• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- अभ्यासांती निर्णय...!

अभ्यासांती निर्णय...!

द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर यशवंतरावांनी अनेक नव्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली. यासाठी त्यांना नव्या दमाच्या नि:स्वार्थी सहका-यांची गरज होती. यशवंतरावांनी जिल्ह्याजिल्ह्यात नवे नेतृत्व उभे केले. खानदेशातील मधुकरराव चौधरींना वयाच्या २८ व्या वर्षी यशवंतरावांनी राज्यमंत्रीपद दिले आणि त्यानंतर २१ वर्षे मधुकररावांनी महाराष्ट्राची बहुमोल सेवा केली. त्या काळी राज्यमंत्र्यांकडे कोणत्याच विभागाच्या फाईली जात नसत. याबद्दल मधुकररावांनी एकदा यशवंतरावांकडे तक्रार केली. यशवंतरावांनी ताबडतोब आदेश काढला की यापुढे प्रत्येक फाईल उपमंत्र्याकडे गेली पाहिजे. पण कोणतीही फाईल आठवड्यापेक्षा अधिक काळ मंत्र्यांना आपल्याकडे ठेवता येणार नाही, असाही दंडक त्यांनी घालून दिला. त्यानंतर मधुकररावांकडे पहिली फाईल आली, ती तापी खो-याच्या पाणी वाटपाची. त्यावेळी चीफ इंजिनिअर गुजराती असल्याने त्यांनी गुजरातला ६७ % तर महाराष्ट्राला ३३ % पाणी द्यावे, अशी शिफारस केली होती. तापीचा जलप्रवाह पाहता यापेक्षा अधिक पाणी वापरणे अशक्य आहे, असे कारण त्यांनी यासाठी दिले होते. हे पाणीवाटप महाराष्ट्रावर अन्याय करणारे आहे असे मधुकररावांना वाटले. म्हणून त्यांनी त्या विभागाचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब देसाई यांना विचारले, ' या फाईलसंबंधी अधिक विचार करण्यासाठी मला एका आठवड्यापेक्षा अधिक काळ ही फाईल माझ्याकडे ठेवण्याची परवानगी द्याल का ?'

बाळासाहेब म्हणाले, ' फाईल ठेवण्याच्या कालावधीसंबंधीचा आदेश मुख्यमंत्र्यांचा असल्याने तुम्ही त्यांची परवानगी घ्यावी.' मग चौधरींनी यशवंतरावांना विचारले. त्यांनी अतिशय आनंदाने अधिक काळ फाईल ठेवण्याची परवानगी दिली व म्हणाले, ' तापी नदीचे पाणीवाटप हा महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे सविस्तर अभ्यास करून तुम्ही तुमचे म्हणणे लिखित स्वरूपात सादर करा.' अशी मोकळीक मिळताच चौधरींनी तंत्रज्ञ व पाणीवाटपाचे कायदे जाणणा-या तज्ज्ञांच्या सहकार्याने या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास केला आणि महाराष्ट्राच्या वाट्याला ६६.५ %  तर गुजरातच्या वाट्याला ३३.५ % पाणी देण्याची शिफारस केली. यशवंतरावांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मधुकररावांची शिफारस उचलून धरली व महाराष्ट्राच्या वाट्याला दोन तृतीयांश पाणी मिळाले. यामागे मधुकररावांचे कष्ट आणि यशवंतरावांची प्रेरणा होती.