• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

आमचे मुख्यमंत्री -५९

17 nilangekar
१७. श्री. शिवाजीराव पाटील निलंगेकर

संयुक्त महाराष्ट्राचे नववे मुख्यमंत्री
(३-६-१९८५ ते ९-३-१९८६)

श्री. शिवाजीराव पाटील निलंगेकर अल्पकाळच मुख्यमंत्री होते.

जन्म व शिक्षण

शिवाजीरावांचा जन्म ९-२-१९३१ रोजी झाला. त्यांचे शिक्षण एम.ए., एल.एल.बी. पर्यंत झालेले आहे. त्यांनी १९८६ साली पी.एच.डी. पदवी मिळविली आणि त्यांच्या प्रबंधाचा विषय होता मराठवाड्यातील राजकीय जागृती, चळवळ आणि बदल. हा प्रबंध त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पूर्ण केला व पी.एच.डी. मिळविली.

स्वातंत्र्यचळवळीतील सहभाग

त्यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्राम व त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला होता. १७-९-१९४८ ह्या दिवशी हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले व हैद्राबाद येथील मराठी भाषिक भाग संयुक्त महाराष्ट्रात विलीन झाला. १९९०-९१ मध्ये ते महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे १९६२-६८ अशा सहा वर्षांच्या काळात ते उस्मानाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचेही अध्यक्ष होते.

निवडणुकीत भाग

त्यांनी १९५७ पासून विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घेतला, परंतु त्यावेळी ते पराभूत झाले. त्याच वेळी ते उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोकबोर्डात क्रियाशील होते. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर (१-५-१९६०) ते निलंगा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते पुन्हा निवडून आले. १९७४-७५ ह्या काळात ते वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे पुनर्वसन व विधानकार्य ही खाती होती. ते १७-५-१९७७ रोजी कॅबिनेट मंत्री झाले. त्यावेळी त्यांच्याकडे पाटबंधारे खाते होते. वसंतदादा पाटलांच्या १९७८ च्या मंत्रिमंडळात आरोग्य, कुटुंबकल्याण व विपणन ही खाती त्यांच्याकडे होती. बॅ. अंतुले ह्यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, तांत्रिक शिक्षण, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यविकास व रोजगार ह्या खात्यांचा कारभार होता.

मुख्यमंत्री

सिमेंट प्रकरणामुळे अंतुल्यांना राजीनामा द्यावा लागला व बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले.
त्यावेळी शिवाजीराव कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे पाटबंधारे, तांत्रिक शिक्षण, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यविकास, कायदा व न्याय ही खाती होती. १९८३ साली बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला व वसंतदादा पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात निलंगेकर-पाटलांना स्थान मिळाले होते व त्यांच्याकडे पाटबंधारे, विधी, न्याय, सहकार, सांस्कृतिक कार्य व युवक कल्याण ही खाती होती. दादांना १-६-१९८५ रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला व शिवाजीराव मुख्यमंत्री झाले. त्यावेळी ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. मराठवाड्यातून मुख्यमंत्री होणारे निलंगेकर हे दुसरे नेते. त्याआधी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते.