• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-मराठी शिका !

मराठी शिका !
 
द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री असताना यशवंतराव वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर गेले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. आपल्या मागण्या मांडल्या. त्यावेळी एका पत्रकाराने विचारले, ' द्विभाषिक मुंबई राज्यात हिंदी भाषिक व्यक्तींची पोलीस दलात भरती केली जात नाही, हे राष्ट्रीय एकात्मतेच्या तत्त्वाविरुद्ध नाही काय ? यामुळे प्रादेशिकता वाढेल असे तुम्हाला वाटत नाही काय ?' यावर साहेब म्हणाले , ' पोलीस दलात हिंदी भाषिक व्यक्तींची भरती करू नये, असा शासनाचा कोणताही आदेश नाही ' असे म्हणून त्यांनी शेजारी बसलेल्या डी. एस. पी. ना विचारले, असा आदेश तुम्हाला आहे काय ?' डी. एस. पी. ( जिल्हा पोलीस अधीक्षक ) यांनी मौन पाळले. यावर दुसरा पत्रकार म्हणाला, ' आपला तसा आदेश नसेलही, पण अधिकारी मात्र असा भेदभाव करतात. कदाचित तुमचा तसा ' गुप्त आदेश ' असेल.'

यशवंतराव हसून म्हणाले, ' अरे मित्रा, कसला गुप्त आदेश ? हे काय इंग्रजांचे राज्य आहे काय ? आता तुमच्या साक्षीने मी असा आदेश देतो की, हिंदी भाषिक व्यक्तींना मराठी भाषिक व्यक्तीला मिळते तशीच वागणूक दिली जावी. जे अधिकारी हा आदेश पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. '

थोडे थांबून यशवंतराव पुढे म्हणाले, ' पण तुम्हीसुद्धा एक काम करा.'

' कोणते काम ?' पत्रकारांनी विचारले. ' तुम्ही महाराष्ट्रात राहता, तर मराठी जरूर शिका.'