• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १६४

साहेब म्हणाले, ''ज्यांना हे विधेयक मान्य नाही त्यांना बाहेरचा रस्ता मोकळा आहे.  त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं.''

चर्चेनंतर हे विधेयक प्रवर समितीकडे सोपवावं असं ठरलं.  या समितीनं सखोल अभ्यास करून आपलं मत व्यक्त केलं.  या समितीच्या टिप्पणीसह परत हा अहवाल विधानसभेसमोर मांडण्यात आला.  ८ डिसेंबर १९६१ ला हे विधेयक संमत झालं.  १ मे १९६२ ला जिल्हा परिषद, पंचायत समिती राज्याची योजना प्रत्यक्षात अमलात आली.  महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरलं की, ज्याने ग्रामीण जनतेला सत्तेत सहभागी करून घेतलं.  साहेबांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा विचार व्यक्त केला होता.  उक्ती आणि कृती यांचा प्रत्यक्ष मेळ घालून कार्यवाही करणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून साहेबांचा देश गौरव करू लागला.  साहेबांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती राज निर्माण करून ग्रामीण भागातील जनतेला राज्यकर्ती जमाल म्हणून हक्क मिळवून दिला.  गांधीजींची ग्रामस्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात अमलात आणली.

सचिवालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनात साहेबांची भेट घेण्याची वर्दळ, फायली हातात घेऊन सचिवांच्या येरझारा, दूरध्वनींना एका सेकंदाची उसंत नाही.  भेटायला आलेल्यांचे प्रश्न ऐकून घेण्यात व सोडविण्यात साहेब मग्न.  सर्वांच्या भेटीगाठी संपल्यानंतर मुख्य सचिव व सचिवासमवेत बैठक. कामासंबंधी काही अडचणी सचिवांनी सांगितल्यास त्या अडचणीचं तत्काळ निवारण साहेब करताहेत.  प्रत्येक सचिव आपापल्या खात्याच्या फाईलवर साहेबांची सही घेऊन कामाची मंजुरी घेत आहे.  कामाच्या रगाड्यात दुपार केव्हा झाली हे कळलंदेखील नाही साहेबांना.  खाजगी सचिव लगबगीनं खोलीत येऊन साहेबांच्या कानाशी लागतात.  साहेब सर्व अधिकार्‍यांचा निरोप घेऊन आपल्या अंटीचेंबरमध्ये घाईघाईनं जातात.  लगेच दूरध्वनीची घंटा निनादते.  दूरध्वनी उचलून साहेब कानाशी लावतात.  

तिकडून आवाज आला, ''मी जवाहरलाल नेहरू बोलतोय.  एकटेच आहात ना, की कुणी बसलंय तुमच्यासोबत ? बसलेले असतील तर त्यांना बाहेर जायला सांगा.  मला तुमच्याशी काही गोपनीय बोलायचंय.''

''नाही, कुणी नाही माझ्यासोबत.  मी एकटाच आहे खोलीत.'' साहेब.  

''मी तुमच्याशी जे बोलणार आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे.  मी जे विचारणार आहे ते गोपनीय ठेवा.  याची गंधवार्ताही कुणाला लागता कामा नये.'' पंडितजी.

''माझ्यावर आपला विश्वास आहे याची मला कल्पना आहे.  यापूर्वीही आपण माझ्यावर असाच विश्वास टाकला होता.  त्या आपल्या विश्वासास मी पात्र ठरलो.'' साहेब.

''तुमच्यावर माझा विश्वास आहे म्हणूनच मी तुमची निवड केलेली आहे.  मला तुमचं उत्तर 'हो' किंवा 'नाही' या दोन शब्दांत पाहिजे.''  पंडितजी.

''आपणास मी हमी देतो, आपल्या संभाषणाची मी कुठेही वाच्यता करणार नाही.'' साहेब.