• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

लोकनेते यशवंतराव चव्हाण - २९

यशवंतराव चव्हाण साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांच्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मांडलेल्या प्रतिक्रियेतून अधिक चांगल्या रितीने स्पष्ट होतात. चव्हाणसाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची प्रचिती तमाम मराठी बांधवास या प्रतिक्रिया वाचल्यानंतर येते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार यशवंतराव चव्हाणसाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात, “यशवंतराव चव्हाणसाहेबांबरोबरचे आपले वैयक्तिक संबंध व त्यांचे मिळालेले राजकीय मार्गदर्शन याचा माझ्या सुरवातीच्या राजकीय जीवनात मला फार मोठा फायदा झाला. माझ्यावर त्यांचे अपार ऋण आहेत. मी ते कधीही विसरू शकणार नाही. ते केवळ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार नव्हते, तर एक महान देशभक्त होते. चव्हाणसाहेबांचा लोकशाही समाजवादावर दृढ विश्वास होता. भारत हे एक कणखर व स्थिर राष्ट्र व्हावे असे त्यांचे स्वप्न होते. देशाचे सार्वभौमत्व टिकविण्याच्या दृष्टीने सामाजिक विषमता रहित देश त्यांना बनवायचा होता. हा देश धर्मनिरपेक्ष असलाच पाहिजे या तत्त्वावर त्यांची दृढ निष्ठा होती.”

‘दै. मराठा’ या वृत्तपत्रांचे संपादक व ख्यातनाम वक्ते, थोर साहित्यिक आचार्य प्र. के. अत्रे यशवंतरावांबद्दल म्हणतात, “यशवंतरावांच्या बुद्धिमत्तेचा पल्ला केवळ राजकारणापुरताच मर्यादित नाही, तर ते एक साहित्यप्रेमी, कलाप्रेमी व नाट्यरसिक आहेत. त्यांना सामाजजीवनाच्या सर्व अंगांविषयी रस आहे. ते उत्कृष्ट वक्ते आहेत, संभाषणचतुर आहेत, शिष्टाचारात निपुण आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रसन्न आहे, म्हणूनच आम्हाला त्यांच्याविषयी आपुलकी वाटते.”

मुंबईहून प्रसिद्ध होणा-या दै. महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक द्वा. भ. कर्णिक म्हणतात, “ना. यशवंतराव चव्हाण यांनी पंडितजींवर, काँग्रेसश्रेष्ठींवर व दिल्लीवर छाप टाकली. आपल्या निष्ठेची पक्षश्रेष्ठींना जाणीव करून देताना त्यांनी ती अबोल कर्तृत्वाने करून दिली हे विशेष आहे. ना. यशवंतराव चव्हाण दिल्लीच्या लोकांना प्रभावित करतात ते त्यांच्या मुंबई व महाराष्ट्र राज्यातील कर्तृत्त्वाने. त्यांचे दर्शन वा भेट ज्यांना होते त्यांना ते अघळपघळ बोलताना दिसत नाहीत. अवास्तव घोषणा करताना तर मुळीच दिसत नाहीत. यशवंतराव चव्हाण यांचा व्यासंग चांगला असून, बोलण्यात ते वाक्बगार आहेत. त्यांचे बोलणे मोजके व मुद्देसुद होते. राजकीय जीवनाता लोकांना कृतिशून्य पण शब्दसूर लोकांच्या तोंडाचा पट्टा चाललेला ऐकण्याची सवय झालेली आहे. या स्थितीतही अबोल व मितभाषी अशा ना. यशवंतरावांची त्यांच्यावर मोहिनी पडली हे विशेष मानावे लागेल.”

पत्रपंडित पां. बा. गाडगीळ म्हणतात, “दिल्लीत मंत्रिमंडळात जाऊनही ज्यांनी महाराष्ट्रात आपला पाठिंबा टिकविला. महाराष्ट्राच्या दैनंदिन प्रश्नात आपले लक्ष कायम ठेवत, महाराष्ट्राची प्रतिष्ठा दिल्लीत वाढवली. या तीनही गोष्टी एकट्याने करणारे यशवंतराव चव्हाण पहिलेच महाराष्ट्रीय पुढारी आहेत. आर्थिकदृष्ट्या महराष्ट्र मागासलेला आहे म्हणून अंतर्गत राजकीय तेढी महाराष्ट्रास परवडणार नाहीत याची पूर्ण जाण असलेले व ती सतत मनांशी बाळगून गेली कित्येक वर्षे वागत आलेले ना. यशवंतराव हेच पहिले महाराष्ट्रीय पुढारी आहे.”

साप्ताहिक ‘गतिमान’चे संपादक श्री. नरूभाऊ लिमये लिहतात, “राजकारणाच्या मैदानातील अष्टपैलू यशवंत खेळाडू माझ्या संघाला विजय मिळवून द्यावयाचा आहे, असे यशवंतरावांचे वर्णन करून यशवंतरावजींचे मोठेपण त्यांच्या साडेतीन हात देहात सामावलेले नाही, त्यांच्या वैयक्तिक मान सन्मानात सामावलेले नाही, तर त्यांनी महाराष्ट्राकरता आणि महराष्ट्रातर्फे देशाकरता केलेल्या कामात, सोसलेल्या यातनात सामावलेले आहे. महाराष्ट्र निर्मितीच्या महाभारतात मराठी मनावर एवढे आघात झालेले होते की, केंद्रातून न्याय मिळत नाही तर आपला आपण स्वतंत्र विचार करावा असे अस्पष्ट बोलले जात होते. त्या काळात काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मजबुती आणण्याच्या कामात यशवंतरावजींचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आणि अविस्मरणीय होता. त्यावेळची नेतेपणाची निवडणूक आठवली तर स्वतःला ‘सूर्याजी पिसाळ’ हे संबोधन मिळत असताना सांगलीच्या जाहिर सभेत संयुक्त महाराष्ट्र की पंडित नेहरू असा प्रश्न निर्माण झाला तर मी नेहरू नेतृत्व पसंत करेन, असे सांगणा-या नेत्याचे विस्मरण भारतीयांना होता कामा नये. तामिळनाडू भलत्या विस्मरण मार्गावर गेला. तो राष्ट्रीय प्रवाहात परत आणताना के. कामराजसारखे नेते पुरे पडले नाहीत तेथे आपल्या राजकीय जीवनाची बाजी लावून यशवंतरावजींनी महाराष्ट्राला भावनेच्या धारेतून थोपवून धरले.”