• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १८०

त्यांनी पत्रात म्हटलं होतं, लष्करी साहित्यनिर्मितीचं खातं माझ्याकडं दिलं नाही तर मी मंत्रीपदाचा राजीनामा देणार...

ही चर्चा होत असताना लालबहादूर शास्त्री तिथे उपस्थित होते.  टी.टी.के.च्या पत्राला नेहरूजींनी उत्तर देण्याऐवजी साहेबांनी उत्तर द्यावं असं नेहरूजींनी साहेबांना सुचविलं.  याबद्दल साहेबांनी नेहरूजींना स्पष्ट सांगितलं की, याबद्दल आपल्याला जो काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या.  मला तो मान्य राहील.  दिल्लीत साहेब आले आणि नेहरूजींनी जे खातं दिलं ते घेतलं.  मग आता त्यात कपात करण्याचं कारण काय ?  साहेबांनीही ठाम निर्णय मनाशी घेतला.  लष्करी साहित्य निर्मितीचा विभाग टी.टी.के. यांना देण्याचा निर्णय ते घेऊ शकतात.  त्या बदल्यात त्यांना नवा संरक्षणमंत्री शोधावा लागेल.  नेहरूजींनी तातडीनं टी.टी.के.शी बोलण्यास साहेबांना सुचविलं.  ८ फेब्रुवारीला त्यांच्या घरी भेट घ्यावी. साहेबांनी नेहरूजींना पत्र लिहून कळवावं की, युद्धसामुग्री निर्मितीचं खातं टी.टी.के.कडं सोपवावं.  जनरल बी. एम. कौल यांचा राजीनामा साहेबांनी मंजूर केल्यापासून नेहरूजी साहेबांसोबत मनात अढी ठेवून वागतात असं साहेबांना वारंवार जाणवू लागलं.  

साहेब ५ फेब्रुवारीला राष्ट्रपती राधाकृष्णन यांना भेटले.  राधाकृष्णन यांनी आस्थेवाईकपणानं साहेबांची विचारपूस केली.  कौल यांच्या निवृत्तीच्या आज्ञा झाल्यानंतर नेहरूजी राष्ट्रपतींना भेटले.  कौल यांनी परत लष्करात येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांची विनंती आपण मान्य कराल का ?  लेफ्टनंट गव्हर्नरच्या जागी कौल यांना नेमाल का ?

राष्ट्रपतींनी एका शब्दात उत्तर दिलं, ''नाही.''

''साहेबांच्या निर्णयाला आपण मान्यता का दिली ?''  असा प्रतिप्रश्न राष्ट्रपतींनी नेहरूंना विचारला.

त्यावर नेहरूजी म्हणाले, ''संरक्षणमंत्र्याची कुचंबणा होऊ नये म्हणून.''  

राष्ट्रपतींचा निरोप घेऊन साहेब बाहेर पडले व मनात विचार करू लागले.  देश ज्या पद्धतीनं माझ्या कार्याची प्रशंसा करीत आहे, माझ्या उत्कर्षाचा आलेख ज्या पद्धतीने चढतोय, कदाचित सत्तास्पर्धेच्या वर्तुळात मी अडथळा तर ठरणार नाही ना याचा विचार सुरू झाल्याचा अंदाज साहेबांना येऊ लागला.  आपल्या कार्याला कुठेतरी लगाम लावण्याचं कार्य सुरू झाल्याची शंका साहेबांना येऊ लागली.  नेहरूजींनादेखील साहेबांना देशातून मिळत असलेल्या प्रतिसादाचा हेवा वाटत असावा अशी पुसटशी शंका साहेबांच्या मनाला चाटून गेली.  

८ फेब्रुवारीला ठरलेल्या वेळी साहेब आणि टी.टी.के.ची बैठक झाली.  नेहरूजींसोबत झालेल्या चर्चेचा वृत्तांत साहेबांनी टी.टी.के. यांना दिला.  माझं आणि नेहरूजींचं यावर एकमत आहे की, संरखणमंत्र्याला परिणामकारक आणि सैन्याच्या यशस्वितेकरिता लष्कर साहित्यनिर्मिती खातं संरक्षणमंत्र्याकडं असावं.  यावर टी.टी.के. यांनी अत्यंत भावनावश होउन साहेबांसमोर आपलं मन मोकळं केलं.