• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ४६

“कृष्णाकाठ” सातारा जिल्ह्यातील परिस्थिती जास्ती सांगते. या सातारा जिल्ह्यात शेवटच्या आयुष्याच्या विभागात येऊन महर्षी शिंदे अस्पृश्योद्धाराचे व समाजसुधारणेचे कार्य करीत होते. केवळ छिद्रान्वेषण-पद्धतीने सत्यशोधक चळवळीकडे शिंदे पाहत नव्हते. “सत्यशोधक चळवळीने सातारा जिल्ह्यातील खडकाळ जमीन नांगरली व नवीन पिकाची तयारी झाली.” असा गौरव शिंद्यात आढळतो. चव्हाणांच्या हृद्याने एवढी मोठी सहानुभूती व्यक्त केली नाही. पण त्यांनाही म. फुले – शाहू ही नावे निवडणुकांच्या दौ-यातून उच्चारावी लागली नाहीत, असे नव्हे. विवेचनाचा उद्देश हा की – समाजिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या चव्हाणांची पाटी कोरी नव्हती. त्यांच्या जिल्ह्यात महाराष्ट्रातही पाया खोदला गेला होता. परकीय सत्तेशीच चव्हाणांनी प्राणपणाने झुंज दिली. हीच राजकीय बाब महत्त्वाची ठरते. चव्हाण म्हणजे राजकारण, राजकारण म्हणजे सत्ताकारण, हे सर्व खरे. पण हस्तगत झालेली सत्ता त्यांनी जास्तीत जास्तपणे लोकांना उपयुक्त केली. परिभाषा उन्नत केली. गनिमी काव्याने म्हणजे उघड कळो न देता, त्यांनी ग्रामीण नेतृत्व पुढे आणण्यात यश मिळविले. उच्चभ्रूंच्या हे लक्षात आले. पण उच्चभ्रू पांढरपेशा शहरी सुशिक्षितांसाठी देखील चव्हाणांनी खूप केले. समतोल राखिला. सामाजिक असंतुलन पुष्कळपणे नाहीसे केले. दिल्लीत चव्हाणांना मी म्हणालो की – “तुम्ही उच्चस्तरीय समाजासाठी पुष्कळ केले. पण ते समाधानी नाहीत.” चव्हाण उत्तरले, “ते कसे समाधानी होतील?” म्हणजे त्यांना बरे वाटत नाही.

लोकमान्य टिळकांच्या काळापासून यशवंतरावांच्या सातारा जिल्ह्यात राजकीय परिषद भरत असे. या परिषदेचे नेते भाई बागल यांना १९३१ सालच्या अधिवेशनात बोलावून घेण्यात आले. राजकीय मागण्यांबरोबर आर्थिक स्वरूपाच्या मागण्याही बागलांनी सुचविल्या. आत्मचरित्रात यशवंतराव म्हणतात – “पिळल्या जाणा-या शेतकरी समाजाचे जे प्रश्न होते, ते या राजकीय व्यासपीठावर मांडण्याच्या कामात माधवराव व पर्यायाने आम्हीही यशस्वी झालो...” चव्हाण लिहितात, “स्वराज्याच्या चळवळीला काही अर्थ प्राप्त करून द्यावयाचा असेल, तर सामाजिक आणि आर्थिक प्रश्न यांना स्पर्श केल्याशिवाय आपली स्वातंत्र्याची चळवळ पुढेच जाऊ शकणार नाही.” माधवराव बागलांच्या उपस्थितीमुळे उच्चभ्रू पांढरपेशा जुन्या काँग्रेसवाल्यांना मोठी अडचण वाटली. पण चव्हाणांनी भाई बागलांच्या शेतकरीवादी विचारांना पाठिंबा दिला. बागल सत्यशोधक आहेत अशी त्यांची ओळख कै. यशवंतरावांनी आत्मचरित्रात नोंदली आहे. राजकारणाला निकोप समाजकारणाचा पाठिंबा असावा लागतो. आर्थिक प्रश्न समाजकारणापासून व राजकारणापासून दूर ठेवून चालणार नाही असा चव्हाणांना पडताळा आला. चव्हाण फक्त ब्रिटिशांना घालविले की – सर्व कार्य संपले असे मानणा-यांपैकी नेते नव्हते. बागल व चव्हाण यांना परिषदेत व नंतरही विरोध होऊ लागला, तेव्हा चव्हाण लिहितात – “लहानपणी वाचलेले ज्योतिबा फुल्यांचे चरित्र आठवले” याच वयात त्यांचे सत्यशोधक बंधू गणपतराव बळवंतराव चव्हाण हे शेतकरी समाज काँग्रेसपासून दूर का होता याची कारणे यशवंतरावांना सांगत. त्या कारणाचे स्मरण १९३१ सालीदेखील चव्हाण यशवंतराव यांना झाले. सांगण्याचे तात्पर्य हे की, म. फुले यांच्या विचाराकडे चव्हाणांना पाठ करणे अशक्य झाले व त्यांनी सातारा जिल्हा काँग्रेसचे व पुढे महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे शेतकरीकरण केले. चव्हाणांचे हे समाजकारण पुढे जे ग्रामीण नेतृत्व प्रमुख झाले व शहरी पांढरपेशी पुढारीपण झाकाळले गेले. त्याचे मर्म सांगण्यासाठी वरील विवेचन करावे लागले. चव्हाण आजन्म विद्यार्थीच होते.

तुरूंगात असताना देखील यशवंतरावांचे श्रवण-मनन-वाचन चालूच राहिले. म. फुले यांची प्रशंसा चव्हाणांना चुकविता आली नाही. तसेच जग जरी फार पुढे गेले आहे तरी मार्क्सला वाट पुसतच पुढे जावे लागले असे थोड्याफार अभ्यासांती चव्हाणांचे मत झाले. (पृ. १९९)