विदेश दर्शन - १८९

परिशिष्ट

श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या विदेश-सफरीत त्यांच्या समवेत, त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयातील ज्येष्ठ अधिकारी असावयाचे. त्या सर्वांचा त्यांनी त्यांच्या लेखनात कृतज्ञापूर्वक उल्लेख, विविध घटनांच्या संदर्भात केलेला आहे. त्या काळात –

श्री. राम प्रधान ( सध्याचे अरुणाचलमचे राज्यपाल) हे जिनिव्हा येथे टेक्निकल असिस्टंट एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर ऑफ इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (I.M.F.) या पदावर होते. युनायटेड नेशन्स फॉर ट्रेड अॅण्ड डेव्हलपमेंट (UNCTAD) याच्याशी संबंधित ते होते.

श्री. माधव गोडबोले हे गृह आणि नंतर अर्थमंत्र्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते.

श्री. शरद उपासनी हे विदेशमंत्र्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी-विशेष सहाय्यक व सल्लागार होते.

श्री. शरद काळे हे विदेशमंत्र्यांचे स्पेशल असिस्टंट (प्रा. सेक्रेटरी ) होते.

श्री. श्रीपाद डोंगरे हे त्यांचे स्वीय सहाय्यक असून विदेश -मंत्र्यांचे अॅडिशनल प्रायव्हेट सेक्रेटरी होते.