• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ७०

सैबेरियामध्ये हिऱ्यांच्या नव्या खाणी सापडल्या आहेत. हा एक नवा उद्योगधंदा मोठया प्रमाणात सुरू झाला आहे. तेथे सापडलेले नवे हिरे-माणकांचे नमुने येथे आहेत.

महत्त्वाचा विभाग म्हणजे रशियाच्या राजकुटुंबातील, शेकडो वर्षांत जमलेल्या अमोल हिऱ्यांचा साठा येथे पहावयास मिळतो. राजमुकुट आणि हिरेजडित असे अमोल दागदागिने व आभरणे पाहण्यासारखी आहेत.

क्रेमलिनच्या आवारात इकडे तिकडे अर्धा तास फिरलो. १९६४ सालीही येथेच फिरावयास आलो होतो. पुन्हा एकदा उजळणी. कॉ. लेनिनचा बसलेल्या स्थितीतला एक आकर्षक पुतळा हे फक्त नवीन दिसले. क्रेमलिनच्या भिंतीमध्ये व जवळपास दुरुस्त्या चालू आहेत त्यामुळे लाल चौकात (रेड स्क्वेअर) भटकता आले नाही. क्रेमलिनच्या आवारातील या सफरीमध्ये मिसेस् चिबिसॉव्ह (Chibisova) आणि श्री. रोमॉनाव्ह (Romanav) हे रशियन अधिकारी (जे आमच्या दिमतीला दिले आहेत ते) आमच्या बरोबर होते.

रात्री वित्तमंत्र्यांचे भोजन होते. खूप मजेत वेळ गेला. काही मंत्री होते. बरेचसे आर्थिक तज्ज्ञ व बँकर्स होते. बँकर्स हे चांगले प्रतिष्ठित आणि पोक्त वाटले. व्यवस्थित पोषाख, गंभीर मुद्रा, पोक्त बोलणे-वागणे या सर्व बाबतींत हे बँकर्स पाश्चिमात्य बँकर्ससारखेच वाटले. आज त्यांच्या संस्था पाहाणार आहे. तेव्हा अधिक समजेल.

वित्तमंत्री मोठा अघळपघळ व गृहस्थीची आवड असणारा मानव वाटला. कौटुंबिक जीवनात विशेष रस दिसला. आपल्या दोन लेकींचे व त्यांच्यापासून झालेल्या दोन नातवांचे खूपच कोडकौतुक सांगत होते. आपल्या जीवनातील अत्यंत आवडते काम म्हणजे आपल्या नातवंडांशी भेटणे-खेळणे हे आहे. हे त्यांनी इतक्या सहजपणे-भावनापूर्वक सांगितले की 'आजोबा' ही संस्था ऐतिहासिक घटनांच्या उलथापालथीतही कायम राहिली आहे, याचा आनंद वाटला.

या 'आजोबांना' पुन्हा २८ तारखेला भेटणार आहे. या खेपेचे रशियातील हे आमचे यजमान पाहून गेल्या भेटीतील आमचे होस्ट रक्षामंत्री मार्शल मॉलेनोव्हस्की यांची तीव्रपणे आठवण झाली.