• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-खेड्यापाड्यातला तरुण ज्ञानसंपन्न झाला पाहिजे

खेड्यापाड्यातला तरुण ज्ञानसंपन्न झाला पाहिजे

यशवंतराव मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते कराडला आले होते. विश्रामगृहात थांबले होते साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संदर्भात त्यांना समाजभूषण बाबुराव गोखले यांच्याशी चर्चा करायची होती. त्यांनी बाबुरावांना  तसा निरोप दिला होता. बाबुराव आले, दोघांची चर्चा सुरू झाली. यशवंतराव म्हणाले, ' स्वातंत्र्योत्तर पिढीतील तरुण लेखकांना प्रकाशनाची संधी मिळावी, प्रोत्साहन मिळावे हाच साहित्य आणि संस्कृती मंडळाचा हेतू आहे. ' गोखले म्हणाले , ' हेतू चांगला आहे, पण नवीन लेखकांचे लेखन फारच उथळ असते.'

मध्येच साहेब म्हणाले, ' तसे असेलही. पण त्यांच्यापुढे ज्ञानभांडार खुले व्हावे यासाठी तर या मंडळाकडे ' मराठी विश्वकोश ' आणि ' ज्ञानकोश ' निर्मितीचे काम आपण सोपवले आहे.'

' पण हे ज्ञान भांडार आणि नवनवे ग्रंथ लोकांपर्यंत जायला हवेत.' गोखले म्हणाले. ' अहो, त्यासाठी तर मी तुम्हाला चर्चेसाठी बोलावले आहे. काय करता येईल ? काही मार्ग आहे का ?' यशवंतरावांच्या या प्रश्नावर विचार करुन बाबुरावजी म्हणाले, ' त्यासाठी नवनवीन ग्रंथालये निर्माण करुन त्यांच्याद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ज्ञानभांडार पोहोचविता येईल.'

' आपण अगदी माझ्या मनातले बोललात. त्यासाठी तुम्ही ज्या ग्रंथालय संघटना निर्माण केलेल्या आहेत, त्या सर्वांशी चर्चा करा. एकत्रित येऊन राज्य ग्रंथालय संघ निर्माण करता येईल. त्या माध्यमातून नवीन प्रकाशने गावोगाव नेण्यासाठी सरकारने काय केले पाहिजे ते सांगा. तुमच्या सूचनांचा जरूर विचार होईल. खेड्यापाड्यातला तरुण सुशिक्षित आणि ज्ञानसंपन्न झाला, की आपोआप विकासाच्या कामांचा विचार करील.'

बाबुरावांनी ' मी प्रयत्नाला लागतो ' असे वचन दिले व त्यांच्या प्रयत्नातून १९६२ मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ स्थापन झाला. पुढे या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रंथालय कायदा अस्तित्वात आला.