• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-तू गडावर जाऊन दार उघड !

तू गडावर जाऊन दार उघड !

माजी सनदी अधिकारी व सिक्किम राज्याचे विद्यमान राज्यपाल मा. श्रीनिवास पाटील यांनी सांगितलेली ही आठवण !

पाटण तालुक्यातील मारूल हवेली हे त्यांचे गाव. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी एलएल. बी. पूर्ण केले. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षाही दिली. योगायोगाने एलएल. बी. चा निकाल आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल एकाच दिवशी लागला. श्रीनिवास पाटील यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली होती आणि आता ते वकीलीही करू शकत होते. सर्वांनाच खूप आनंद झाला. त्यावेळी यशवंतराव कराडमध्येच होते. ही आनंदाची बातमी त्यांना सांगण्यासाठी पेढे घेऊन श्रीनिवास पाटील यशवंतरावांच्या घरी गेले. साहेबांनी त्यांचे विशेष कौतुक केले. वेणूताईंनी त्यांचे औक्षण केले. श्रीनिवासजी पेढे देऊ लागल्यावर यशवंतराव म्हणाले, ' तू डेप्युटी कलेक्टर होणार असशील तरच मी तुझे पेढे घेतो. पण तू वकीली करणार असशील तर मला डायबिटीस आहे ! ' या अनपेक्षित प्रश्नाने पाटील गोंधळले. कारण त्यांनी तसा काही विचार केलेलाच नव्हता. यशवंतराव म्हणाले, ' हे बघ, तानाजीने कोंढाणा किल्ला कसा घेतला, हे तुला माहितच असेल.'

' हो , आपल्या निवडक मावळ्यांच्या मदतीने रात्रीच्या वेळी तानाजी कड्यावरुन गडावर चढला. ' पण सगळे मावळे कड्यावरून गडावर गेले नव्हते, तर अगोदर चार- पाच शूर मावळे कड्यावरून वर गेले आणि त्यांनी गडाचे दरवाजे उघडले, खरं ना ?'

' हो, अगदी बरोबर.'

' मग तुला तेच करायचे आहे. तू हुशार आहेस. महाराष्ट्राच्या प्रशासनात तू कड्यावरून आत आलास. पण खेड्यापाड्यातील गरीबांच्या, मागासवर्गीयांच्या मुलांना आत येण्यासाठी आता तू प्रशासनाचा दरवाजा उघड . जर आपल्याला शेतक-यांसाठी राज्य करायचे आहे, तर शेतक-यांची मुलं प्रशासनात नकोत का ?'

या उदाहरणाने श्रीनिवास पाटील खूपच प्रभावित झाले आणि त्यांनी डेप्युटी कलेक्टर होण्याचा निर्णय घेतला. थोर पुरुषांची दृष्टी काळाच्या किती पुढे असते हेच या प्रसंगातून दिसून येते.