र. शि. संस्थेला मोठे उपकारक झाले. यशवंतराव अध्यक्ष म्हणून भूषणभूतच ठरले.