• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ६१

साहेबांचं राधाक्काच्या बोलण्याकडं लक्ष नव्हतं.  भारावलेल्या मनःस्थितीत ते त्या सिग्नलकडे पाहत रेल्वेस्टेशनकडे निघाले.  साहेबांना केवळ तो सिग्नल दिसू लागला.  त्यांना त्या सिग्नलकडून काय संकेत मिळाला कोण जाणे ?  साहेब पुण्याला जाणार्‍या रेल्वेगाडीत जाऊन बसले.  रेल्वे पुण्याच्या दिशेनं धावू लागली.  राधाक्काला साहेबांचा राग आला.  त्या रागाच्या भरातच साहेबांना काहीबाई बोलू लागल्या.  गणपतराव राधाक्काची समजूत काढू लागले.  दिवेलागणीची वेळ झाली होती.  सौ. भागीरथीबाई या गणपतराव आणि राधाक्काच्या जेवणाचा डवा घेऊन कल्याण बिल्डिंगमध्ये आल्या.  रात्री भाऊ, भावजयी आणि नणंद या तिघांनी मिळून जेवण केलं.  जेवताना राधाक्का गप्प गप्प होत्या.

सौ. भागीरथीबाईंनी गणपतरावांना विचारलं, ''राधाक्का आज अशा गप्प का आहेत ?''  

''तूच विचार तिला कसला राग आलाय ते.''  गणपतराव.

''अहो नणंदबाई, काय झालं असं रुसायला ?  माझं काही चुकलंय ?'' सौ. भागीरथीबाई.

''तुझं काय चुकणार !  चुकलं ते यशवंताचं.'' राधाक्का.

''भावजी आले अन् न भेटताच निघून गेले हे आईला कळलं तर किती वाईट वाटेल त्यांना.''  सौ.  भागीरथीबाई.

''तूच बघ तुझा दीर कसा आहे ते... दुपारी आला, दोन तास थांबला अन् काहीही न सांगता, आईला न भेटता निघून गेला एखाद्या वेड्यासारखा.'' राधाक्का.

गणपतराव समजावण्याच्या सुरात म्हणाले, ''अक्का, यशवंता गेला तर जाऊ दे.  त्याला आता महाराष्ट्राचं बघावं लागतं.  महाराष्ट्र हेच आता त्याचं घर आहे.  फार मोठा कारभार असतो महाराष्ट्राचा.  तू मनाला काही वाईट वाटून घेऊ नकोस आणि यशवंता गेला हे आपल्या तिघांशिवाय कुणालाही माहीत होता कामा नये.''

बोलण्याच्या भरात रात्रीचे बारा केव्हा वाजले हे त्या तिघांनाही कळलं नाही.  गणपतरावांनी औषध-गोळ्या घेतल्या.  थोडा वेळ वाचून झाल्यावर दिवा बंद करून ते झोपले.  नणंद-भावजयीला केव्हा झोप लागली हे समजलंही नाही.  रात्री दारावर कुणीतरी धक्के मारत असल्याच्या आवाजाने गणपतरावांना जाग आली.  लगबगीनं पलंगावरून उतरून दरवाजा उघडण्याकरिता निघाले तोच दरवाजा तोडून बंदुका, भाले, कुर्‍हाडी हातात असलेले पाच-सहा तरुण घरात घुसले.  सर्व घर त्यांनी धुंडाळलं.

गणपतरावांनी त्यांना विचारलं, ''कोण हवंय तुम्हाला ?''

''यशवंता आजही वाचला आमच्या तडाख्यातून'' असं म्हणून ती मंडळी आल्यापावली घराबाहेर पडली. 

कुर्‍हाडीचं राजकारण करणार्‍यांना साहेब कराडला आल्याचे कळले असावे.  त्यांनी वेळ साधली होती; पण काळ आला नव्हता.  राधाक्का आणि सौ. भागीरथीबाई भेदरून गेल्या होत्या.  त्यांना काय घडतंय हे कळलंच नाही.  हां हां म्हणता ही बातमी कराडमध्ये पसरली.  पोलिसांची पाचावर धारण बसली.  कारण साहेब गृहखात्यामध्ये सचिव होते.  साहेबांची शोधाशोध सुरू झाली.  साहेब रात्री पुण्याला पोहोचल्यानंतर तेथील पोलिसांना कळवून पुण्याच्या सर्किट हाऊसवर निवांत झोपी गेले.  सातारहून पुण्याच्या पोलिसांकडे विचारणा झाल्यानंतर साहेब पुण्यात सुखरूप आहेत अशी माहिती सातारा पोलिसांना मिळाली.  साहेबांच्या जीवावर बेतण्याची ही दुसरी वेळ.