• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (79)

१) जमाबंदीची प्रक्रिया व संचय निर्देशकाची भूमिका : जमाबंदीच्या प्रक्रियेत सुधारणा होणे अगत्याचे आहे, या विषयी दुमत नाही. त्याचबरोबर या प्रक्रियेत येणा-या अडचणींचीही दखल घेतली पाहिजे. विविध संचयकेंद्रांच्या जबाबदाऱ्यांबाबत मतभिन्नता असल्यामुळे आणि काही मोजके देश आपल्या आंतरराष्ट्रिय देव-घेवीत सतत शिल्लक दाखवत आल्यामुळे या अडचणी उद्भवतात. या अडचणींचे निराकरण करण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजनेला आमचा पाठिंबा राहील. पण नवे नियम बनविताना वा काही सुधारणा सुचविताना विकसनशील देशांवर जादा बोजा पडता कामा नये, असे आमचे दृढ मत आहे. संकल्पित सुधारित आंतरराष्ट्रिय नाणेपद्धतीमध्ये ज्या 'विशेष सल्लामसलती'चा निर्देश करण्यात आला आहे, त्यात केवळ जागतिक दृष्ट्या दुष्परिणाम घडवू शकणा-या अशा वैयक्तिक वा सामूहिक असमतोलाचा समावेश करण्यात यावा, असे सर्वसाधारण एकमत झाले आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. याचा अर्थ आम्ही असा करतो, की अशा विशेष सल्लामसलतीतून विकसनशील राष्ट्रांना सूट मिळेल. योग्य अशा उपाययोजनेची गरज अजमावताना, तसेच एखादी उपाययोजना कितपत पुरेशी होईल, याचा अंदाज घेताना विकसनशील देशांच्या अर्थरचनेची वैशिष्ट्ये व त्यांच्या विकासाची कनिष्ठ पातळी यांचा सर्वांगीण विचार होणे आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. विकसनशील देशांना आपल्या दीर्घ मुदतीच्या विकास-कार्यक्रमांना बाधा न येता हिशेबांचे तत्परतेने समायोजन करावे लागते. तसे करताना ज्या खास अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागते, त्यांकडे असमतोलाच्या विशिष्ट घटनांचे मूल्यमापन करताना लक्ष देण्याचा विचार निश्चितच स्वागतार्ह वाटतो.

आजच्या परिवर्तनीयतेच्या जमान्यात समायोजन-प्रक्रियेत संचय निर्देशकांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. तथापि आधुनिक सामाजिक व आर्थिक संघटनांची गुंतागुंत लक्षात घेता या निर्देशकांचा उपयोग समायोजन-प्रक्रिया (Adjustment Action) काही प्रमाणात सुरू करण्यासाठी आपोआप करता येईल, असे आम्हांस वाटत नाही. संचयात (Reserves) फेरबदल (Changes) करताना, त्यांना संबंधित देशाची आर्थिक परिस्थिती व भावी प्रगती यांच्या सर्वांगीण मूल्यमापनाची जोड द्यावी लागते. सारांश, आंतरराष्ट्रिय नाणेनिधीने समायोजन-पद्धतीची (Adjustment Action) शिफारस करताना सर्व बाजूंनी व काळजीपूर्वक विचार करण्यात यावा. विशेष द्रव्याधिकार व आंतरराष्ट्रिय आर्थिक साहाय्य यांत दुवा प्रस्थापित केला, तर विकसनशील देशांच्या आंतरराष्ट्रिय देवघेवीविषयीच्या विविध उद्दिष्टांचा समन्वय करणे शक्य आहे. समायोजन-प्रक्रियेत सुधारणा कशी करता येईल, याचा शोध असताना या समन्वयाच्या शक्यतेकडे दुर्लक्ष होता कामा नये.

आदा करावयाच्या रकमांचे जागतिक सर्वेक्षण करताना दोन महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यावयास हव्या आहेत. एक विकसनशील देशाकडे ख-या साधनसंपत्तीचा ओघ, आणि दुसरे, त्यासाठी लागणारे द्रव्यबळ.