• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

आमचे मुख्यमंत्री -४२

13 vasant dada patil
१३ . श्री. वसंतदादा पाटील

संयुक्त महाराष्ट्राचे पाचवे मुख्यमंत्री
(१५-५-७७ ते ५-३-७८, ५-३-७८ ते १९-७-७८, २-२-८३ ते ९-३-८५ आणि १०-३-८५ ते १-६-८५).

श्री. वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे पाचवे मुख्यमंत्री. परंतु चार वेळा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केला. १७-५-७७ ते ५-३-७८ (९ महिने), ५-३-७८ ते १९-७-७८ (४ महिने), २-२-८३ ते ९-३-८५ (२ वर्ष) आणि १०-३-८५ ते १-६-८५ (२ महिने) असे ते २, ४, ९ महिने आणि २ वर्षे म्हणजे एकूण तीन वर्षें मुख्यमंत्रिपदावर होते. विशेष आश्चर्याची गोष्ट  म्हणजे त्यांना प्रत्येकी दोन टर्म लागोपाठ होत्या. ह्याचाच अर्थ असा की त्यावेळच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता दादा स्टॅंडबाय मुख्यमंत्री होते.

अर्थात ही गोष्ट खरी की ते सर्वसामान्यांना जवळचे होते. त्यांना सर्व लोक दादा म्हणत असत. दादा हे आपल्यातून मुख्यमंत्री झाले आहेत अशी लोकांची भावना होती.

जन्म व शिक्षण

गरीबीमुळे दादांचे शिक्षण फार झाले नव्हते. त्यांना इंग्रजीचे ज्ञा नव्हते. दादांचा जन्म १३-११-१९१७ रोजी पदमाळे येथे एका सामान्य शेतक-याच्या कुटुंबात झाला. दादा लहानपणीच पोरके झाले, परंतु त्यांच्या आजीने त्यांचा समर्थपणे सांभाळ केला. दादांना शिक्षण अर्थवट अवस्थेत, म्हणजे सातव्या इयत्तेमध्येच सोडावे लागले. ह्याचे कारण त्यांची गरीबी हे होय.

राजकीय चळवळीत भाग

वयाच्या १३ व्या वर्षापासून (१९३०) दादांना राजकीय चळवळीत स्वारस्य होते. सामाजिक कार्याची आवड होती. समाजजागृती व प्रबोधन करण्याची हौस होती. त्यांनी स्वतःच्या गावात ग्रामसुधारणा मंडळ स्थापले. सांगलीच्या बाजाराबाबत चळवळ केली. ह्याच वेळी त्यांनी दादा हे नाव लोकांनी दिले.

१९३७ साली ते सांगली तालुका कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस होते. त्यांनी गांधीजींच्या वैयक्तिक सत्याग्रहाच्या चळवळीत भाग घेतला होता (२३-३-१९४१). तसेच त्यांनी चले जाव चळवळीतही भाग घेतला होता (६-७-४२). ह्यावेळी पोलिसांच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या खांद्यावर गोळी लागली. २४ मार्च १९६६ मध्ये दादा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले.