• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ८४

भागीरथीबाई असं काही बोलल्या की मला भडभडून यायचं.  मी त्यांच्याजवळून उठून बाहेर यायचे आणि अश्रूंना वाट मोकळी करून द्यायचे.  पुन्हा भागीरथीबाईची भेट घेण्याची माझी हिंमत होत नसे.  वर्ष-सहा महिने भागीरथीबाईंनी कधी मिरज, कधी कराड अशी काढली.  त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावू लागली.  मी साहेबांना निरोप पाठविला.  निरोप मिळताच साहेब मिरजेला आले.  डॉक्टरांना भेटले.  त्यांची व डॉक्टरांची काय चर्चा झाली हे आम्हाला कळलं नाही.

आम्हाला केवळ एवढंच म्हणाले, ''डॉक्टर देतील त्या सल्ल्याप्रमाणे भागीरथी वहिनींची सेवा करा.''

भागीरथी वहिनींच्या खोलीत गेले.  स्तब्ध उभे राहिले.  त्यांचं दर्शन घेऊन कुणाला काहीएक न बोलता मुंबईला निघून गेले.

मुलांच्या मामांना निरोप पाठवला.  मोहन जाधव कामेरीहून लगेच मिरजेला पोहोचले.  डॉक्टरांनी भागीरथीबाईच्या प्रकृतीविषयी आम्हाला कल्पना दिली.

म्हणाले, ''या काही दिवसांच्या आपल्या साथीदार आहेत.  त्यांना तुम्ही कामेरीला हवापालट म्हणून घेऊन जात असाल तर आम्ही त्यांना इथून सोडावयास तयार आहोत.''

मोहनराव जाधव यांनी भागीरथीबाईला कामेरीला घेऊन जाण्याची तयारी दर्शविली.  डॉक्टरांनी त्यांना काही सूचना दिल्या.  

म्हणाले, ''तुमच्या मळ्यात राहण्याची व्यवस्था असेल तर तिथे मोकळ्या हवेत यांची राहण्याची व्यवस्था केल्यास चांगलं राहील.''

माधवराव जाधव यांनी मला कराडला आणून सोडलं.  कामेरीला जाऊन व्यवस्था करून येतो म्हणाले.  कामेरीहून येताना गाडी घेऊन मिरजेला पोहोचले.  भागीरथीबाईला घेऊन निघण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले.  भागीरथीबाई पलंगावर निपचित पडलेल्या होत्या.  मोहनराव जाधवांनी डॉक्टरांना बोलावलं.  डॉक्टर लगेच भागीरथीबाईंच्या खोलीत आले.  वेळ निघून गेली होती.  भागीरथीबाईंनी चव्हाण घराण्याला आणि मुलांना पोरकं करून निसर्गाला जवळ केलं.  मोहनराव जाधवांना आपल्या बहिणीला माहेरी घेऊन जाण्यासाठी आणलेल्या गाडीत बहिणीचं कलेवर कराडला घेऊन यावं लागलं.  नियतीनं त्यांच्यावर ही वेळ आणली.  कराडला भागीरथीबाईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

घटनेचा स्वीकार केल्यानंतर भारतीय प्रजासत्ताकाची पहिली निवडणूक १९५२ मध्ये जाहीर झाली.  निवडणुकीचे नगारे बडविले जाऊ लागले.  पक्षापक्षांतील नौबती झडू लागल्या.  प्रांतिक काँग्रेसनं निवडणुका लढविण्याचं ठरविलं.  साहेब मुंबईहून पक्षाची सर्व सूत्रं हलवू लागले.  खेर-मोरारजी यांच्या कारभारावर नाराज असणार्‍या खानदानी बहुजनांनी शे. का. पक्षाच्या झेंड्याखाली वेगळी चूल मांडली.  साहेब काँग्रेस सोडून त्यांच्या कळपात सामील न झाल्याने त्यांचा राग साहेबांवर अधिक होता.  ते साहेबांना पाण्यात पाहू लागले.  साहेबांना खिंडीत गाठून राजकीय जीवनातून उखडून टाकण्याचा विडा शे. का. पक्षानं उचलला.  गांधीजी गेल्यानंतर काँग्रेसमध्ये थोडी पडझड झाली होती.  नेहरू-पटेलांनी ती पडझड सावरली.  प्रांतिक काँग्रेस विकलांग झालेली.  अशा बिकट अवस्थेत साहेबांनी ५२ ची निवडणूक लढविण्याचं ठरविलं.  खेर यांना पुढे करून साहेबांचं शिरकाण करण्याचा बेत प्रांतातील ऐतखाऊ वर्ग आखू लागला.  भविष्यात बुद्धीच्या जोरावर आपलं खच्चीकरण होईल अशी भीती त्यांना साहेबांच्या नेतृत्वाबद्दल वाटायची.  महाराष्ट्रात शे. का. पक्षाची हवा निर्माण झाली होती.  शे. का. पक्षाची कर्तीधर्ती मंडळी आपण सत्तेत आलोय अशा तोर्‍यात वावरत होती.  भाऊसाहेब हिरे, नानासाहेब कुंटे यांना साथीला घेऊन साहेबांनी महाराष्ट्राच्या जिल्ह्यात दौरे काढले.  जनतेसमोर आपली व पक्षाची भूमिका मांडली.  काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खानदानी मंडळींनी पक्षाचा कसा विश्वासघात केला यासंबंधी सविस्तर चित्र जनतेसमोर रेखाटलं.