• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ७७

गांधीहत्येचे वातावरण निवळते न निवळते तोच राजकीय असंतोषाचे ढग राजकीय पटलावर जमू लागले.  एके दिवशी भाऊसाहेब राऊत यांनी आपल्या निवासस्थानी खेर-मोरारजींच्या कार्यपद्धतीवर नाराज असणार्‍या नेत्यांची बैठक बोलावली.  खेर-मोरारजी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असणार्‍यांमध्ये दत्ता देशमुख, भाऊसाहेब राऊत, शंकरराव मोरे, पी. के. सावंत, केशवराव जेधे, र. के. खाडिलकर, तुळशीदास जाधव, आचार्य अत्रे इत्यादी या बैठकीला हजर होते.  या बैठकीचं निमंत्रण साहेबांनाही होतं.  साहेबांनीही या बैठकीत भाग घेतला.  

भाऊसाहेब राऊत यांनी उपस्थितांचं स्वागत केलं.  ही बैठक बोलावण्यामागचा हेतू प्रास्ताविकात समजावून सांगितला.

ते म्हणाले, ''ग्रामीण भागातील बहुजनांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास हे सरकार अपयशी ठरलं आहे.  आपण सर्व बहुजनांचे प्रतिनिधी आहोत.  आपण विचारानं प्ररित होऊन जनहितासाठी काँग्रेस पक्षात कार्यरत आहोत.  याठिकाणी आपला खेर-मोरारजी यांच्याकडून अपेक्षाभंग झाला आहे.  जनहितासाठी काही वेगळा विचार आपल्याला करावयाचा आहे.  याकरिता आजच्या बैठकीचं प्रयोजन आहे.''

''आपण गांधी-नेहरू यांच्या नेतृत्वाखाली सामान्य शेतकरी, कष्टकरी व कामगार यांच्या जीवनात सुखाची पहाट पाहण्यासाठी काँग्रेसमध्ये काम करीत आहोत.  ज्या वर्गाचं आपण प्रतिनिधित्व करतो त्या वर्गाचं हित जपणं आपलं कर्तव्य आहे.  खेर-मोरारजी सरकारची काम करण्याची गती आणि नीती पाहता सामान्य जनतेला न्याय मिळेल असं मला वाटत नाही.  मग मी विचार करतो, आपण या सरकारमध्ये कशाकरिता राहायचं ?  ज्या उद्देशानं आपण गांधी-नेहरू यांच्या पाठीमागे उभे राहिलो तो उद्देश असफल होत असेल तर त्यांना सोडून आपण वेगळी चूल मांडलेली बरी.'' केशवराव जेधे.  

''बरोबर आहे.  बहुजनांसाठी हे सरकार काहीच करत नसेल तर या सरकारला आपण कशाकरिता पाठिंबा द्यायचा ?  हे सरकार ज्या पक्षाचं आहे त्या पक्षात काय म्हणून राहायचं ?  आपण जनतेसमोर कुठल्या तोंडानं जाणार आहोत ?  शेतकरी व कामगारांचे प्रश्न जर आपल्याला सोडता आले नाहीत तर आपला राजकीय बळी शेतकरी व कामगार घेतल्याशिवाय राहणार नाही.  या वर्गाच्या प्रश्नांकरिता आपण त्यांच्याच नावानं 'शेतकरी कामगार पक्षा'ची स्थापना करून त्यांचे प्रश्न मार्गी लावू.''  शंकरराव मोरे.

''आपण याबाबत यशवंतरावांचं मत जाणून घेऊया''.  तुळशीदास जाधव.  

अत्यंत समर्पक असं विवेचन साहेबांनी केलं.

सर्वांच्या भावनांचा आदर करीत साहेब म्हणाले, ''आपण सर्वजण इथं एकत्र आलो ते एका उद्देशानं प्रेरित होऊन.  तो उद्देश म्हणजे वंचितांचे अश्रू पुसणे.  स्वातंत्र्याकरिता आपण जे लढलो ते वंचित शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या जीवनाला अर्थ प्राप्‍त करण्याकरिता.  या जनतेला आपण न्याय देऊ शकलो नाही तर या स्वातंत्र्याला काही अर्थ उरणार नाही.  तुमच्या या एका मुद्द्याशी मी सहमत आहे - तो म्हणजे खेर-मोरारजी यांच्या मंत्रिमंडळाकडून गरिबांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा हे सरकार पूर्ण करू शकणार नाही.  नेहरूंनी समाजवाद स्वीकारला आहे.  मला वाटते नेहरूंवर आपण विश्वास ठेवला पाहिजे.  बहुजनांचे प्रश्न काँग्रेससोबत राहूनच आपण सोडवले पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत आहे.  बहुजनांचे जे प्रश्न आहेत ते भारतीय पातळीवरचे आहेत.  भारतीय पातळीवरचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षही भारतीय पातळीवरचा पाहिजे.  केवळ काँग्रेस पक्षच अखिल भारतीय पातळीवरचा आहे.  बहुजनांचे प्रश्न सोडविण्यासाठी मला वेगळा पक्ष काढण्याची आवश्यकता वाटत नाही.  आपण वेगळा पक्ष काढला तर त्याचं अस्तित्व हे प्रांतिक पातळीपुरतं मर्यादित राहील.  वेगळा पक्ष काढण्याच्या आपल्या भूमिकेशी मी सहमत नाही.  तिसरा मुद्दा आहे - या पक्षाला जातीचा वास येतोय अशी चर्चा बाहेर ऐकावयास मिळते.''