• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-तो वेडा कुंभार !

तो वेडा कुंभार !

यशवंतरावांच्या जीवनावर त्यांच्या आईचा- विठामातेचा मोठा प्रभाव पडलेला जाणवतो. यशवंतराव मातृभक्त होते.

मुख्यमंत्री झाल्यावर ते मुंबईला ' सह्याद्री ' बंगल्यावर राहू लागले. विठामाता सुद्धा काही दिवस मुंबईत साहेबांजवळ राहिल्या. पण तिथे त्यांचा जीव रमेना. त्या पुन्हा कराडला राहू लागल्या. पण एकदा त्यांची तब्येत फारच बिघडली, तेव्हा यशवंतराव त्यांना मुंबईला घेऊन आले. दवाखान्यातून घरी सोडल्यावर त्यांच्यावर ' सह्याद्री ' वरच उपचार चालू होते. आई अत्यवस्थ असल्यामुळे यशवंतराव अस्वस्थ झाले होते. अनेक मान्यवर मंडळी विठाईमातेची विचारपूस करण्यासाठी येत होती. एकेदिवशी साहेबांचे मित्र आणि विख्यात गीतकार ग. दि. माडगूळकर मातोश्रींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ' सह्याद्री ' बंगल्यावर गेले होते. माडगूळकरांनी पाहिले - यशवंतराव एकटेच गॅलेरीत खुर्ची टाकून बसले होते. माडगूळकरांना पाहून ते म्हणाले, ' या आण्णा, बसा ' ' कसं काय आईचं ?' माडगूळकरांनी विचारले,
' बरं आहे, पण तो  ' वेडा कुंभार ' काय करील ते खरं.' आभाळाकडे खिन्नपणे हात करून यशवंतराव म्हणाले.

क्षणभर माडगूळकरांना काहीच समजले नाही. पण लगेच त्यांच्या लक्षात आले की, आपल्याच एका गीतात आपण देवाला वेड्या कुंभाराची उपमा दिलीय. ' फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार ' हे माडगूळकरांचे गाणे प्रसिद्ध होते. पण मनाच्या अशा उदास अवस्थेतसुद्धा यशवंतरावांनी ती उपमा यथार्थपणे वापरून दिलेली दाद पाहून माडगूळकरांना सुखद धक्काच बसला. यशवंतरावांमधला रसिक असा कायमच सजग राहिला.