• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ८६

४४ बोस्टन
४ ऑक्टोबर, १९७४

आज दुपारी ४ वाजता बोस्टनला पोहोचलो. आता रात्रीचे ११ वाजले आहेत. ७ तास कसे गेले समजले नाही. शरीर थकले आहे. परंतु काही ओळी लिहिल्याशिवाय झोपावयाचे नाही असे मनात होते.

कित्येक वर्षे या शहराचा मनात ध्यास होता. हॉर्वर्ड विद्यापीठाचे केंद्र म्हणून-केनेडींचे शहर म्हणून, एम्. आय. टी. साठी म्हणून - आज पाहिले. अधिक उद्या पहावयाचे आहे.

फर्स्ट नॅशनल बँक ऑफ बोस्टनचे श्री. क्रॅफ्ट्स् मुद्दाम श्री. तेलंग यांचेबरोबर विमानतळावर न्यावयास आले होते. हे गृहस्थ १५ वर्षांपूर्वी मुंबईत मला भेटले होते. श्री. जी. एच्. मेहता यांचे मित्र. तसेच हिंदुस्थानचे हितैषी.

येथील युनिव्हर्सिटीमधील व इतर काही तरुण भारतीय भेटले. डॉ. जगदीश भगवती हे तरुण अर्थशास्त्री त्यांत होते. हे डॉ. मनमोहनचे मित्र आहेत. हिंदुस्थानच्या आर्थिक प्रश्नाबाबत चर्चा झाली.

समुद्रकाठचे हे पूर्वीचे प्रख्यात बंदर. चार्ल्स नदीचे मुखावर वसले आहे. नदीच्या एका बाजूला बोस्टन-दुसऱ्या बाजूस केंब्रिज (जेथे एम्. आय. टी. हॉर्वर्ड वगैरे आहेत.)

संध्याकाळी येथील समुद्रकिनाऱ्यावरील Pier 4 रेस्टॉराँमध्ये जेवण घेतले. सी-फूड उत्तम - चांदणी रात्र - शांत समुद्र - उत्तम संगत. अधिक काय हवे?

श्रीमती क्रॅफ्ट्स् (वय सुमारे ५०) शेजारी होत्या. बायकांचा नेहमीचा प्रश्न त्यांनी विचारला. कुटुंब किती मोठे आहे? मी सांगितले आम्ही फक्त दोघेच आहोत. त्यांनी विचारले की, मग पत्नीला एकटयाच टाकून कसे आलात.

तेही दोघेच आहेत. त्यांनाही मूलबाळ नाही. त्या म्हणाल्या, मी श्री. क्रॅफ्ट्सबरोबर सर्व जगभर प्रवास करते. एकटी मागे राहात नाही. श्री. क्रॅफ्ट्सही मोठया कौतुकाने म्हणाले, She is a great traveler. (प्रवासाला तशी ती जबरदस्त आहे.)

मी त्यांना सांगितले की, मी हा तुमचा निरोप माझ्या पत्नीला सांगेन. माझा शब्द मी पाळला आहे. बाकीचे तुझ्यावर.