• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- ग्रंथप्रेमी यशवंतराव .. !

ग्रंथप्रेमी यशवंतराव ..  !

ते १९५१ साल होते. डॉ. हे. वि. इनामदार तेव्हा पुण्यातील ख्यातनाम वकील आबासाहेब वाघोलीकर यांचेकडे सहाय्यक म्हणून काम करीत होते. आबासाहेब , खा. शंकरराव मोरे आणि यशवंतराव चव्हाण ते तिघेही रॉयवादी विचारसरणीचे अभ्यासक होते. परस्परांचे स्नेही होते. यशवंतराव पुण्यात आले आहेत असे शंकररावांना समजले. चौकशीसाठी ते आबासाहेबांकडे आले. पण यशवंतराव तर आबासाहेबांकडे आले नव्हते. मग ते गेले कुठे ? आबासाहेब म्हणाले, ' अहो, शंकरराव, चुकलेला फकीर मशिदीत सापडायचा, तसे यशवंतराव पुस्तकाच्या गराड्यातच आढळतील. चला माझ्याबरोबर, इनामदार तुम्हीही या .' असे म्हणून ते तिघेजण टांग्याने शनिवार पेठेतील वाघोलीकरांच्या घरून निघाले. डेक्कन जिमखान्यावरील इंटरनॅशनल बुक सर्व्हिस या पुस्तकाच्या दुकानासमोर टांगा थांबला. ते तिघेजण खाली उतरले. दुकानाचे मालक विठ्ठलराव दीक्षित यांना आबासाहेबांनी विचारले, ' यशवंतराव आलेत का ?' त्यावर त्यांनी काहीही न बोलता एका कोप-याकडे बोट दाखवले. त्या कोप-यात यशवंतराव उभे होते. एक पुस्तक चाळण्यात ते गढून गेले होते. ' लॉ, लिबर्टी अॅण्ड लाईफ ' हे न्या. छगला यांचे पुस्तक ते वाचत होते. उभ्याउभ्याच यशवंतराव त्या पुस्तकाविषयी बोलू लागले. छगलांच्या संपन्न जीवनदृष्टीचा प्रत्यय कसा पानापानांतून येतो हे सांगण्यात ते रंगून गेले. असे होते यशवंतरावांचे ग्रंथप्रेम  !