• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

आमचे मुख्यमंत्री -६०

शिवाजीरावांचे कार्य

आमदार असताना मराठवाड्याकरता शिवाजीरावांनी बरेच काम केले. त्यांना शेतकरी व ग्रामीण भाग ह्यांच्या प्रश्नांची जाण आहे. सहकारी बॅंका, पाझर तलाव ह्यांच्या कामांना त्यांनी चालना दिली. शाळा व महाविद्यालये, सुताच्या गिरण्या, सहकार, तेलगिरण्या ह्यांची स्थापना करण्यात त्यांचा मोठा हातभार होता. मोरणा प्रकल्पातून जालना जिल्ह्याची निर्मिती ही त्यांची इतर प्रमुख कार्ये.

मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मराठवाडा विकासाचा एक कार्यक्रम जाहीर केला. शेतक-यांकरता पीक-विमा चालू केला. सवलतीच्या दराने त्यांनी शेतक-यांना बॅंकांतून कर्ज उपलब्ध करून देण्याकरता प्रयत्न केला. उद्योगांचे विकेंद्रीकरण करण्याकरता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे औद्योगिक वसाहती स्थापन करण्यास चालना दिली.

स्वातंत्र्यसैनिकांचे हाल लक्षात घेऊन त्यांच्या सेवानिवृत्तिवेतनात वाढ केली. लोक न्यायालये व प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना केली. मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली. पर्यावरण विभाग सुरू केला.

दुर्दैवाने निलंगेकरांना मुख्यमंत्रिपद फार काळ लाभले नाही. ते फक्त नऊ महिने मुख्यमंत्री होते. त्यांची मुलगी एम.डी. परीक्षेला बसली होती. तिला उत्तीर्ण करण्याकरता त्यांनी परिक्षकावर दडपण आणले असा त्यांच्यावर आरोप होता. न्यायालयांनीही मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आणि निलंगेकरांना ५-२-८६ रोजी पायउतार व्हावे लागले. त्याचवेळी त्यावेळचे राज्यपाल प्रभाकर राव ह्यांनाही राजीनामा द्यावा लागला. त्याचे कारण उपरिनिर्दिष्ट वैद्यकीय परीक्षेतील घोटाळा!*

अशा त-हेने एका सभ्य व्यक्तित्वाच्या नेत्याच्या कारकिर्दीचा अस्त झाला. सर्वोच्च न्यायालयात ते निर्दोष सुटले असे म्हणतात. दुर्दैवाने त्यावेळच्या कुलगुरूंनी कार्यकारिणीवर निष्कारण ताशेरे झाडण्याचा प्रयत्न करून आपण पूर्ण निर्दोष आहोत असे सोंग केले होते. अर्थात तो भाग अलग.

ज्यावेळी विद्यापीठात श्री. पाटील ह्यांच्या मुलीच्या परीक्षेच्या निकालाबद्दल चर्चा होत होती त्यावेळी त्यांच्या पी.एच.डी.ची पदवी वादात होती. ह्याबाबत श्री. प्रवीण बंदापूरकर ह्यांनी लोकसत्तेत नुकताच एक लेख लिहिला आहे (बुधवार, मार्च २००७, पृष्ठ ६). त्यात त्यांनी पी.एच.डी.ची पदवी मिळविण्याकरता किती खटपट,श्रम केले ह्याचे वर्णन केलेले आहे. त्यांचा संशोधन प्रबंध नागपूर विद्यापीठाने १९८६ साली स्वीकारला व ते सर्व लेखन गोलमाल काहीतरी आहे ह्या टीकेला उत्तर दिले. त्यांच्या संशोधनाला सेतू माधवराव पगडी हे एक परीक्षक होते. त्याच लेखात त्यांच्यावर आलेली सर्व राजकीय किटाळेही दूर झाली असे श्री. बर्दापूरकर यांनी म्हटले आहे.