• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- माझे घर कृष्णाकाठीच असू शकते !

माझे घर कृष्णाकाठीच असू शकते  !
 
सन १९८० साली लक्ष्मण माने यांचं ' उपरा ' हे आत्मकथन प्रसिद्ध झालं. ते महाराष्ट्रभर गाजलं. ' उपरा ' वाचून यशवंतराव इतके भारावले, की लक्ष्मण मानेंना भेटण्यासाठी ते स्वत: साता-यामधील वडार वस्तीतील त्यांच्या भाड्याच्या घरी गेले. त्यांनी मानेंचे तोंडभरून कौतुक केले. आधार दिला. म्हणाले, ' असेच लिहित रहा. भटक्या विमुक्तांसाठी काम करा. त्यांच्या दु:खांना वाचा फोडा.'

हळूहळू लक्ष्मण मानेंचा नावलौकिक वाढू लागला. त्यांचे बरेच मित्र पुण्यात रहात होते. आपणही पुण्यात रहावे असे मानेंना वाटू लागले. नाहीतरी साता-यात काय आहे ? पुण्यात सर्व सोयी आहेत. प्रवासाच्या दृष्टीने पुणे चांगले आहे. दोघा पती - पत्नींचा पुण्याला जाण्याचा निर्णय पक्का झाला. एकदा सहज पुण्याला स्थायिक होण्याचा बेत लक्ष्मण मानेंनी यशवंतरावांना सांगितला. यशवंतराव बराच वेळ गंभीर झाले मग म्हणाले, ' लक्ष्मण , मी दिल्लीला अनेक वर्षे राहिलो, पण दिल्लीत घर नाही केले. कामाच्या निमित्ताने मुंबईतही बरीच वर्षे राहिलो पण तिथेही मी घर केले नाही. पुण्यातही अधून मधून राहतो. तिथे पुतण्याने घर बांधले आहे, पण तेही माझे घर नाही. माझे घर कृष्णाकाठी कराडलाच असू शकते. त्याच मातीने आपल्याला घडविले. आपली माणसं खेड्यापाड्यातनं येतात , मोठी होतात आणि महानगरांमध्ये हरवून जातात. ज्या गावांनी त्यांना समृद्ध केलं, ती गावं मात्र ओकीबोकी होतात. तेव्हा मला वाटतं, शशी - लक्ष्मणचं घर साता-यातच असायला हवं. कामाच्या निमित्ताने तुम्ही कुठेही जा, पण आपलं घर आपल्या मातीतच असलं पाहिजे, आणि पुणे तरी असे किती अंतरावर राहिले आहे ?'

१९८२ मध्ये यशवंतरावांनी दिलेला सल्ला लक्ष्मण मानेंनी शिरोधार्य मानला व ते साता-यात स्थायिक झाले. याचा त्यांना फायदाच झाला. त्यांचा आणि साता-याचाही नावलौकिक वाढला. आज पुणे- सातारा हा प्रवास अवघ्या एका तासाचा बनलाय. तीस वर्षापूर्वी हा विचार करणारे साहेब किती द्रष्टे होते, याची प्रचिती या प्रसंगातून येते.